मुंबई: इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांना प्रवास करणं महाग होऊ लागले आहे. दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर नागरिकांनी सीएनजी-पीएनजीवरील वाहनांचा पर्याय निवडला. परंतु आता जीएनजी आणि पीएनजच्या दरातही वाढ होत असल्यानं नागरिकांचा बजेट कोलमडला आहे. आज पेट्रोल-डिझेलचे दर जरी वाढले नसतील तर 22 मार्चपासून सुरू झालेली पेट्रोल आणि डिझेलची किंमत 14 वेळा वाढल्या आहेत. तर पीएनजी आणि सीएनजीच्याही दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. सुधारित दरानुसार सीएनजी प्रति किलो 5 रुपयांनी, तर घरगुती पाईप अर्थात PNG साडेचार रुपयांनी महागला आहे. आज सकाळपासून नवीन दर अस्तित्वात आले आहेत.
महानगर गॅस लिमिटेडने एक निवेदन जारी करुन ही दरवाढ जाहीर केली आहे. या नव्या दरवाढीमुळे सीएनजीचा दर किलोमागे 72 रुपये झाला आहे तर घरगुती पाईप अर्थात PNG चा दर आता किलोमागे 45.50 रुपये इतका झाला आहे. त्या आधी 6 एप्रिल रोजी मुंबईत सीएनजीच्या किमतीत 7 रुपयांची तर पीएनजीच्या किमतीत 5 रुपयांची वाढ करण्यात आली होती. 1 एप्रिलला राज्य सरकारने नैसर्गिक वायूवरील व्हॅटमध्ये कपात केली होती. मात्र सलग दोनवेळा झालेल्या दरवाढीनं सीएनजी, पीएनजीचे दर पुन्हा एकदा मूळ किमतीवर पोहोचले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने केलेल्या व्हॅट कपातीचा ग्राहकांना फायदा झालाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महानगर गॅस लिमिटेच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाल्याने आज सकाळी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना सीएनजी आणि पाईप्ड कुकिंग गॅसमधील दरवाढ पाहायला मिळाली. 1 एप्रिलला राज्य सरकारनं नैसर्गिक वायूवरील व्हॅटमध्ये कपात केली होती. मात्र सलग दोन वेळा झालेल्या दरवाढीनं सीएनजी, पीएनजीचे दर पुन्हा एकदा मूळ किमतीवर पोहोचले आहेत.
तीन लाख खाजगी वाहनांव्यतिरिक्त, शहरात पाच लाख सार्वजनिक वाहतूक वाहनं आहेत, ज्यात रिक्षा, टॅक्सी आणि बस यांचा समावेश आहे, जे नैसर्गिक इंधनावर अवलंबून आहेत. सीएनजीमध्ये झालेल्या दरवाढीचा मोठा फटका टॅक्सी आणि रिक्षाचालकांना बसत आहे. परिणामी टॅक्सी आणि रिक्षाच्या भाड्यात दोन ते पाच रुपयांनी वाढ करण्याची मागणी संघटनेने केली आहे. त्यामुळे राज्य सरकारनं केलेल्या व्हॅट कपातीचा ग्राहकांना फायदा झालाच नसल्याचं स्पष्ट झालंय. या दरवाढीमुळे आता टॅक्सी, रिक्षाची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.
सीएनजीमध्ये झालेल्या दरवाढीनंतर ओला आणि उबरसारख्या मोबाईल ॲप आधारित टॅक्सी कंपन्यांनीही भाड्यामध्ये वाढ करण्याची तयारी केली आहे. सीएनजीच्या दरात झालेली वाढ पाहता, प्रवाशांसाठी कॅबमधील एसी चालू करण्याची आमची अजिबात तयारी नाही. वाढलेल्या किमतीमुळे आमचं बजेट कोलमडलं आहे, अशी प्रतिक्रिया एका कॅब चालकाने दिली.