Power saver | वीजबिल होईल निम्म्यापेक्षा कमी, फक्त घरातील ही दोन उपकरणे बदला

Electricity Bill : वीजेचा वापर कमी व्हावा, वीजबिल कमी यावे यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. अर्थात अनेकवेळा आपल्याकडून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होते ज्यामुळे वीजबिल खरोखरच मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. वीजबिल कमी करण्याचे उपाय जाणून घ्या.

power saving home appliances
वीजेचा खप कमी कसा करायचा 
थोडं पण कामाचं
  • दरमहिन्याचे वीजबिल हा सर्वसामान्यांच्या बजेटचा महत्त्वाचा भाग
  • काही उपकरणांमध्ये होते वीजबिलात वाढ
  • घरातील दोन उपकरणे बदलली तर होईल वीजबिलात मोठी घट

Electricity Bill : नवी दिल्ली : वीजेची बिल (Electricity bill)हे दर महिन्याच्या खर्चातील एक महत्त्वाचा हिस्सा असतो. वीजेचा वापर कमी व्हावा, वीजबिल कमी यावे यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. अर्थात अनेकवेळा आपल्याकडून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होते ज्यामुळे वीजबिल खरोखरच मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. वीजबिल कमी करण्याचे उपाय जाणून घेऊयात. (Change these equipment in house, your electricity bill will be reduced to half)

छोटासा बदल करून देईल मोठा फायदा

सर्वसाधारणपणे असे दिसून आले आहे की हिवाळ्यात वीजेच्या बिलात मोठ्या प्रमाणात वाढ होते. वीजबिलात वाढ झाली की सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम होतो. जर तुम्ही जास्त येणाऱ्या वीजबिलाच्या समस्येला तोंड देत असाल, तर तुम्हाला घरातील काही उपकरणे बदलावी लागतील आणि मग तुमचे वीजबिल निम्म्याहूनदेखील खाली येईल. 

नॉर्मल बल्बमुळे वीजेचा जास्त खप

जर तुम्ही जुने बल्ब वापरत असाल तर असे बल्ब वापरणे बंद करा. हे जुन्या पद्धतीचे बल्ब जास्त वीजेचा वापर करतात. असे बल्ब घरातून काढून टाकून तुम्ही वीजेचा खप कमी करू शकता. यांच्या जागी तुम्ही घरात एलईडी बल्बचा वापर सुरू करा. एलईडी बल्बमुळे वीजेचा खप कमी होतो. वीजेचा खप कमी झाल्यामुळे तुमच्या वीजबिलात मोठी कपात होऊ शकतो.

अशा हीटरचा वापर टाळा

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हीटरचा वापर ही नेहमीच बाब आहे. जर तुम्ही जास्त क्षमतेच्या हीटरचा वापर करत असाल तर लगेच असा हीटर काढून टाका. जास्त क्षमतेच्या हीटरमुळे जास्त वीजेची खपत होते आणि त्याचा थेट परिणाम वीजबिलावर होतो. हीटरच्या जागी ब्लोअरचा वापर करणे फायद्याचे ठरते. ब्लोअर कमी वीजेचा खप करतो आणि शिवाय तो सुरक्षितदेखील असतो.

जुन्या जमान्याचा गीझर

अनेक घरांमध्ये आजदेखील पाणी गरम करण्यासाठी रॉड किंवा जुन्या जमान्याच्या गीझरचा वापर करण्यात येतो. हे गीझर मोठ्या प्रमाणावर वीजेचा खप करतात. त्यामुळे वीजबिल वाढते. त्यामुळे रॉड आणि जुन्या जमान्याच्या गीझरच्या जागी घरात अॅडव्हान्स गीझर बसवा. तुमचा नवा गीझर ५ स्टार रेटिंगवाला असेल याची खातरजमा करून घ्या. ५ स्टार रेटिंगच्या गीझरमुळे वीजेचा खप कमी होतो. यामुळे तुमचे वीजबिल झपाट्याने कमी होईल आणि दर महिन्याला तुमच्या बजेटवर पडणारा ताण कमी होईल.

कोरोना काळात वर्क फ्रॉम होमची कार्यसंस्कृती रुजली आहे. कोरोनाचे संकट टाळण्यासाठी सरकारने अनेक कंपन्यांना वर्क फ्रॉम करण्याचे आदेश दिले होते. या काळात अनेक आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना ऑफिसमध्ये न बोलवता घरून काम करून घेतले. आता वर्क फ्रॉम होमसाठी केंद्र सरकार लवकरच एक कायदा आणणार आहे. यामुळे कर्मचार्‍यांचा फायदा होणार आहे. ऑफिसच्या कामासाठी त्यांना घरची वीज आणि इंटरनेट वापरावे लागत आहे. यासाठी त्यांना वेगळा भत्ता देण्यासाठी सरकार कायदा करण्याच्या तयारीत आहे. वर्क फ्रॉम होममुळे घरगुती वीजबिलात वाढ झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी