Coca-Cola Founder Story: न्यूयॉर्क : यंदा उन्हाळा जोरदार आहे. प्रचंड उकाडा आणि उष्णतेची लाट आहे. अशावेळी आपल्याला थंडगार शीतपेयाची आठवण येते. कोका कोला (Coca-Cola) हा असा एक ब्रॅंड आहे ज्याची जगभर ओळख आणि लोकप्रियता आहे. अनेकांना हे शीतपेय खूप आवडते. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्हाला कोल्ड ड्रिंक (Cold Drink) म्हणून जे आवडते ते एका औषध निर्मिती कंपनीने एका औषधाच्या शोधाच्या वेळी बनवले होते? हे पेय जखमी सैनिकाने तयार केले होते ज्याने एकेकाळी फार्मसीमध्ये काम केले होते. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर कोका-कोलाचा फॉर्म्युला तयार झाला. हा जखमी सैनिक त्याच्या वेदना कमी करण्यासाठी औषधे घेत असे. हळूहळू त्याला अंमली पदार्थांचे व्यसन जडले होते. आज जगभर अत्यंत लोकप्रिय आणि आवडीचे शीतपेय असलेल्या कोका कोलाच्या जन्माची कहाणी (Coca-Cola Story) तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडेल. (Coca-Cola was borne as substitute for drugs, formulated by a soldier)
कोका-कोलाची (Coca-Cola)निर्मिती 1886 मध्ये या दिवशी म्हणजेच 8 मे 1886 रोजी अटलांटा येथील फार्मासिस्ट जॉन पेम्बर्टन (John Pemberton) यांनी केली होती. पेम्बर्टन हा सैनिक होता. पण त्याने फार्माचे शिक्षण घेतले होते. एका लढाईत तो गंभीर जखमी झाला. त्यांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. दुखण्यापासून आणि वेदनेतून आराम मिळावा म्हणून त्याने ड्रग्ज घेण्यास सुरुवात केली आणि सैन्याची नोकरी सोडली. काही दिवसांनी त्याच्या जखमा बऱ्या झाल्या पण त्याला ड्रग्जची सवय लागली. हे व्यसन सोडण्यासाठी तो त्याचे पर्याय शोधू लागला. मग त्याला एक जोडीदार सापडला - फ्रँक रॉबिन्सन. दोघांनी मिळून केमिकल कंपनी सुरू केली. पेम्बर्टनने इथेही याच पेयावर काम सुरू केले. शेवटी, मे 1886 मध्ये, पेम्बर्टनने एक द्रव तयार केला. त्यात सोडा टाकून त्याने लोकांची चाचणी घेतली. लोकांना हे पेय खूप आवडले.
फ्रँक रॉबिन्सन यांनी या पेयाला कोका-कोला (Coca-Cola)असे नाव दिले. या मिश्रणात कोका नट ते कोका पानापर्यंत कोका पाने असलेल्या सिरपची कृती जोडली गेली आणि त्यात कोका-कोला नावाने कॅफिन जोडले गेले. फ्रँकचा असा विश्वास होता की नावात डबल सी असणे फायदेशीर ठरेल. जे लोकांच्या जिभेवर सहज येईल.
मात्र, कोका-कोलाच्या विक्रीची करण्यासाठी या पेयाची किंमत 5 सेंट प्रति ग्लास अशी निश्चित करण्यात आली होती. 8 मे 1886 रोजी जेकबच्या फार्मसीमध्ये कोका-कोलाची प्रथमच विक्री झाली. सुरुवातीला त्याची विक्री खूपच कमी होती. जेव्हा पहिली आकडेवारी समोर आला तेव्हा असे दिसून आले की कोका-कोलाचे फक्त 9 ग्लास दररोज विकले जातात. त्यामुळे कंपनीला मोठे नुकसान सहन करावे लागले. पहिल्या वर्षाच्या खर्चाबद्दल बोलायचे झाल्यास, खर्च 70 डॉलर इतका होता, तर कमाई फक्त 50 डॉलर इतकी होती.
कोका-कोला फॉर्म्युला पेम्बर्टनसोबत फार काळ टिकला नाही. हा फॉर्म्युला 1887 मध्ये अटलांटा येथील फार्मासिस्ट व्यावसायिक Asa Griggs Candler यांनी 2300 डॉलरमध्ये विकत घेतला होता. कोका-कोलाचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी कॅंडलरला एक कल्पना सुचली. लोकांना व्यसनमुक्त करण्यासाठी त्यांनी या पेयाचे कूपन मोफत वाटले. यानंतर लोकांना या पेयाची इतकी चव लागली की ते जगभर प्रसिद्ध झाले.
आज कोकाकोला ही कंपनी 200 हून अधिक देशांमध्ये अस्तित्वात आहे. औषधांना पर्याय म्हणून सुरू झालेली कोका-कोला कंपनी जगातील 200 हून अधिक देशांमध्ये आपला व्यवसाय धूमधडाक्याने करते आहे. या देशांमध्ये कंपनीचे 900 पेक्षा जास्त उत्पादन प्रकल्प आहेत. असे मानले जाते की कोका-कोला कंपनी 3900 प्रकारची पेये बनवते. जर एखाद्या माणसाने ही सर्व पेये रोज प्यायला सुरूवात केली तर सर्व पेये चाखण्यासाठी त्याला यासाठी 9 वर्षे लागतील.