नागरिकांनी बँकांतून पैसे काढू नये म्हणून चीनच्या रस्त्यांवर आणले रणगाडे

China deploys armoured tanks on road : चीनच्या झेंग्झोमध्ये (Zhengzhou) रस्त्यांवर रणगाडे नियुक्त करण्यात आले आहेत. नागरिकांनी संकटात सापडलेल्या बँकांमधून घाईने पैसे काढू नये यासाठी चीनने हे कठोर पाऊल उचलले आहे.

China deploys tanks to prevent people from withdrawing money from crisis-hit banks grim reminder of Tiananmen Square incident
नागरिकांनी बँकांतून पैसे काढू नये म्हणून चीनच्या रस्त्यांवर आणले रणगाडे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • नागरिकांनी बँकांतून पैसे काढू नये म्हणून चीनच्या रस्त्यांवर आणले रणगाडे
  • नागरिकांनी संकटात सापडलेल्या बँकांमधून घाईने पैसे काढू नये यासाठी चीनने रस्त्यांवर आणले रणगाडे
  • पीपल्स लिबरेशन आर्मीने नागरिकांना घाबरविण्यासाठी रस्त्यांवर रणगाडे नियुक्त केले

China deploys armoured tanks on road : चीनच्या झेंग्झोमध्ये (Zhengzhou) रस्त्यांवर रणगाडे नियुक्त करण्यात आले आहेत. नागरिकांनी संकटात सापडलेल्या बँकांमधून घाईने पैसे काढू नये यासाठी चीनने हे कठोर पाऊल उचलले आहे.

VIVO पाठोपाठ OPPO विरोधात कारवाई, ४३८९ कोटींच्या करचोरीचा सुरू झाला तपास

हेनान प्रांतातील झेंग्झो येथे अनेक बँका एकाचवेळी आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्या आहेत. नागरिकांनी पैसे काढून घेण्यासाठी बँकांच्या शाखांसमोर एकदम गर्दी केली आहे. बँकांच्या शाखांबाहेर गर्दी होत असल्याचे पाहून चीनच्या सरकारी यंत्रणेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. 

जिनपिंग यांच्या तिसऱ्या टर्मला विरोध

नागरिकांनी बँकांतून पैसे काढण्यासाठी रस्त्यावर येऊ नये यासाठी चीनने रस्त्यांवर रणगाडे आणले आहेत. काही ठिकाणी पोलीस आणि पैसे काढण्यासाठी बँकेच्या शाखेबाहेर जमलेले नागरिक यांच्यात संघर्ष झाला आहे. नागरिकांना मागे रेटण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा, लाठ्यांचा मार असे प्रयत्न सुरू आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मीने नागरिकांना घाबरविण्यासाठी रस्त्यांवर रणगाडे नियुक्त केले आहेत. 

याआधी चीनच्या तिआनमेन चौक येथे विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला चिरडण्यासाठी चीन सरकारने रणगाडे रस्त्यांवर आणले होते. रणगाडे आले तरी विद्यार्थी मागे हटत नव्हते. अखेर चीन सरकारने रणगाड्यांच्या मदतीने आंदोलकांना चिरडून ठार करायला सुरुवात केली आणि क्रूरपणे आंदोलन चिरडले होते. तिआनमेन स्क्वेअर (तिआनमेन चौक) या नावाने इतिहासात ही घटना ओळखली जाते. या घटनेला ३३ वर्षे झाली आहेत. हेनान प्रांतातील झेंग्झो येथे चीनचे रणगाडे नागरिकांना घाबरविण्यासाठी रस्त्यावर आले आणि अनेकांना पुन्हा तिआनमेनची आठवण झाली. 

युझोई शिनमिनशेंग व्हिलेज बँक, शांगकाई हयूमिन काउंटी बँक, झेचेंग हुआंगई कम्युनिटी बँक आणि न्यू ओरिएंटल कंट्री बँक ऑफ काइफेंग या सर्व बँका एकाचवेळी संकटात सापडल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्येच भीतीचे वातावरण आहे. पैसे काढण्यासाठी बँकेबाहेर नागरिक गर्दी करत आहेत. पण नागरिकांची भीत दूर करण्याऐवजी चीन सरकारने नागरिकांना घाबरविण्यासाठी रणगाड्यांचा वापर सुरू केला आहे. 

संकटात सापडलेल्या बँका चिनी बँकिंग व्यवस्थेचा एक छोटा भाग आहेत. पण एकाचवेळी एवढ्या बँका संकटात सापडल्या असताना सरकारने नागरिकांच्या हितासाठी ठोस पावले उचलणे अपेक्षित आहे. चीन सरकारने योग्य कृती केली नाही तर या घटना चीनच्या बँकिंग व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास डळमळीत करतील. यातून चीनमध्ये मोठे संकट येऊ शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. चीन सरकार मात्र तज्ज्ञांकडे दुर्लक्ष करून त्यांना योग्य वाटेल त्या पद्धतीने कारवाई करण्यात गुंतले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी