Aadhaar Card Link with IRCTC: नवी दिल्ली : तुम्ही आणि तुमचे कुटुंब अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. वास्तविक, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने रेल्वे तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत. रेल्वेने तिकिट बुकिंगचे (Railway Ticket Booking Rule)नियम बदलल्याचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांना होणार आहे. भारतीय रेल्वे (Indian Railway) आता तिकीट बुक करणाऱ्यांना मोठी सुविधा देत आहे. रेल्वे तिकिट बुकिंगसंदर्भातील नियमात बदल करून प्रवाशांना मोठाच दिलासा दिला आहे. यामुळे प्रवाशांना आता जास्त तिकिटांचे बुकिंग करता येणार आहे.(Changes in IRCTC ticket booking rules, new changes will benefit you)
नव्या बदलानंतर, आता तुम्ही एका महिन्यात पूर्वीपेक्षा जास्त तिकिटे बुक करू शकता. यापूर्वी तुम्ही तुमच्या आयआरसीटीच्या (IRCTC) खात्यातून 6 तिकिटे बुक करू शकत होता. पण आता तुम्ही तुमच्या IRCTC खात्याशी आधार लिंक केल्यास (आधार कार्ड लिंक विथ IRCTC) तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला त्याचा लाभ मिळेल.
IRCTC खात्याशी आधार लिंक केल्यानंतर, आता तुम्ही एका महिन्यात 12 तिकिटे बुक करू शकता. तुम्ही ट्रेनने कमी प्रवास करत असला तरीदेखील तुम्ही तुमचे IRCTC खाते आधारशी लिंक करावे. जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्हाला याचा त्रास होणार नाही. कारण तुमच्या आयआरसीटीसी खात्याशी आधार लिंक करणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया आधारशी कसे लिंक करायचे...
तिकीट बुक करण्यासाठी, प्रवाशाने आधारशी आपले प्रोफाईल पडताळणे फार महत्वाचे आहे. हे मास्टर लिस्ट अंतर्गत 'माय प्रोफाइल' टॅबमध्ये दिलेले आहे. तिकीट बुक करण्यापूर्वी, येथे प्रवाशाचे नाव आणि आधार कार्ड तपशील देऊन मास्टर लिस्ट अपडेट करा.
अनेकवेळा प्रवाशांना अचानक प्रवास करावा लागतो, म्हणजेच त्यांना प्रवासाचे नियोजन न करताच प्रवास करण्याची वेळ येते. अशावेळी आधीच तिकीट काढता येत नसल्याचे दिसून येते. तुमच्या बाबतीतही असे घडले असेल तर त्याबद्दल बारकाईने जाणून घेतले पाहिजे. जर तुमच्याकडे आरक्षण नसेल, तर आता तुम्ही फक्त प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढू शकता आणि त्यानंतर तुम्हाला TTE शी संपर्क साधावा लागेल. तुम्हाला तिकीट तपासनीसकडे जावे लागेल आणि तेथे जाऊन तुम्ही तुमचे तिकीट काढू शकता.