Bitcoin Success Story: बिटकॉइनमधून त्याने महिनाभरातच कमावले ९ कोटी, कॉलेज ड्रॉप आउट बनला करोडपती

Bitcoin : काहीजण क्रिप्टोकरन्सीला (Cryptocureency)चांगला गुंतवणूक पर्याय मानतात तर काहीजण याच्याकडे सट्टा म्हणून पाहतात. क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक ही जोखमीची असते आणि त्यात सातत्याने खूप मोठे चढउतार येतच असतात. त्यामुळे यातून सर्वसामान्य माणूस किती आणि कशी कमाई करणार हा प्रश्न अनेकांना पडत असतो. मात्र एका तरुणाने बिटकॉइनमधून कोट्यवधींची कमाई केली आहे.

Bitcoin Success Story
बिटकॉइनमधून तरुणाची करोडोंची कमाई 
थोडं पण कामाचं
  • बिटकॉइनमधून तरुणाची कोट्यवधींची कमाई
  • बिटकॉइन मायनिंगद्वारे रोज कमावतो लाखो
  • शाळेत असल्यापासूनच बिटकॉइनकडे ओढा, पालकांचे प्रोत्साहन

Bitcoin Success Story: न्यूयॉर्क : क्रिप्टोकरन्सी आणि बिटकॉइनबद्दल (Bitcoin) अनेकांची विविध मते असतात. काहीजण क्रिप्टोकरन्सीला (Cryptocureency)चांगला गुंतवणूक पर्याय मानतात तर काहीजण याच्याकडे सट्टा म्हणून पाहतात. क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक ही जोखमीची असते आणि त्यात सातत्याने खूप मोठे चढउतार येतच असतात. त्यामुळे यातून सर्वसामान्य माणूस किती आणि कशी कमाई करणार हा प्रश्न अनेकांना पडत असतो. मात्र एका तरुणाने बिटकॉइनमधून कोट्यवधींची कमाई केली आहे. (College drop out becomes crorepati through Bitcoin investment)

कॉलेज ड्रॉप आउट बनला करोडपती

एका कॉलेज ड्रॉप आउटने बिटकॉइनमधून १३ लाख डॉलर म्हणजे जवळपास ९ कोटी ६७ लाख ७३ हजार रुपयांची कमाई केली आहे. तीदेखील फक्त एकाच महिन्यात. द मिररने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. हा तरुण २४ वर्षांचा असून त्याचे नाव जॉन पॉल (John Paul 'JP' Baric) असे आहे. जॉन हा अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील ऑस्टिन येथील रहिवासी आहे. जॉनने २०१२ पासून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरूवात केली होती. त्यावेळेस त्याने जवळपास १ लाख बिटकॉइन विकत घेतले होते.

शाळेत असतानाच बिटकॉइनकडे ओढा

ज्यावेळेस जॉनने बिटकॉइनमध्ये गुंतवणूक सुरू केली होती तेव्हा तो शाळेत होता. त्याला व्हिडिओ गेम खेळायला आवडायचे. ऑनलाइन गेम खेळून पैसे कमवायला त्याला आवडायचे. २०१७ त्याने बिटकॉइन मायनिंग सुरू केले. याच दरम्यान त्याने नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील आपले शिक्षण अर्धवट सोडले. त्यानंतर जॉनने आपले पूर्ण लक्ष पूर्णवेळ क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीवर केंद्रीत केले. विशेष म्हणजे जॉनच्या आई वडिलांनीदेखील त्याला प्रोत्साहन दिले. त्यानंतर त्याने आपल्या घरातच बिटकॉइन मायनिंग सेट अप उभारला आणि त्यावर पूर्ण लक्ष देण्यात सुरूवात केली. 

संपत्ती, महागड्या गाड्यांचा झाला मालक

याचा फायदा होत जॉनचा मायनिंग व्यवसाय चालू लागला. त्याने ऑनलाइन स्वरुपात आपल्या मायनिंग रिग्सला विकण्यात सुरूवात केली. लवकरच त्याचे मित्रही त्याच्या कामात सहभागी झाले. आता जॉन अमेरिकेतील लोवा नावाच्या ठिकाणाहून आपले क्रिप्टो ऑपरेशनचे काम चालवतो आहे. इथे त्याचा बिटकॉइन मायनिंगचा मोठा सेटअप आहे. यात जॉन १३०० कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून ४०,००० डॉलरची म्हणजे जवळपास २९ लाख रुपयांची कमाई दररोज करतो. आता त्याच्याकडे अनेक महागड्या कारदेखील आहेत.

दिवसेंदिवस क्रिप्टोकरन्सी  लोकप्रिय होत चालली आहे. तरुणांचा याकडे मोठा ओढा आहे. २०२१ मध्ये क्रिप्टोकरन्सीतील गुंतवणुकीत चांगलीच वाढ झाली आहे. शेअर बाजाराएवढेच आकर्षण क्रिप्टोकरन्सीचे आहे. क्रिप्टोकरन्सीच्या गुंतवणुकदारांसाठी सरलेले वर्ष यादगार ठरले आहे. अनेक डिजिटल करन्सींनी (Digital currency) यावर्षी ७००० टक्क्यांपर्यत परतावा दिला आहे. अर्थात नियमनाच्या पातळीवर सरकार क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण आणण्यासाठी बिल आणण्याच्या तयारीत आहे. आगामी अर्थसंकल्पात क्रिप्टोकरन्सीसंदर्भात काही मार्गदर्शक सूत्रे (Guidelines for cryptocurrency) जाहीर केली जाऊ शकतात. गुंतवणुकदारांसाठी मात्र २०२१ हे वर्ष फारच लाभदायी ठरले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी