CNG Car Sale Drops : सीएनजी गाड्यांच्या विक्रीत 12 टक्क्यांची घट, कारण 2 महिन्यांत 18 रुपये किलो महाग झाला सीएनजी...

CNG Vehicle : सीएनजी गॅसच्या दरात वाढ (CNG Gas Price) मागील काही महिन्यांपासून मोठी वाढ होते आहे. सीएनजी गॅसच्या दरात वाढ झाल्याचा परिणाम सीएनजी वाहनांच्या विक्रीवरही (CNG Vehicle Sale) दिसून येत आहे. मार्चमध्ये 35,069 चा सार्वकालिक उच्चांक गाठल्यानंतर, सीएनजी+पेट्रोलवर (CNG+ Petrol)चालणाऱ्या कारची विक्री मे महिन्यात 11.58% नी घसरत 31,008 वर आली. सीएनजीच्या दरात झालेली वाढ हे यामागचे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञ सांगतायेत.

CNG Vehicle Sale Drops
सीएनजी वाहनांच्या विक्रीत झाली घट 
थोडं पण कामाचं
  • सीएनजी वाहनांच्या विक्रीत मागील दोन महिन्यात मोठी घट
  • मागील दोन महिन्यात सीएनजी गॅस 18 रुपयांनी महागला
  • अनेक शहरांमध्ये सीएनजीचा दर 85 रुपयांच्या वर

CNG Price Hike Impact : नवी दिल्ली : सीएनजी गॅसच्या दरात वाढ (CNG Gas Price) मागील काही महिन्यांपासून मोठी वाढ होते आहे. सीएनजी गॅसच्या दरात वाढ झाल्याचा परिणाम सीएनजी वाहनांच्या विक्रीवरही (CNG Vehicle Sale) दिसून येत आहे. मार्चमध्ये 35,069 चा सार्वकालिक उच्चांक गाठल्यानंतर, सीएनजी+पेट्रोलवर (CNG+ Petrol)चालणाऱ्या कारची विक्री मे महिन्यात 11.58% नी घसरत 31,008 वर आली. सीएनजीच्या दरात झालेली वाढ हे यामागचे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. याच कालावधीत पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीची संख्या 12.88 लाखांवरून 13.56 लाख झाली. (CNG vehicle sales drops by 12% as CNG Gas price rises)

अधिक वाचा : Bullet Train Ticket Price: मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या तिकिटाची किंमत किती असणार? सरकारनं सांगितलं किती असेल किंमत

अनेक शहरांमध्ये सीएनजीचा दर 85 रुपयांच्या वर 

सीएनजी गॅसच्या दरात मागील वर्षाच्या तुलनेत 74% जास्त वाढ झाली आहे. अनेक शहरांमध्ये सीएनजी गॅसच्या किंमती 85 रुपयांच्या पुढे आहेत. गेल्या वर्षी दिल्लीत सीएनजीची किंमत 43.40 रुपये प्रति किलो होती, तीच आता वाढून 75.61 रुपये झाली आहे. मार्चपासून सीएनजी गॅस 18-20 रुपयांनी महाग झाला आहे. या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर अनुक्रमे 1.31 रुपये आणि 3 रुपयांनी वाढ झाली आहे.

अधिक वाचा : RBI ने पुन्हा 0.50 टक्क्यांनी वाढवला रेपो रेट, कर्जाचा EMI वाढणार

सीएनजीवर वाहन चालवणेही आता महाग

इंडियन ऑटो एलपीजी कोलिशनचे महासंचालक सुयश गुप्ता म्हणाले, “गेल्या काही दिवसांत सीएनजीच्या किंमतीत सुमारे 18-20 रुपयांनी वाढ झाली आहे. सीएनजी गॅस आणि सीएनजी किटच्या किंमतीमुळे पर्यायी इंधन म्हणून सीएनजी गॅस आता वाहनचालकांसाठी महाग ठरत आहे.

सीएनजीच्या किंमती वाढल्यामुळे कमी फायदा 

वाहन उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, पेट्रोल कारच्या तुलनेत सीएनजी कार आधीच 1 लाख ते 2 लाख रुपयांनी महागल्या आहेत. तसेच सीएनजी सिलेंडरमुळे बूट स्पेसही कमी होत आहे. आता सीएनजीच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर ग्राहकांना वाटते आहे की, सीएनजी आणि डिझेलच्या तुलनेत फारसा फरक नसताना एकरकमी वाढीव किंमत का द्यायची? मारुती सुझुकी ही देशातील सीएनजी कारची सर्वात मोठी विक्री करणारी कंपनी आहे. याशिवाय ह्युंदाई आणि टाटा सीएनजी वाहनांचीही विक्री करतात.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 09 June 2022 : सोन्याच्या तेजीला लगाम, अमेरिकन बॉंडच्या वाढत्या परताव्यामुळे सोने दबावात...पाहा ताजा भाव

सरकारने सीएनजीच्या दरांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी

वाहन तज्ञ संजीव गर्ग म्हणतात की, वाहनांच्या किंमती जास्त असूनही किफायतशीर ठरत असल्यामुळे काही काळ सीएनजी वाहनांची लोकप्रियता वाढत होती. परंतु आता मागील काही महिन्यांपासून सीएनजी गॅसच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आता त्यांच्या विक्रीवर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत सरकारने सीएनजीच्या किमतींवर नियंत्रण ठेवायला हवे.

इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे वाहनचालक इंधनाच्या बचतीचे आणि खर्चाच्या बचतीचे पर्याय शोधत असतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील काही वर्षात मोठी वाढ झाल्यामुळे अनेक वाहनचालक सीएनजी गॅस सारख्या पर्यायी इंधनाकडे वळले आहेत. मात्र आता सीएनजी गॅसच्या दरातदेखील मोठी झाल्यामुळे त्यांच्यासमोर मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी