cng 67 rs per kg and png 41 rs per kg in mumabi and mmr : मुंबई : महामुंबईत (Mumbai Metropolitan Region - MMR / मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्र) नव्या दरानुसार सीएनजी (Compressed natural gas - CNG) ६७ रुपये प्रति किलो आणि घरगुती वापराचा पीएनजी (Piped Natural Gas - PNG) ४१ रुपये प्रति किलो या दराने उपलब्ध आहे. याआधी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सीएनजी ६० रुपये प्रति किलो आणि घरगुती वापराचा पीएनजी ३६ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होता.
ओला कॅबमध्ये एसी हवा तर खिशातही पैसा हवा
कुस्तीत मुलीने मुलाला हरवून जिंकले पुरस्कार
महाराष्ट्रात सीएनजी आणि पीएनजीचे दर राज्य शासनाने वॅट मर्यादीत प्रमाणात कमी केल्यामुळे घटले होते. पण महानगर गॅस कंपनीने पुन्हा एकदा दरवाढ केल्यामुळे स्वस्त गॅसचा आनंद जेमतेम पाच दिवस टिकला.
महाराष्ट्र शासनाने गॅसवरील वॅट साडेतेरा टक्क्यांनी कमी केल्यानंतर महानगर गॅस कंपनीने १ एप्रिल २०२२ पासून सीएनजी ६० रुपये प्रति किलो आणि घरगुती वापराचा पीएनजी ३६ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध केला होता. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार तसेच गॅस उत्पादन आणि पुरवठा या व्यवस्थेवरील खर्च यांचा ताळमेळ बसविण्यासाठी पुन्हा एकदा महानगर गॅस कंपनीने सीएनजी ६७ रुपये प्रति किलो आणि घरगुती वापराचा पीएनजी ४१ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात मार्च महिन्यात सीएनजी ६७ रुपये प्रति किलो आणि घरगुती वापराचा पीएनजी ४१ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होता. पण पाच दिवस दरकपात आणि नंतर पुन्हा जुना दर लागू झाला आहे. या बदलाचे निमित्त करून अॅप बेस्ड कॅब सर्व्हिस कंपन्यांनी दरवाढ केली आहे. रिक्षा टॅक्सी संघटनाही दरवाढ करण्याची मागणी राज्य शासनाकडे करू लागल्या आहेत. जास्तीचे पैसे मिळणार नसल्यास ग्राहकांसाठी एसी चालविणे कठीण आहे. आमचे बजेट कोलमडले आहे, असे कॅब चालकांचे म्हणणे आहे.