GST on Cloths-Shoes | महागाईचा आणखी दणका! कपडे, पादत्राणे होणार महाग, जीएसटी कौन्सिलचा निर्णय

Clothing and Footwear prices | जानेवारील २०२२ पासून कपडे आणि बुटांच्या किंमतीत वाढ (price hike in clothing & footwear) होऊ शकते. जीएसटी कौन्सिलने (GST council) कपडे आणि बुट यांच्या बाबतील शुल्कातील बदलाची मागणी मान्य केली आहे. एक जानेवारी २०२२ पासून ही नवीन शुल्क रचना लागू करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते आहे. यानंतर कपडे, बूट या वस्तूंच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे.

Clothing and Footwear prices
कपडे आणि पादत्राणे होणार महाग  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सर्वसामान्य ग्राहकाला कपडे (Clothing) आणि पादत्राणांच्या (Footwear) बाबतीतील महागाईला तोंड द्यावे लागणार
  • जानेवारी पासून कपडे आणि पादत्राणांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता
  • जीसएटी कौन्सिलने या क्षेत्राशी निगडीत जीएसटी करातील बदल स्वीकारल्याचा परिणाम

GST Council | नवी दिल्ली : मागील काही कालावधीपासून सर्वसामान्य माणसाला महागाईचा (Inflation) दणका सहन करावा लागतो आहे. त्यातच आता आणखी एक फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. आता कपडे (Clothing) आणि पादत्राणांच्या (Footwear) बाबतीतील महागाईला तोंड द्यावे लागणार आहे. पुढील महिन्यापासून ही महागाई होणार आहे. १ जानेवारील २०२२ पासून कपडे आणि बुटांच्या किंमतीत वाढ (price hike in clothing & footwear) होऊ शकते. जीएसटी कौन्सिलने (GST council) कपडे आणि बुट यांच्या बाबतील शुल्कातील बदलाची मागणी मान्य केली आहे. एक जानेवारी २०२२ पासून ही नवीन शुल्क रचना लागू करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते आहे. यानंतर कपडे, बूट या वस्तूंच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे. (Clothing & Footwear may become expensive from January 2022 due to change in GST tax)

अनेक दिवसांपासून होती मागणी

कपडे आणि पादत्राण व्यवसायाकडून अनेक दिवसांपासून या क्षेत्राशी निगडीत जीएसटी कराची रचना बदलण्याची मागणी करण्यात येत होती. या क्षेत्रातील व्यावसायिकांचे म्हणणे होते की पादत्राणे बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर १२ टक्के जीएसटी कर लागतो तर तयार उत्पादनावर फक्त ५ टक्के जीएसटी कर लागतो. त्यामुळे या क्षेत्रातील व्यावसायिकांचे नुकसान टाळण्यासाठी कच्च्या मालावर आकारण्यात येत असलेला जास्तीचा जीएसटी कर परत केला जावा. त्यानंतर आता जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत कपडे आणि पादत्राणांच्या क्षेत्रात इनव्हर्टेड शुल्काच्या रचनेचा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

१ जानेवारीपासून कपडे, पादत्राणे महागणार

कपडे आणि पादत्राणे यांच्यावर सध्या ५ टक्क्यांपासून १८ टक्क्यांपर्यत जीएसटी कर लागतो. जीएसटी कौन्सिलच्या नव्या निर्णयानंतर जानेवारी महिन्यापासून कपड्यांच्या किंमतीत वाढ होणार आहे. कपडे आणि पादत्राणांवरील जीएसटी कर वाढल्याचा थेट भार ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे.

यामुळे वाढणार किंमत

सध्या एमएमएफ फॅब्रिक सेगमेंटमध्ये (फायबर आणि यार्न) इनपुटवर १८ टक्के आणि १२ टक्के जीएसटी कर लागतो. तर एमएमएफ फॅब्रिकवर ५ टक्के जीएसटी आणि तयार मालावर ५ टक्के आणि १२ टक्के जीएसटी आकारला जातो. इनपुटवर लागणारा जीएसटी कर हा आउटपुट पेक्षा जास्त असतो. त्यामुळेच एमएमएफ कपड्यांसंदर्भात लागणारा कर वाढत जातो.

अनेक कार उत्पादक कंपन्या आपल्या कारच्या किंमतीमध्ये वाढ करणार आहेत. गाडीसाठी लागणाऱ्य़ा अनेक वस्तूंची किंमत वाढल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे. आता याचा भार ग्राहकांनाही बसणार आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या अनेक मॉडेल्सच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. मार्च, जुलै आणि सप्टेंबर महिन्यात गाड्यांच्या किंमती वाढवण्याचे कंपन्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे आता वाढलेल्या किंमतींचा बोझा सर्वसामान्य ग्राहकांवरच पडणार आहे. सुझुकी, ऑडी आणि मर्सिडीज बेंझ  इंडिया या कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ केल्याचे जाहीर केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी