Changes From 1st December | एक डिसेंबरपासून होत आहेत हे बदल, तुमच्या खिशावर वाढणारा बोझा

Changes From 1st December | डिसेंबरमध्ये होणाऱ्या बदलांमध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना किंवा खातेधारकांना मोठा फटका बसणार आहे. तर दुसरीकडे एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीतदेखील बदल होऊ शकतात. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेपासून बॅंक, एलपीजी गॅस सिलिंडर, आर्थिक व्यवहार इत्यादीशी निगडीत बाबींमध्ये काही नवीन बदल लागू होतात. याचा सर्वसामान्य लोकांच्या खिशावर परिणाम होत असतो.

Changes From 1st December
एक डिसेंबरपासून होणारे बदल 
थोडं पण कामाचं
  • डिसेंबर महिन्यातदेखील (Month of December) काही महत्त्वाचे बदल होणार
  • स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड ग्राहकांना फटका बसणार
  • लपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमतीतदेखील वाढ होण्याची शक्यता

Changes From 1st December | नवी दिल्ली : प्रत्येक महिन्यात काही नवीन बदल लागू होतात. अशा बदलांचा सर्वसामान्य माणसावर प्रत्यक्ष परिणाम होत असतो. डिसेंबर महिन्यातदेखील (Month of December) काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. यामध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांना फटका बसणार आहे, तर दुसरीकडे एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमतीतदेखील वाढ होणार आहे. नोव्हेंबर महिना संपतच आला आहे. डिसेंबर महिना हा वर्षातील शेवटचा महिना असतो. या महिन्यात अनेक बदल दिसणार असून त्याचा बोझा तुमच्या खिशावर पडू शकतो. (Changes from 1st December & Impact on your pocket)

डिसेंबरमध्ये होणाऱ्या बदलांमध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना किंवा खातेधारकांना मोठा फटका बसणार आहे. तर दुसरीकडे एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीतदेखील बदल होऊ शकतात. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेपासून बॅंक, एलपीजी गॅस सिलिंडर, आर्थिक व्यवहार इत्यादीशी निगडीत बाबींमध्ये काही नवीन बदल लागू होतात. याचा सर्वसामान्य लोकांच्या खिशावर परिणाम होत असतो. डिसेंबरमध्ये होणाऱ्या बदलांचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार आहे ते पाहूया.

स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड महागणार

स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड वापरणे महाग होणार आहे. त्यामुळे एसबीआय क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. एक डिसेंबरपासून एसबीआयच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करणे महाग होणार आहे. एसबीआय क्रेडिट कार्डवर सध्या फक्त व्याजाचीच वसूली केली जाते. डिसेंबर महिन्यापासून क्रेडिट कार्डच्या वापरावर प्रोसेसिंग फीदेखील वसूल केली जाणार आहे. यामुळे एसबीआय क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना जास्त शुल्क भरावे लागणार आहे. नव्या नियमाद्वारे क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यानंतर ईएमआय पर्यायाद्वारे बिल भरल्यास तुम्हाला प्रत्येक खरेदीवर ९९ रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. हे प्रोसेसिंग चार्ज आहे. एसबीआय क्रेडिट कार्डने याची सर्वात आधी सुरूवात केली आहे.

एलपीजी गॅस सिलिंडरच्या भावात बदल

व्यावसायिक आणि घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या भावात पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला बदल करतात. दर महिन्यात पेट्रोलियम कंपन्या यासंदर्भातील अंदाज घेत असतात. यावर्षी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आली आहे. अर्थात अनेकवेळा एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल न होता ते स्थिरदेखील असतात.

होम लोन महागण्याची शक्यता

डिसेंबर महिन्यापासून होम लोन महागण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात बॅंकांनी गृहकर्जावर विविध ऑफर्स दिल्या होत्या. यामुळे ग्राहकांना कमी व्याजदराबरोबर शून्य प्रोसेसिंग फीचा लाभ घेता आला होता. यातील काही ऑफर्स आता डिसेंबर महिन्यात संपत आहेत. तर काहींच्या ऑफर्स ३१ डिसेंबरपर्यत सुरू राहणार आहेत.

युएएन शी आधार लिंक न केल्यास तोटा

३० नोव्हेंबरपासून युएएन नंबर आधार शी लिंक करण्याची अंतिम मुदत आहे. ही मुदत वाढवून ३० नोव्हेंबरपर्यत करण्यात आलेली आहे. जर तुम्ही युएएन नंबर आधारशी लिंक न केल्यास तुमच्या पीएफ खात्यात येणारी रक्कम थांबू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी