IT Company Gifts | अबब! या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना भेट म्हणून दिल्या चक्क BMW कार

BMW car gift : अनेकवेळा आयटी किंवा सॉफ्टवेअर कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मोठ्या पगारवाढीच्या (Salary Hike) बातम्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. आयटी कंपन्या (IT companies) अगदी 100% पगारवाढ देत असल्याचे दिसून येते. आयटी कंपन्या आपल्या वेतन आणि वेतनवाढीने बातम्यांच्या मथळ्यांमध्ये स्थान मिळवत असतात. मात्र आता चेन्नईस्थित आयटी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना भेट म्हणून चक्क बीएमडब्ल्यू कार (BMW Car) दिल्या आहेत.

IT company gifts BMW cars to loyal employees
या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना भेट म्हणून दिल्या चक्क BMW कार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आयटी किंवा सॉफ्टवेअर कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मोठ्या पगारवाढीच्या बातम्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतात
  • चैन्नईस्थित आयटी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना भेट म्हणून चक्क बीएमडब्ल्यू कारदिल्या
  • कंपनीच्या वाढीत योगदान देणाऱ्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांना दिल्या BMW कार

IT company gifts BMWs to employees : नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रातील (IT Career) करियर हे एक आकर्षक क्षेत्र आहे. अनेकवेळा आयटी किंवा सॉफ्टवेअर कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मोठ्या पगारवाढीच्या (Salary Hike) बातम्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. सॉफ्टवेअर डेव्हलपर, प्रॉडक्ट मॅनेजर आणि इतर अशा पदांसाठी या उद्योगात सर्वात जास्त मागणी आहेत. या कामांसाठी आयटी कंपन्या (IT companies) अगदी 100% पगारवाढ देत असल्याचे दिसून येते. आयटी कंपन्या आपल्या वेतन आणि वेतनवाढीने बातम्यांच्या मथळ्यांमध्ये स्थान मिळवत असतात. मात्र आता चेन्नईस्थित आयटी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना भेट म्हणून चक्क बीएमडब्ल्यू कार (BMW Car) दिल्या आहेत. (Chennai based IT company gifts BMW cars to loyal employees)

अधिक वाचा : Relief to Home Buyers | गृहकर्ज होणार स्वस्त... रिझर्व्ह बॅंकेने गृहकर्जाशी निगडीत नियम केले शिथिल

चैन्नईच्या कंपनीतील कहाणी

विशेषत: डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आयटी कंपन्यांमधील करियर अधिकच आकर्षक झाले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होमची कार्यसंस्कृती स्वीकारत आयटी कंपन्यांनी लाखो कर्मचाऱ्यांना नोकऱ्या दिल्या आहेत. अशीच एक जबरदस्त कहाणी आहे Kissflow Inc या चेन्नई स्थित सॉफ्टवेअर-एज-ए-सर्व्हिस कंपनीची. किसफ्लो इन्कॉर्पोरेशनने आपल्या पाच कर्मचाऱ्यांना चमकदार नवीन बीमर दिले आहेत. वृत्तसंस्थेकडून समोर आलेल्या वृत्तानुसार, कंपनीने त्यांच्या पाच वरिष्ठ व्यवस्थापन कर्मचार्‍यांना “त्यांच्या निष्ठा आणि वचनबद्धतेचा सन्मान करण्यासाठी” प्रत्येकी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या BMW कार भेट म्हणून दिल्या आहेत.

अधिक वाचा : Job Search | नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर, व्होडाफोन-आयडिया करवून घेणार सरकारी नोकऱ्यांसाठीची तयारी!

अगदी शेवटच्या क्षणी दिला सुखद धक्का

BMW कार सुपूर्द समारंभ कार्यक्रम हा अगदी काही तास अगोदरपर्यत गुप्त ठेवण्यात आला होता. जेव्हा या 5 भाग्यवान कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले की ते लवकरच नवीन महागड्या गाड्यांचे मालक होणार आहेत तेव्हा त्यांच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. कंपनीने सांगितले की, पाच कर्मचारी कंपनीच्या स्थापनेपासूनच कंपनीसोबत आहेत आणि महामारीच्या काळात कंपनीला साथ दिली. ते पुढे म्हणाले की काही कर्मचारी अगदी साधारण पार्श्वभूमीतून आले होते आणि कंपनीत सामील होण्यापूर्वी त्यांनी महत्त्वपूर्ण आव्हानांना तोंड दिले होते. 

अधिक वाचा : 7th Pay Commission update | सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का! फिटमेंट फॅक्टरसंदर्भात आली मोठी बातमी...

कंपनीत दिले मोठे योगदान

कंपनीला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला कारण तिने साथीच्या आजाराच्या कठीण व्यावसायिक वातावरणात नेव्हिगेट करण्याचा प्रयत्न केला. काही गुंतवणुकदारांनी त्यावेळी कंपनीच्या सुरळीत कामकाजावर शंका उपस्थित केली.  "आज आम्ही खूप आनंदी आहोत की आम्ही गुंतवणुकदारांना पैसे परत केले आहेत आणि आता ती पूर्ण मालकीची खाजगी कंपनी बनली आहे," अशी माहिती Kissflow Inc चे सीईओ सुरेश संबंदम यांनी दिली आहे. गाड्या या पाच जणांसाठी आहेत जेव्हा मी कंपनीला उभे केले आणि त्यासाठी खूप कष्ट केले त्याकाळात जे कर्मचारी माझ्यासोबत उभे राहिले त्या पाच जणांसाठी या गाड्या आहेत. यांनी मला सदैव साथ दिली आहे. जेव्हा इतर कर्मचारी किसफ्लोमधून निघून गेले तेव्हा हे कर्मचारी माझ्यासोबत होते, असे संबंधम पुढे म्हणाले.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी