PAN-Aadhaar Linking Deadline : नवी दिल्ली : आज 31 मार्च हा आधार कार्ड (Aadhaar Card) आणि पॅन कार्ड (PAN Card) लिंक करण्याचा शेवटचा दिवस आहे. कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारने आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याच्या प्रक्रियेची मुदत वाढवली होती. ती मुदत आज संपते आहे. त्यामुळे यापुढे जर तुमचे आधार कार्ड हे पॅन कार्डशी लिंक (PAN-Aadhaar Linking) नसेल तर तुम्हाला आर्थिक नुकसान होणार आहे. परंतु अनेकजण असे आहेत की त्यांनी पूर्वीच आधार-पॅन कार्डशी लिंक केले होते मात्र आता ते विसरले आहेत. जर तुम्हाला तुमचं आधार- पॅन लिंक झालं आहे की नाही? हे जाणून घ्यायचे असल्यास, ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. तुम्ही घरसबल्या ऑनलाइन स्वरुपात काही मिनिटात हे तपासू शकता किंवा माहिती घेऊ शकता. तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड लिंक असल्यास चिंताच नाही, मात्र असे नसल्यास तुम्ही लगेच ते लिंक करून तुमचे होणारे आर्थिक नुकसान टाळू शकता. पाहा आधार पॅन लिंकिंग चेक करण्याची सोपी पद्धत. (Check your Aadhar-PAN linking status, see the details)
अधिक वाचा : Homebuyers alert | तुमच्या गृहकर्जावर 1 एप्रिलपासून नाही मिळणार 'हा' कर वजावटीचा लाभ...पाहा किती बसणार फटका
अधिक वाचा : Income Tax Rule | 1 एप्रिल पासून बदलणार हे 5 मोठे प्राप्तिकर नियम...लागा 'कर नियोजनाच्या' तयारीला
जर तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक नसल्यास तुम्हाला ते घरबसल्या लगेचच ऑनलाइन स्वरुपात करता येणार आहे. त्याची सोपी प्रक्रिया अशी आहे.
अधिक वाचा : GST Rule Change | 1 एप्रिलपासून बदलणार जीएसटीचे नियम, लाखो कंपन्यांवर होणार परिणाम!
ऑनलाईन प्रमाणेच तुम्ही घरबसल्या SMS च्या माध्यमातूनही पॅन कार्ड - आधार कार्ड लिंक करू शकता. यासाठी तुम्हांला UIDAIPAN(12digit Aadhaar number) स्पेस (10 digit PAN Number) या फॉर्मेट मध्ये एक एसएमएस 567678 किंवा 56161 या नंबरवर पाठवायचा आहे.