या 5 बँक देत आहेत सर्वांत स्वस्त लोन, जाणून घ्या व्याजदरासह संपूर्ण यादी 

काम-धंदा
पूजा विचारे
Updated Sep 16, 2019 | 15:41 IST

बँक सतत व्याजदरांमध्ये घट करत आहे, पण तुम्हांला माहित आहे का की कोणती बँक सर्वांत स्वस्त लोन देत आहे. येथे जाणून घ्या अशा बँकांची पूर्ण यादी जी बाजारात सर्वांत कमी व्याजावर लोन देत आहे. 

Representational Image
या 5 बँक देत आहेत सर्वांत स्वस्त लोन, जाणून घ्या अधिक माहिती 

थोडं पण कामाचं

  • रिझर्व्ह बँकेनं गेल्या क्रेडिट पॉलिसीमध्ये रेपो रेट 0.35 टक्क्यांनी घट केली होती.
  • त्यानंतर बँकांनी दरांमध्ये घट करण्यास सुरूवात केली होती.
  • रिझर्व्ह बँकेनं आदेश देत बँकांना सांगितलं होतं की, बँकांनी रेपो रेट सारखं एक्सटर्नल बेंचमार्कनी आपला रेट लिंक करावा.
  • सरकारी बँकांनी आपला लोन रेट रेपो रेटशी लिंक केलं.

मुंबईः  बँक सतत व्याजदरात घट करत आहे. रिझर्व्ह बँकेनं गेल्या क्रेडिट पॉलिसीमध्ये रेपो रेट 0.35 टक्क्यांनी घट केली होती. त्यानंतर बँकांनी दरांमध्ये घट करण्यास सुरूवात केली होती. रिझर्व्ह बँकेनं आदेश देत बँकांना सांगितलं होतं की, बँकांनी रेपो रेट सारखं एक्सटर्नल बेंचमार्कनी आपला रेट लिंक करावा. त्यानंतर सरकारी बँकांनी आपला लोन रेट रेपो रेटशी लिंक केलं. दरम्यान आता सुद्धा बँक सर्वाधिक लोन MCLR (Marginal Cost Of Fund Lending Rate) च्या आधारावर देतात. बँक यावर बँका त्यांच्या किंमतीनुसार व्याज जोडून लोन देतात. सर्वाधिक बँक 1 वर्षांची MCLR वर लोन देतात. आज आम्ही तुम्हांला सर्वांत स्वस्त लोन देणाऱ्या बँकांबद्दल सांगणार आहोत. या बँकांची MCLR चा दर सर्वांत कमी आहे. 

आता बँक ग्राहकांना रेपो रेटनी लिंक्ड लोन घेण्यासाठी पर्याय देत आहेत. ही व्यवस्था नवीन ग्राहकांसाठी आहे. दरम्यान काही शुल्क देऊन जुने ग्राहक सुद्धा रेपो रेटच्या व्यवस्थेशी जोडले जाऊ शकतात. येथे बघा सर्वांत स्वस्त लोन देणाऱ्या बँकांची यादी. 

1 वर्षाचा MCLR 

देशातली सर्वांत मोठी बँक SBI 1 वर्षाच्या MCLR वर सर्वात स्वस्त लोन देत आहे. बँकेचा 1 वर्षाचा MCLR दर 8.15 टक्के आहे. स्टेट बँकेनं 10 सप्टेंबरला यात बदल केले होते. त्यानंतर दुसऱ्या नंबरवर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि पीएनबी आहे. दोघांचा ही 1 वर्षाचा MCLR दर 8.3 टक्के आहे. तिसऱ्या स्थानावर बँक ऑफ इंडिया आणि सिंडिकेट बँक 8.35 टक्के MCLR वर लोन देत आहे. 

6 महिन्याचा MCLR 

6 महिन्याचा MCLR दर स्टेट बँकेचाच सर्वांत कमी आहे. एसबीआयचा 6 महिन्याचा MCLR केवळ 8 टक्के आहे. तर सेंट्रल बँक, पीएनबी आणि यूनियन बँकेचा 6 महिन्याचा MCLR दर 8.2 टक्के आहे. इलाहाबाद बँकेचा MCLR 8.25 टक्के आहे.

2 वर्षांचा MCLR 

SBI चा 2 वर्षांचा MCLR देखील सर्व बँकांपेक्षा स्वस्त आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचा 2 वर्षांचा MCLR दर 8.25 टक्के आहे. 8.5 टक्क्यांसोबत MCLR दरासह यूनियन बँक दुसऱ्या स्थानावर आहे. 8.6 टक्क्यांच्या MCLR सोबत एचडीएफसी बँक आणि आयओबी तिसऱ्या स्थानावर आहे. अॅक्सिस बँकेचा 2 वर्षांचा MCLR 8.65 टक्के आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी