CIBIL Score: जाणून घ्या सिबिल स्कोअर म्हणजे काय? कसा वाढवावा सिबिल स्कोअर 

CIBIL Score: सिबिल स्कोअर बँकिंग किंवा वित्तीय संस्थांमध्ये खूपच महत्वाचा मानला जातो. सिबिल स्कोअर हा तुमच्या क्रेडिट हिस्ट्री दर्शवतो आणि याच स्कोअरच्या आधारावर तुम्हाला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देण्यात येते.

CIBIL Score
सिबिल स्कोअर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जाणून घ्या सिबिल स्कोअर म्हणजे नेमके काय? 
  • सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी काय करावे?
  • ७५० किंवा त्यापेक्षा अधिक सिबिल स्कोअर चांगला मानला जातो

Cibil Score in Marathi: सिबिल स्कोअर (Cibil score) हा तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीची (Credit History) माहिती दर्शवतो. सिबिल स्कोअर हा ३०० ते ९०० च्या दरम्यान गणला जातो. ३०० हा सर्वात कमी तर ९०० हा सर्वात चांगला सिबिल स्कोअर असल्याचं दर्शवतो. सिबिल स्कोअर चांगला असणे याचा अर्थ असा होतो की, तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगला आहे आणि तुम्ही कर्जाची (Loan) परतफेड किंवा क्रेडिट कार्ड (Credit Card) पेमेंट योग्य वेळेत करत आहात. बँकिंग किंवा वित्तीय संस्थांमध्ये सिबिल स्कोअरला खूपच महत्व आहे. 

ट्रान्स युनियन सिबिल लिमिडेट द्वारे सिबिल स्कोअर तयार केला जातो. याला पूर्वी क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड म्हणून ओळखले जात होते. तुम्हाला गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड घ्यायचे असल्यास बँकांकडून सिबिल स्कोअर तपासला जातो त्यामुळे सिबिल स्कोअर चांगला असणे हे खूपच महत्वाचे ठरते. सिबिल स्कोअर हा क्रेडिट हिस्ट्रीचा एक अंकात्मक सारांश आहे जो तुमच्या मागील पेमेंट्सच्या ट्रॅक रेकॉर्ड दर्शवतो. 

'या' गोष्टी लक्षात ठेवा 

७५० इतका सिबिल स्कोअर हा चांगला असल्याचं मानलं जातं आणि वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी पात्र ठरवण्यास आपली मदत करतो. जर आपला सिबिल स्कोअर ७५० पेक्षा कमी असेल तर आपल्याला बँका किंवा एनबीएफसी यांच्याकडून कर्ज घेण्यास अडचणी येतात. तुम्ही कर्ज घेत असताना बँका किंवा वित्तीय संस्था तुमचा सिबिल स्कोअर आधी तपासतात. जाणून घ्या सिबिल स्कोअर कसा असायला हवा.

जर तुम्ही एखादं कर्ज घेतलं असेल किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला असेल तर त्याचा हफ्ता वेळेवर भरा. वेळेवर हफ्ता भरल्यास तुमचा सिबिल स्कोअर सुधारण्यास मदत होते. 

चांगला क्रेडिट स्कोअर मिळवण्यासाठी तुमचा क्रेडिट वापर हा एकूण उत्पन्नाच्या ३० टक्के इतक्यांपर्यंतच असावा. 

सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी काही टिप्स 

  1. आपल्या सिबिल स्कोअरचे परीक्षण करा: सिबिल स्कोअर हा चांगला असल्यास तुम्हाला आवश्यक असलेले कर्ज मंजुर होण्यास मदत होते. सिबिल स्कोअर हा तुमच्या क्रेडिट स्थितीबद्दल माहिती दर्शवतो. तुम्हाला आपल्या सिबिल स्कोअरे परीक्षण करु इच्छित असल्यास तुम्ही तो तपासून घेऊ शकता. 
  2. आपल्या क्रेडिट स्कोअरचे पुनरावलोकन करा: आपल्या क्रेडिट अहवालात त्रुटी मुक्त राहण्यासाठी नियमित स्कोअरचे परीक्षण केले पाहिजे. जर आपल्याला रिपोर्टमध्ये काही चूक आढळली तर त्याचे पुनरावलोकन वेळेत दुरुस्त करावे.
  3. मर्यादित वापर: आपल्या क्रेडिट मर्यादेपेक्षा जास्त खर्च करु नये आणि त्याची खात्री करुन घ्यावी. जर तुम्हाला सिबिल स्कोअर ७५० पर्यंत ठेवायचा असेल तर आपल्या क्रेडिट कार्ड मर्यादेच्या ५० टक्क्यांहून अधिक खर्च करणे टाळा.
  4. वेळेवर देयके: चांगला सिबिल स्कोअर ठेवण्यासाठी वेळेवर कर्जाचे किंवा क्रेडिट कार्डचे हफ्ते भरा. उशीरा पेमेंट टाळा. अन्यथा त्याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवर होतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी