Changes from 1st November | या गोष्टी बदलणार १ नोव्हेंबरपासून, पाहा तुमच्या बजेटवरील परिणाम

Changes from 1st November | बॅंका, रेल्वे, एलपीजी गॅस सिलिंडर यांच्याशी निगडित हे बदल असणार आहेत. तुमच्या दरमहिन्याच्या बजेटवर आणि कामकाजावर या सर्वच घटकांचा परिणाम होणार आहे.

Changes from 1st November
१ नोव्हेंबर पासून होणारे बदल 
थोडं पण कामाचं
  • दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून काही गोष्टींमध्ये बदल
  • १ नोव्हेंबरपासून एलपीजी गॅस सिलिंडरची बुकिंग आणि डिलिव्हरी नियम बदलणार
  • रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात होणार बदल

Changes from 1st November | नवी दिल्ली: दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून काही गोष्टींमध्ये बदल होतात आणि त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होत असतो. बॅंका, रेल्वे, एलपीजी गॅस सिलिंडर यांच्याशी निगडित हे बदल असणार आहेत. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्या एलपीजी गॅस सिलिंडरचे दर जाहीर करत असतात. तुमच्या दरमहिन्याच्या बजेटवर आणि कामकाजावर या सर्वच घटकांचा परिणाम होणार आहे. हे बदल कोणते असणार आहेत ते जाणून घेऊया.  (Changes from 1st November: From Bank, LPG Gas Cylinder, Railways, know the things that will be impact your pocket)

एलपीजी गॅस सिलिंडर

पेट्रोलियम कंपन्यांकडून १ तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर केले जात असतात. काही वेळा एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट होते तर काहीवेळा वाढ. मागील काही महिन्यांपासून मात्र पेट्रोलियम कंपन्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करत आहेत. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीने त्रस्त असणाऱ्या नागरिकांना एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरवाढीलादेखील तोंड द्यावे लागू शकते. 

एलपीजी गॅस सिलिंडरची बुकिंग आणि डिलिव्हरी

तुमच्या गॅस डिलरकडे नोंदवलेला तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर जर चुकीचा असेल तर तो दुरुस्त करून घ्या. कारण त्यात काही चूक असल्यास तुमच्या एलपीजी गॅस सिलिंडरची डिलिव्हरी थांबवली जाऊ शकते. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा बदल एलपीजी गॅस सिलिंडरच्या बाबतीत झाला आहे. तो म्हणजे तुम्ही सिलिंडरची बुकिंग केल्यावर तुम्हाला एक ओटीपी येणार आहे. ज्यावेळेस एलपीजी गॅस सिलिंडर घेऊन कर्मचारी येईल तेव्हा तुम्हाला तो ओटीपी त्याला द्यावा लागेल त्यानंतर सिस्टममध्ये तो अपडेट होईल आणि त्यानंतरच तुम्हाला सिलिंडरची डिलिव्हरी मिळणार आहे. 

बॅंकांकडून शुल्काची आकारणी

बॅंका ग्राहकांकडून विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त ट्रॅन्झॅक्शन केल्यास शुल्क आकारणार आहेत. उदाहरणार्थ बचत खात्यातून तीनपेक्षा जास्त वेळा पैसे जमा करायचे असल्यास काही बॅंका त्यावर शुल्क आकारणार आहेत. विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यावरदेखील काही बॅंका शुल्क आकारण्यास सुरूवात करणार आहेत.

रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल

ट्रेनच्या वेळापत्रक बदल होणार आहे. रेल्वेचे नवीन वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर बाहेरगावी जाण्याचे नियोजन करत असाल तर रेल्वेगाड्यांच्या बदलेल्या वेळांची दखल घ्या.

आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल आता १०८.९९ रुपये प्रति लिटरवर पोचले आहे. तर डिझेलचे दर ९७.७२ रुपये प्रति लिटरवर पोचले आहेत. तर मुंबईत पेट्रोलचा ११४.८१ रुपये प्रति लिटरला मिळते आहे. मुंबईत डिझेलचा दर १०५.८६ रुपये प्रति लिटरवर पोचला आहे. चेन्नईमध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. चेन्नईत पेट्रोल १०५.७४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल १०१.९२ रुपये प्रति लिटर झाले आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर १०९.४६ रुपये प्रति लिटर आणि डिझेल १००.८४ रुपये प्रति लिटरला मिळते आहे. देशातील आणखी एक महत्त्वाचे शहर असलेल्या बंगळूरूमध्ये पेट्रोल ११२.७९ रुपये प्रति लिटरवर आणि डिझेल १०६.६० रुपये लिटरवर पोचले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी