Edible Oil update : नवी दिल्ली : महागाईच्या (Inflation)दणक्याने हवालदिल झालेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या दरात (Edible Oil) आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. जागतिक किमतीत घसरण झाल्यानंतर सर्वसामान्यांना फायदा व्हावा यासाठी खाद्यतेलाचे प्रक्रियादार आणि उत्पादकांनी खाद्यतेलाच्या किंमती 10-12 रुपयांनी कमी करण्याचे मान्य केले आहे, असे वृत्त समोर आले आहे. यामुळे सर्वसामान्य माणसाला मोठाच दिलासा मिळणार आहे. कारण खाद्यतेलावरील खर्च हा सर्वसामान्यांच्या बजेटमधील महत्त्वाचा हिस्सा असतो. (Common man may get relief as edible prices to reduce by Rs 10)
अधिक वाचा : Sushant singh Rajput प्रकरणात Aaditya Thackeray यांना गोवण्याचा राणेंचा डाव, केसरकरांचा गौप्यस्फोट
प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या वृत्तामध्ये एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “जागतिक किंमतीतील घसरण लक्षात घेता खाद्यतेल उत्पादकांनी खाद्यतेलाच्या किमती आणखी 10-12 रुपयांनी कमी करण्याचे मान्य केले आहे. तेल उत्पादकांसोबत आमच्या चांगल्या बैठका झाल्या आहेत, ज्यामध्ये आम्ही डेटासह तपशीलवार सादरीकरण केले आहे.
भारत हा खाद्यतेलाचा मोठा आयातदार देश आहे. भारत आपल्या गरजेच्या दोन तृतीयांश खाद्यतेलाची आयात करतो. रशिया-युक्रेन संघर्ष आणि इंडोनेशियाने इतर देशांना पामतेल निर्यातीवर घातलेली बंदी यामुळे खाद्यतेलाच्या किंमतीत अलीकडच्या काही महिन्यांत मोठी वाढ झाली आहे. तथापि, इंडोनेशियाने अलिकडच्या काही महिन्यांत पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे.त्याचा परिणाम होत आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. मात्र, देशांतर्गत बाजारपेठेत परिस्थिती थोडी वेगळी आहे, कारण येथे किंमती हळूहळू खाली येत आहेत.
अधिक वाचा : Optical Illusion: हे चित्र पाहून नका बनू उल्लू; 5 सेकंदात शोधून दाखवा खरी घुबड, सापडली तर तुम्ही आहात स्मार्ट
खाद्य तेलावरील खर्च हा सर्वसामान्यांच्या दर महिन्याच्या घरगुती खर्चातील मोठा हिस्सा असतो. इंडोनेशियाने (Indonesia) काही दिवसांपूर्वच निर्यातीला चालना देण्यासाठी आणि मोठा साठा कमी करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत सर्व पाम तेल उत्पादनांवरील निर्यात शुल्क रद्द केले होते.इंडोनेशिया हा पाम तेलाचा (Palm Oil)जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे आणि या निर्णयामुळे पाम तेलाच्या किंमती आणखी घसरण्याची शक्यता आहे. तुमच्या माहितीसाठी एप्रिलच्या अखेरीपासून एका वर्षात त्याची किंमत सुमारे 50% कमी झाली आहे.
याआधी खाद्यतेलाच्या किंमतींना आवर घालण्यासाठी सरकारने काही पावले उचलली होती. महागाई (Inflation)नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले होते. सरकारने क्रूड सोयाबीन (Crude Soybean)आणि सूर्यफूल तेलाची (Sunflower Oil)आयात मार्च 2024 पर्यंत शुल्कमुक्त केली आहे. याशिवाय त्यांच्या आयातीवर कृषी उपकरही लागू होणार नाही. सरकारचा हा निर्णय २४ मेच्या मध्यरात्रीपासून लागू झाला आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षांत दरवर्षी 2 दशलक्ष टन कच्चे सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.