सिटी बँक समूह भारतातील आपला कारभार गुंडाळणार, भारतीय बँकांना कारभारासाठी मिळू शकते संधी

काम-धंदा
Updated Apr 17, 2021 | 11:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

सिटी बँकेच्या निर्णयामुळे इतर बँका आणि स्टेट बँक ऑफ इंडिया कार्डसारख्या कंपन्यांना फायदा होऊ शकतो. या बँकेचे एकूण 27 लाख क्रेडिट कार्ड ग्राहक आहेत आणि ही भारतातील सहावी सर्वाधिक क्रेडिट कार्ड देणारी बँक आहे.

Citi bank group
सिटी बँक समूह भारतातील आपला कारभार गुंडाळणार, भारतीय बँकांना कारभारासाठी मिळू शकते संधी  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • ग्लोबल बिझनेस धोरणांतर्गत उचलले पाऊल
  • निवडक देशांमधील रिटेल क्षेत्रातूनही बाहेर पडणार सिटी बँक
  • भारतीय कार्ड कंपन्यांना मिळणार चांगली संधी

नवी दिल्ली: बँकिंग कंपनी (Banking company) असलेल्या सिटी बँक समुहाने (Citi Bank Group) भारतातील (India) रिटेल बँकिंग (retail banking) थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सिटी बँकेने याबद्दलची माहिती दिली आहे. त्यांनी भारतासह आशिया (Asia), मध्य पूर्व (middle East), युरोप (Europe) आणि आफ्रिकेतील (Africa) 13 नव्याने उभ्या राहात असलेल्या बाजारपेठांतील (markets) रिटेल बँकिंगच्या व्यवसायातून (retail banking business) बाहेर (exit) पडण्याची घोषणा (announcement) केली आहे.

ग्लोबल बिजनेस धोरणांतर्गत उचलले पाऊल

सिटी बँक समुहाने हा निर्णय आपल्या ग्लोबल बिझनेस धोरणाच्या अंतर्गत घेतला आहे. बँकेच्या या निर्णयामुळे इतर बँका आणि आणि एसबीआय कार्डसारख्या कंपन्यांना फायदा होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. सिटी बँकेचे एकूण 27 लाख क्रेडिट कार्ड ग्राहक आहेत आणि ही बँक भारतातील सहावी सर्वाधिक क्रेडिट कार्ड देणारी बँक आहे.

या देशांमधील रीटेल क्षेत्रातूनही बाहेर पडणार सिटी बँक

सिटीबँक समूह हा फक्त भारतातूनच नव्हे, तर ऑस्ट्रेलिया, बहारिन, चीन, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, मलेशिया, फिलीपीन्स, रशिया, तैवान, थायलँड आणि व्हिएतनाम या देशांमधीलही व्यवसायातून बाहेर पडणार आहे.

भारतीय कार्ड कंपन्यांना मिळणार चांगली संधी

भारताच्या रिटेल बँकिंगच्या क्षेत्रातून सिटी बँक समुहाच्या बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे भारतातील इतर कार्ड कंपन्यांना या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी चांगली संधी मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. याचा फायदा एसबीआय कार्ड, एच. डी. एफ. सी. बँक, अॅक्सिस बँक, आय. सी. आय. सी. आय. बँक अशा कंपन्यांना मिळण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी