IT firm gifts Maruti Cars | तुमच्या कंपनीने तुमच्या कामाचे चीज म्हणून कार भेट दिलीय का? या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना भेट दिल्या 100 मारुति कार

IT Company : चेन्नईस्थित आयटी फर्मने सोमवारी आपल्या कर्मचाऱ्यांना मारुती कार भेट दिल्या आहेत. या कर्मचाऱ्यांनी कंपनीला सतत साथ दिल्याबद्दल आणि कंपनीच्या यशात, वाढीसाठी अतुलनीय योगदान दिल्याबद्दल तब्बल 100 कार भेट दिल्या. Ideas2IT या चेन्नईस्थित आयटी कंपनीने 100 कर्मचाऱ्यांना मारुती सुझुकीच्या कार भेट दिल्या आहेत.

IT company gifts cars to 100 employees
आयटी कंपनीने 100 कर्मचाऱ्यांना भेट दिल्या मारुति कार 
थोडं पण कामाचं
  • Ideas2IT या आयटी कंपनीने 100 कर्मचाऱ्यांना मारुती सुझुकीच्या कार भेट दिल्या आहेत.
  • Ideas2IT चे संस्थापक आणि अध्यक्ष मुरली विवेकानंदन म्हणाले की, कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या प्रगतीसाठी खूप प्रयत्न केले आहेत.
  • Kissflow ने आपल्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्झरी BMW कार भेट दिल्यानंतर हे घडले आहे.

IT company gifts cars to 100 employees : नवी दिल्ली : चेन्नईस्थित आयटी फर्मने सोमवारी आपल्या कर्मचाऱ्यांना मारुती कार भेट दिल्या आहेत. या कर्मचाऱ्यांनी कंपनीला सतत साथ दिल्याबद्दल आणि कंपनीच्या यशात, वाढीसाठी अतुलनीय योगदान दिल्याबद्दल तब्बल 100 कार भेट दिल्या. Ideas2IT या चेन्नईस्थित आयटी कंपनीने 100 कर्मचाऱ्यांना मारुती सुझुकीच्या कार भेट दिल्या आहेत. "आम्ही आमच्या 100 कर्मचार्‍यांना 100 कार भेट देत आहोत जे 10 वर्षांहून अधिक काळ आमच्या सोबत आहेत. आमच्याकडे 500 कर्मचारी आहेत. आम्हाला मिळालेली संपत्ती कर्मचाऱ्यांना परत करण्याची आमचे धोरण आहे,"  असे Ideas2IT चे  विपणन प्रमुख,  हरी सुब्रमण्यम म्हणाले. (Chennai based IT company gifted 100 Maruti cars to employees)

अधिक वाचा : Gold Price Today | सोने आले फॉर्मात...सोन्याच्या भावात जबरदस्त तेजी, चांदीदेखील 1,000 रुपयांनी महागली, पाहा ताजा भाव

संपत्ती कर्मचाऱ्यांमध्ये वाटण्याचे धोरण

Ideas2IT चे संस्थापक आणि अध्यक्ष मुरली विवेकानंदन म्हणाले की, ''कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या सुधारणेसाठी खूप प्रयत्न केले आहेत आणि कंपनी त्यांना कार देत नाही, त्यांनी आपल्या मेहनतीने ही कमाई केली आहे.'' श्री विवेकानंदन पुढे म्हणाले की, ''सात-आठ वर्षांपूर्वी आम्ही वचन दिले होते की जेव्हा आम्ही मोठे लक्ष्य साध्य करू तेव्हा आम्ही आमची संपत्ती वाटून घेऊ. या गाड्या देणे ही फक्त पहिली पायरी आहे. नजीकच्या भविष्यात असे आणखी उपक्रम राबविण्याची आमची योजना आहे," 

अधिक वाचा : EWS सर्टिकेटसाठी कसा अप्लाय करायचा ?​​ फॉलो करा या सोप्या स्टेप्स्

कर्मचारी खुशीत

"संस्थेकडून भेटवस्तू मिळणे नेहमीच छान असते; प्रत्येक प्रसंगी, कंपनी सोन्याची नाणी, आयफोन यांसारख्या भेटवस्तू देऊन आपला आनंद शेअर करते. कार ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे," प्रसाद या कर्मचाऱ्याने सांगितले, ज्याने ही भेटवस्तू स्वीकारली. चेन्नई-आधारित सॉफ्टवेअर-एज-ए-सर्व्हिस कंपनी (SaaS) Kissflow ने आपल्या पाच वरिष्ठ अधिकार्‍यांना, प्रत्येकी सुमारे 1 कोटी रुपये किंमतीच्या आलिशान BMW कार भेटवस्तू म्हणून दिल्याच्या काही दिवसांतच हे घडले आहे.

अधिक वाचा : Petrol-Diesel Prices: काय सांगता! चक्क पाच दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

Kissflow Inc या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिल्या बीएमडब्ल्यू कार

माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रातील (IT Career) करियर हे एक आकर्षक क्षेत्र आहे. अनेकवेळा आयटी किंवा सॉफ्टवेअर कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मोठ्या पगारवाढीच्या (Salary Hike) बातम्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. सॉफ्टवेअर डेव्हलपर, प्रॉडक्ट मॅनेजर आणि इतर अशा पदांसाठी या उद्योगात सर्वात जास्त मागणी आहेत. या कामांसाठी आयटी कंपन्या (IT companies) अगदी 100% पगारवाढ देत असल्याचे दिसून येते. आयटी कंपन्या आपल्या वेतन आणि वेतनवाढीने बातम्यांच्या मथळ्यांमध्ये स्थान मिळवत असतात. मात्र आता चेन्नईस्थित आयटी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना भेट म्हणून चक्क बीएमडब्ल्यू कार (BMW Car) दिल्या आहेत.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होमची कार्यसंस्कृती स्वीकारत आयटी कंपन्यांनी लाखो कर्मचाऱ्यांना नोकऱ्या दिल्या आहेत. अशीच एक जबरदस्त कहाणी आहे Kissflow Inc या चेन्नई स्थित सॉफ्टवेअर-एज-ए-सर्व्हिस कंपनीची. किसफ्लो इन्कॉर्पोरेशनने आपल्या पाच कर्मचाऱ्यांना चमकदार नवीन बीमर दिले आहेत. वृत्तसंस्थेकडून समोर आलेल्या वृत्तानुसार, कंपनीने त्यांच्या पाच वरिष्ठ व्यवस्थापन कर्मचार्‍यांना “त्यांच्या निष्ठा आणि वचनबद्धतेचा सन्मान करण्यासाठी” प्रत्येकी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या BMW कार भेट म्हणून दिल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी