Cinema Halls food items : नवी दिल्ली : कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यापासून सिनेमागृहांमध्ये (Cinema Halls)मोठी गर्दी होत आहे. काही चित्रपटांसाठी (Movies)ते खचाखच भरलेलेही दिसत आहेत. सिनेमा हॉलमध्ये लोकांना हा प्रश्न पडतो की इथे खाद्यपदार्थ (Food Items)इतके महाग का आहेत? सर्वसाधारणपणे येथील खाद्यपदार्थ बाजाराच्या तुलनेत अनेक पटींनी महाग असतात. बाहेरून काही घ्यायचे असले तरी गेटवरच नकार दिला जातो. आता मध्य प्रदेशातील एका व्यक्तीसोबत काही वेगळेच घडले. त्याला चित्रपटाच्या तिकिटांसह दोन नाश्त्याची कूपनही देण्यात आली. जेव्हा या व्यक्तीने तिकिटे खरेदी केली तेव्हा चित्रपटाची दोन तिकिटे (Movie Tickets) होती, ज्याची किंमत 160 रुपये होती. मात्र या तिकिटांसोबतच त्या व्यक्तीकडून दोन ब्रेकफास्ट कूपनचे ६० रुपयेही घेण्यात आले. त्या व्यक्तीने विरोध केल्यावर त्याला दुसऱ्या सिनेमागृहात जाण्यास सांगण्यात आले. तक्रारदाराने यासंदर्भात ग्राहक मंचात तक्रार केली. (Cinema Hall to pay Rs 40,000 for misselling the food items coupen to viewer)
नाश्त्याच्या कुपनचे पैसे बळजबरीने कापून घेतल्याची बाब तक्रारदाराने जिल्हा ग्राहक मंचाकडे नेली. राजस्थान पत्रिकाच्या वृत्तानुसार, जिल्हा ग्राहक मंचाकडून हे प्रकरण भोपाळ येथील राज्य ग्राहक आयोगाकडे गेले. इथे पीडितेला न्याय मिळाला आणि आता सिनेमागृहाला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. आयोगाने कूपनच्या रकमेसोबत पीडितेला 40,000 रुपये द्यावेत, असा निर्णय दिला.
वास्तविक, हे प्रकरण 2015 सालचे आहे, मात्र त्याचा निर्णय आता आला आहे. जबलपूर येथील पीडित पिडी बखले पत्नीसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्यांनी प्रत्येकी 80 रुपयांना दोन तिकिटे खरेदी केली होती. मात्र सिनेमागृहात प्रत्येकी ३० रुपयांच्या दोन ब्रेक फास्ट कूपनचे पैसेही त्याच्याकडून घेण्यात आले. ब्रेक फास्ट कूपनही मागितली नसताना ती बळजबरीने का देण्यात आली हे पाहून बाचले थक्क झाले. तर चित्रपटाच्या तिकिटांवर ब्रेक फास्ट कूपनबद्दल काहीही लिहिलेले नव्हते.
अधिक वाचा : LPG Price: घरगुती सिलेंडरच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ; सर्वसामान्यांना बसला मोठा झटका
बखले यांनी हे कूपन नको, असे सांगताच त्यांना कुपन घेणे आवश्यक आहे, अन्यथा दुसऱ्या सिनेमागृहात जा, असे सांगण्यात आले. याप्रकरणी आता ग्राहक आयोगाने पीडित बखले यांना न्याय दिला आहे. बखले यांनी आयोगाकडे कुपनची रक्कम तसेच मानसिक व शारीरिक नुकसानभरपाई आणि खटल्याच्या खर्चासाठी 40 हजार रुपयांची मागणी केली होती. आता आयोगाच्या सूचनेनुसार सिनेमा हॉल तक्रारदाराला कुपनच्या रकमेसह ४40 हजार रुपये देणार आहे.
अनेक ठिकाणी सिनेमागृहात विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे दर अव्वाच्या सव्वा असतात. चित्रपटाच्या तिकिटाइतकाच खर्च किंवा काहीवेळा त्याहीपेक्षा जास्त खर्च त्या खाद्यपदार्थांवर करावा लागतो. ग्राहक अनेकवेळा यासंदर्भात तक्रारदेखील करत असतात. मात्र सिनेमागृह जास्तीत जास्त कमाई करण्याच्या हेतूने अनेकवेळा महागडे खाद्यपदार्थ सिनेमागृहात विकत असतात.