Bank Holidays in August 2022 : नवी दिल्ली : जुलै महिना संपला असून आता ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. या महिन्यात अनेक सण आणि महत्त्वाचे दिवस आहेत. त्यामुळे बॅंकांच्या सुट्ट्यांची रेलचेल असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजे आरबीआयने (RBI) ऑगस्ट महिन्यासाठी बँक सुट्ट्यांची (Bank Holidays)यादी जारी केली आहे. ऑगस्ट महिन्यात (दुसरा/चौथा शनिवार आणि रविवार वगळता) एकूण 18 दिवस बँका बंद राहतील. स्वातंत्र्य दिन , रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आणि गणेश चतुर्थी यासह अनेक मोठे सण ऑगस्टमध्ये येत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल, तर तुम्ही बॅंकेची सुट्टी पाहून त्यानुसार बँकेत जाण्याचा प्लॅन करा. (Check the bank holidays list in the month of August)
अधिक वाचा : Taarak Mehata चे १४ वर्ष पूर्ण, दयाबेनच्या घरवापसीवर जेठालालाने म्हटलं....
ऑगस्ट महिन्यात (दुसरा/चौथा शनिवार आणि रविवार वगळता) एकूण 18 दिवस बॅंकांंना सुट्टी असणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असल्यास, ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे.प्रत्यक्षात जुलैमध्ये एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जुलै 2022 च्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. कृपया लक्षात घ्या की या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. RBI (Bank Holidays List 2022) च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमधील विशेष प्रसंगी नोटिफिकेशनवर देखील अवलंबून असतात.
अधिक वाचा : TV Industry Richest Actress : 'ही' आहे टीव्ही जगतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींची यादी, ऐकून धक्का बसेल
1 ऑगस्ट: द्रुपका शे-जी उत्सव (फक्त सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.)
7 ऑगस्ट: 2022 - पहिला रविवार (साप्ताहिक सुट्टी)
8 ऑगस्ट: मोहरम (फक्त जम्मू आणि काश्मीरच्या किनारी राहतील)
9 ऑगस्ट: मोहरम (अगरतळा, अहमदाबाद, ऐझॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा, रायपूर आणि रांची येथे बँका बंद राहतील.)
11 ऑगस्ट: रक्षा बंधन (देशभरात सुट्टी)
12 ऑगस्ट: रक्षाबंधन (कानपूर आणि लखनौ)
13 ऑगस्ट: दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
14 ऑगस्ट:-रविवार (साप्ताहिक सुट्टी)
15ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन
16 ऑगस्ट: पारशी नववर्ष (मुंबई आणि नागपूरमध्ये सुट्टी)
18 ऑगस्ट: जन्माष्टमी (देशभर सुट्टी)
19 ऑगस्ट: जन्माष्टमी (श्रावण वद-8)/कृष्ण जयंती (अहमदाबाद, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, गंगटोक, जयपूर, जम्मू, पटना, रायपूर, रांची, शिलाँग आणि शिमला)
20 ऑगस्ट: श्री कृष्ण अष्टमी (हैदराबाद)
21 ऑगस्ट: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
28 ऑगस्ट: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
29 ऑगस्ट : श्रीमंत शंकरदेव (गुवाहाटी) यांचा दिनांक
31 ऑगस्ट: गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बँका बंद राहतील)