Ration Card | आता रेशन कार्डांच्या सर्व सुविधा आणि समस्यांसाठी, 'मेरा राशन अॅप'

Mera Ration App | मेरा रेशन अॅपच्या मदतीने रेशन कार्डसाठी नोंदणी करता येते. याशिवाय रेशन कार्डला डाउनलोड केले जाऊ शकते. तुमचे रेशन कार्ड, आधार कार्डशी लिंक आहे की नाही याचीदेखील पडताळणी केली जाऊ शकते. शिवाय आधार कार्ड, रेशन कार्डशी लिंकदेखील केले जाऊ शकते. याशिवाय तुमच्या रेशन कार्डवर आतापर्यत किती धान्याचे वितरण करण्यात आले आहे आणि तुमच्या घराच्या जवळपास कुठे रेशन दुकान आहे, याची देखील माहिती घेता येते.

Mera Ration App
मेरा राशन अॅप 
थोडं पण कामाचं
  • केंद्र सरकारने रेशन कार्डच्या सुविधेसाठी लॉंच केले मेरा राशन अॅप
  • या अॅपद्वारे रेशन कार्डशी निगडीत सेवा मिळवता येणार
  • रेशन कार्डशी संबंधित अडचणी किंवा बदलदेखील या अॅपद्वारे करता येणार

Ration Card | नवी दिल्ली : केंद्र सरकारने वन नेशन वन राशन कार्ड योजनेअंतर्गत मेरा राशन (Mera Ration App)हे मोबाइल अॅप लॉंच केले आहे. या अॅपच्या मदतीने रेशन कार्डासंबंधीची (Ration card)अनेक कामे केली जाऊ शकतात. रेशन कार्डधारकांना पीडीएसच्या (PDS)मदतीने धान्य मिळते. अर्थात नागरिक जेव्हा दुसऱ्या राज्यात नोकरी किंवा रोजगारासाठी जातात तेव्हा त्यांना यात थोडीशी अडचण येते. या प्रकारच्या आणि इतर अनेक अडचणींना दूर करण्यासाठी मेरा रेशन अॅप लॉंच करण्यात आले आहे. (Citizens can avail all the facilities & problems regarding Ration card through Mera Ration App)

मेरा रेशन अॅपच्या मदतीने रेशन कार्डसाठी नोंदणी करता येते. याशिवाय रेशन कार्डला डाउनलोड केले जाऊ शकते. तुमचे रेशन कार्ड, आधार कार्डशी लिंक आहे की नाही याचीदेखील पडताळणी केली जाऊ शकते. शिवाय आधार कार्ड, रेशन कार्डशी लिंकदेखील केले जाऊ शकते. याशिवाय तुमच्या रेशन कार्डवर आतापर्यत किती धान्याचे वितरण करण्यात आले आहे आणि तुमच्या घराच्या जवळपास कुठे रेशन दुकान आहे, याची देखील माहिती घेता येते. जर तुम्हाला रेशन दुकान किंवा रेशन डीलर बदलायचा असेल तर त्याची सुविधादेखील या मोबाइल अॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अॅपवर १० वेगवेगळ्या भाषेत या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

रेशन कार्डासंबंधीच्या सर्व सुविधा उपलब्ध

जर तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात राहण्यासाठी जात असाल तर तुम्ही या अॅपमधील रजिस्ट्रेशनवाल्या पर्यायावर जा. तिथे मायग्रेशनची सुविधा देण्यात आली आहे. नो युवर एनटायलटलमेंट पर्यायाच्या मदतीने तुम्ही तुम्हाला मिळणाऱ्या सुविधांबद्दल माहिती घेऊ शकता. रेशन कार्ड नंबर आणि आधार नंबरच्या मदतीने या सुविधेचा लाभ घेता येतो. इथे तुम्हाला माहिती मिळेल की रेशन कार्डधारकांना कोणकोणत्या वस्तू मिळत आहेत.

मेरा राशन अॅप

मेरा राशन या मोबाइल अॅपला भारत सरकारने १२ मार्च २०२१ला लॉंच केले होते. एनएफएसएच्या लाभार्थ्यांना, खास करून प्रवाशांना रेशन कार्ड पोर्टेबिलिटीचा लाभ उचलण्यासाठी ओएनओआरसी योजनेअंतर्गत या अॅपला लॉंच करण्यात आले होते. हे अॅप हिंदी आणि इंग्रजीसह १० भाषांमध्ये उपलब्ध आहे. 

मेरा रेशन अॅपचे फायदे-

  1. योग्य मूल्य असणाऱ्या दुकानाची माहिती मिळवा
  2. धान्याच्या पात्रतेची माहिती घ्या
  3. अलीकडच्या काळात केलेल्या ट्रान्झॅक्शनची माहिती घ्या
  4. आधार लिंक झाले आहे की नाही याचे स्टेटस पाहा
  5. प्रवासी आपल्या मायग्रेशनची  माहिती या अॅपद्वारे रजिस्टर करू शकतात
  6. सूचना देण्याचा पर्याय उपलब्ध

आधार नंबरने करा लॉग इन

लाभार्थी आधार किंवा रेशन कार्ड नंबरद्वारे मेरा रेशन मोबाइल अॅपवर लॉग इन करू शकणार आहेत. सरकार ५.४ लाख रेशन दुकांनाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला दरमहा ५ किलो सब्सिडी असणारे धान्य पुरवते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी