CNG Price Hike | पुण्यात सीएनजी 2.20 रुपयांनी महाग, आजपासून मोजावी लागेल एवढी किंमत...

CNG price in Pune : पुण्यात शुक्रवारी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (CNG) दरात प्रति किलो 2.20 रुपयांची वाढ झाली. एप्रिलमधील ही तिसरी दरवाढ असून, पुण्यात (Pune) सीएनजीचे दर प्रतिकिलो 77 रुपये झाले आहेत. पुणे शहरात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG price) ची किंमत 2.20 रुपयांनी वाढली आहे. शुक्रवारपासून (29 एप्रिल) त्याची किंमत 77.20 रुपये प्रति किलो असेल,” असे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितले.

CNG price hike in Pune
पुण्यात सीएनजी झाला आणखी महाग 
थोडं पण कामाचं
  • पुण्यात सीएनजी झाला आणखी महाग
  • प्रति किलो 2.20 रुपयांनी झाली वाढ
  • याआधी 13 एप्रिलला झाली होती 5 रुपयांची वाढ

CNG Price in Pune : पुणे : पुण्यात शुक्रवारी कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (CNG) दरात प्रति किलो 2.20 रुपयांची वाढ झाली. एप्रिलमधील ही तिसरी दरवाढ असून, पुण्यात (Pune) सीएनजीचे दर प्रतिकिलो 77 रुपये झाले आहेत. पुणे शहरात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG price) ची किंमत 2.20 रुपयांनी वाढली आहे. शुक्रवारपासून (29 एप्रिल) त्याची किंमत 77.20 रुपये प्रति किलो असेल,” असे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितले. यापूर्वी, पुण्यातील सीएनजीच्या दरात 13 एप्रिल रोजी 5 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. “6 एप्रिलपर्यंत सीएनजीची किंमत 68 रुपये प्रति किलो होती, ती 13 एप्रिलपासून पुण्यात 73 रुपये प्रति किलो झाली होती,” असे दारूवाला यांनी त्यावेळेस सांगितले होते.
इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. आधीच मोठ्या महागाईला तोंड देत असलेल्या नागरिकांच्या अडचणीत इंधन दरवाढीने आणखी भर पडत आहे. (CNG becomes Rs 2.20 costlier in Pune, check the latest rate)

अधिक वाचा : Gold price today | सोने-चांदीच्या भावात आज झाली वाढ मात्र अजूनही उच्चांकीच्या बरेच खाली...आहे खरेदीची संधी, पाहा ताजा भाव

सीएनजीत मिसळल्या जाणाऱ्या गॅसमुळे दरवाढ

6 एप्रिल रोजी पुण्यात सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली कारण शहरात 6 रुपयांनी प्रतिकिलो वाढ झाली. सीएनजीच्या किंमतीत वाढ झाल्याबद्दल बोलताना दारूवाला यांनी यापूर्वी सीएनजीच्या मिश्रणात जोडल्या जाणाऱ्या विशिष्ट आयातित गॅसच्या आंतरराष्ट्रीय किंमतीत झालेली वाढ हे त्याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले होते.

अधिक वाचा :  LIC IPO | एलआयसी आयपीओबद्दल जाणून घ्या सर्वकाही...पुढील आठवड्यात आयपीओ सुरू होईल, तुम्ही गुंतवणूक करावी का?

आंतरराष्ट्रीय बाजारात त्या गॅसचे दर दुप्पट

“या प्रचंड वाढीचे मुख्य कारण म्हणजे सीएनजीच्या मिश्रणात एका विशिष्ट आयातित गॅसच्या किंमतीत वाढ होणे हे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या विशिष्ट गॅसची आंतरराष्ट्रीय किंमत दुप्पट करण्यात आली आहे,”असे  दारूवाला म्हणाले.

अधिक वाचा : Maharashtra Cabinet Meeting on 28th april 2022 : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतले ९ महत्त्वाचे निर्णय

महाराष्ट्रात पीयूसी दरात वाढ

महाराष्ट्रातील पीयूसी दरात वाढ (PUC rate)झाली आहे.  प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहनांद्वारे होणारे वायू प्रदूषण (Air Pollution) कमी करण्यासाठी वाहनांची चाचणी केली जाते. वाहनांद्वारे किती प्रदूषण होते आहे किंवा हे प्रदूषण नियंत्रणात आहे की नाही हे पाहण्यासाठी वाहनांची प्रदूषणासंदर्भातील एक चाचणी केली जाते. या चाचणीला पीयूसी (पोल्युशन अंडर कंट्रोल) (PUC) म्हणतात. पीयुसी करणारी केंद्रे पेट्रोल पंप, रस्त्यावर, मध्यवर्ती भागात अनेक ठिकाणी असतात. मोबाईल व्हॅनमध्ये ही केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे वाहन चालकांना रस्त्यावरून जाता येताच आपल्या वाहनाची प्रदूषण करणे सोपे होते.  महाराष्ट्रातील पीयूसीचे दर (Maharashtra PUC rate) आता वाढले आहेत. याबाबत एक परिपत्रक काढून माहिती देण्यात आली आहे. 

परिवहन आयुक्तांच्या कार्यालयाकडून पीयूसी संदर्भात एक परिपत्रक काढण्यात आले आहे. यात मोटार वाहनांची वायूप्रदूषणाची चाचणी करण्यासंदर्भातील शुल्कवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील वायू प्रदूषण नियंत्रण केंद्रांनी वाहनांच्या वायू प्रदूषण चाचणीसाठी आकारायच्या शुल्कात सुधारणा करून वाढीस मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या 25 एप्रिल 2022 च्या निर्देशानुसार राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरात वाढ लागू करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी