CNG Latest Rate: सहा दिवसांत दुसऱ्यांदा CNG च्या दरात वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील दरवाढ

काम-धंदा
Updated May 21, 2022 | 12:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

CNG Latest Rate । देशभरात पेट्रोलियम पदार्थांची दरवाढ सुरूच आहे. आता सरकारने पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ केली आहे.

CNG price hike for second time in 6 days
सहा दिवसांत दुसऱ्यांदा CNG च्या दरात वाढ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • देशभरात पेट्रोलियम पदार्थांची दरवाढ सुरूच आहे.
  • सरकारने पुन्हा एकदा सीएनजीच्या (CNG) दरात वाढ केली आहे.
  • दिल्ली-NCR आणि आसपासच्या भागात CNG प्रति किलो २ रुपयांनी महागला आहे.

CNG Latest Rate । नवी दिल्ली : देशभरात पेट्रोलियम पदार्थांची दरवाढ सुरूच आहे. आता सरकारने पुन्हा एकदा सीएनजीच्या (CNG) दरात वाढ केली आहे. IGL ने दिल्ली-NCR आणि आसपासच्या भागात CNG प्रति किलो २ रुपयांनी महाग केला आहे. ही वाढीव किंमत शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून लागू करण्यात आली आहे. या घोषणेमुळे नोएडा-ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये CNG ७८.१७ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. (CNG price hike for second time in 6 days). 

अधिक वाचा : पुरूषांच्या या ४ सवयींवर फिदा होतात मुली

दिल्लीत आता ७५.६१ रूपये प्रति किलो CNG 

जर गुरूग्रामबद्दल भाष्य करायचे झाले तर, इथे सीएनजीची किंमत ८३.९४ रूपये प्रति किलो आणि दिल्लीमध्ये ७५.६१ रूपये प्रति किलो झाली आहे. मागील ६ दिवसांत सीएनजीच्या दरात झालेली ही सलग दुसरी वाढ आहे. यापूर्वी १५ मे रोजी सीएनजीच्या किमतीत १ रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

रेवाडी-कानपूरमध्येही झाली वाढ

रेवाडीतील सीएनजीची किंमत आता ८४.२७ रुपये प्रति किलोवरून ८६.०७ रुपये प्रति किलो झाली आहे. कर्नाल आणि कॅथलमध्ये सीएनजीची किंमत ८२.२७ रुपये प्रति किलोवरून आता ८४.२७ रुपये प्रति किलो झाली आहे. तर मुझफ्फरनगरमध्ये सीएनजीची किंमत ८०.८४ रुपये प्रति किलोवरून ८२.८४ रुपये आणि कानपूरमध्ये ८५.४० रुपयांवरून ८७.४० रुपये प्रति किलो झाली आहे.

सर्वसामान्यांना मोठा झटका 

जर आपण पेट्रोल आणि डिझेलबद्दल भाष्य केले तर देशभरात त्यांच्या किंमती सतत १०० रुपयांच्या वर जात आहेत. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या म्हणजेच एलपीजी गॅसच्या सिलेंडरनेही एक हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या समस्या वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईमुळे मालाची वाहतूक आणि लोकांची ये-जा करणेही महाग झाले असून, ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे वाढत्या इंधनाच्या किंमतींमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी