खुशखबर ! CNG आणि PNG गॅस 8 रुपयांनी स्वस्त, अदानी आणि महानगरच्या ग्राहकांना दिलासा

CNG-PNG Price Reduce: CNG आणि PNG च्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात किलोमागे आठ रुपये आणि पीएनजीच्या किमतीत पाच रुपयांनी प्रति घन सेंटीमीटर कपात करण्यात आली आहे.

CNG and PNG prices reduced by Rs 8, MGL & adani also made a big cut in prices
खुशखबर ! CNG आणि PNG गॅस 8 रुपयांची स्वस्त, अदानी आणि महानगरच्या ग्राहकांना दिलासा ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत 8 रुपयांनी कपात
  • एमजीएलनेही किमतीत मोठी कपात केली आहे
  • एमजीएल आणि अदानी टोटल गॅसच्या ग्राहकांनाही दिलासा

CNG- PNG Price:  वाढत्या महागाईने सर्वसामान्य माणूस त्रस्त असताना एक आनंदाची बातमी आली आहे. आता रस्त्यावरून गाडी चालवणे थोडे स्वस्त झाले आहे. यासोबतच स्वयंपाकघरातील गृहिणींनाही दिलासा मिळाला आहे. CNG-PNG च्या किमतीत मोठा घट झाली आहे. अदानी टोटल गॅस आणि महानगर गॅसने त्यांच्या किमती कमी केल्या आहेत. (CNG and PNG prices reduced by Rs 8, MGL & adani also made a big cut in prices)

अधिक वाचा : Reliance in icecream : मुकेश अंबानींचा रिलायन्स उद्योग समूह आईस्क्रीम उद्योगात एन्ट्री करणार

सीएनजीच्या दरात आठ रुपयांनी, तर पीएनजीच्या दरात पाच रुपयांनी घट झाली आहे. अदानी टोटल गॅस लिमिटेडसाठी पीएनजीच्या किमतीत 8.13 रुपये प्रति किलो आणि 5.06 रुपये प्रति घन सेंटीमीटरने कपात केली आहे. अदानी टोटल गॅस लिमिटेडने शुक्रवारी १९ क्षेत्रांमध्ये कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आणि पाइप्ड नॅचरल गॅसच्या किमती कमी केल्याची घोषणा केली. नवीन दर अद्ययावत करण्यात आले आहेत. नैसर्गिक वायूच्या किमतीतील ही कपात 8 एप्रिल 2023 पासून लागू झाली आहे.

अधिक वाचा : CRPF Sarkari Naukri 2023 : सीआरपीएफच्या 1.30 लाख कॉन्स्टेबल पदांवर होणार भरती

नैसर्गिक वायूच्या किमतीत ही कपात अशा वेळी झाली आहे जेव्हा मंत्रिमंडळाने नैसर्गिक वायूच्या किमतींसाठी नवीन मूल्य निर्धारण यंत्रणा जाहीर केली आहे. या नवीन प्रणालीच्या घोषणेनंतरच सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी झाल्या आहेत. 

अधिक वाचा : Multibagger Stock: 1 लाखाची गुंतवणूक करणाऱ्यांना 'या' शेअरने 6 महिन्यात दिले 28 लाख

एमजीएलकडून सीएनजीची सुधारित किंमत 79 रुपये प्रति किलो आणि घरगुती पीएनजीची किंमत 49 रुपये प्रति एससीएम करण्यात आली आहे, ही 7 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू होईल. या कपातीमुळे सीएनजी पेट्रोलच्या तुलनेत 49 टक्के आणि डिझेलपेक्षा 16 टक्के स्वस्त झाला आहे, तर घरगुती पीएनजी एलपीजीपेक्षा 21 टक्के स्वस्त झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी