Investment Tips : 650 रुपयांची एसआयपी की इलॉन मस्कची ट्विटरची ब्लू टिक, पाहा काय आहे फायद्याचे...

Mutual Fund SIP : कर्मचाऱ्यांच्या छाटणीबरोबरच ट्विटरचे बिझनेस मॉडेल बदलण्याचाही मस्कचा प्रयत्न दिसतो आहे. त्यामुळेच ट्विटरच्या सुप्रसिद्ध ओळख ब्ल्यू टिक (Blue Tick) किंवा ब्लू बॅजच्या संदर्भात पहिला मोठा बदल करण्यात आला आहे. ट्विटर खातेधारकांना ही ब्ल्यू टिक तेव्हाच मिळते जेव्हा ट्विटर कंपनी त्यांची पडताळणी करते. ब्ल्यू टिक हे खूप प्रतिष्ठेचे मानले जाते. आता ट्विटरच्या या ब्ल्यू टिकचे 650 रुपये याची तुलना जर एखाद्या म्युच्युअल फंडाच्या एसआयपीशी (SIP) केल्यास काय होईल ते पाहूया.

Investment Tips
गुंतवणूक टिप्स 
थोडं पण कामाचं
  • मस्कने विकत घेतल्यावर ट्विटर ब्ल्यू टिकसाठी शुल्क घेणार
  • ट्विटरचे बिझनेस मॉडेल बदलणार
  • ब्ल्यू टिकचे शुल्क आणि एसआयपीमधील गुंतवणूक यांची तुलना

Investment Tips : नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या ताब्यात आता ट्विटर आली आहे. ट्विटरची (Twitter) मालकी मिळाल्याबरोबर मस्कने कंपनीत मोठे बदल सुरू केले आहेत. कर्मचाऱ्यांच्या छाटणीबरोबरच ट्विटरचे बिझनेस मॉडेल बदलण्याचाही मस्कचा प्रयत्न दिसतो आहे. त्यामुळेच ट्विटरच्या सुप्रसिद्ध ओळख ब्ल्यू टिक (Blue Tick) किंवा ब्लू बॅजच्या संदर्भात पहिला मोठा बदल करण्यात आला आहे. ट्विटर खातेधारकांना ही ब्ल्यू टिक तेव्हाच मिळते जेव्हा ट्विटर कंपनी त्यांची पडताळणी करते. ब्ल्यू टिक हे खूप प्रतिष्ठेचे मानले जाते.  ट्विटर मस्कच्या ताब्यात जाण्यापूर्वी ब्ल्यू टिक विनामूल्य होती. मात्र आता मस्कने यात बदल केले आहेत. मस्कने जाहीर केले आहे की ब्लू टिक असलेल्या युजरला  आता आठ डॉलर्स म्हणजेच सुमारे 650 रुपये दरमहा द्यावे लागतील. आता ट्विटरच्या या ब्ल्यू टिकचे  650 रुपये याची तुलना जर एखाद्या म्युच्युअल फंडाच्या एसआयपीशी (SIP) केली तर ग्राहकाला नेमका कशात फायदा होईल ते पाहूया. (Compare the Rs 650 investment  per month in SIP against the charges of blue tick for twitter)

अधिक वाचा  : करिअरमध्ये प्रगती करताना महिलांसमोर असतात ‘ही’ आव्हानं

ब्लू टिकसाठी पैसे भरणे ही काही गुंतवणूक नाही. मात्र तो युजरला करावा लागणारा दर महिन्याचा खर्च असणार आहे. शिवाय ही एक प्रकारे स्व:ताचा ब्रॅंड उभारण्यासाठीची गुंतवणूकच असते. याचा प्रभाव लक्षात घेता ती युजरसाठी गुंतवणुकीपेक्षा अधिक आहे. याचे कारण ब्लू टिक दर्शवते की विशिष्ट युजरची पडताळणी झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या जगात त्याची विश्वासार्हता दर्शवते. या आधारावर, ब्लू टिक्समधील गुंतवणूक आणि एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याची तुलना करणे तसे योग्य ठरणार नाही. मात्र जर एखाद्याने ब्ल्यू टिकसाठी दरमहा 650 रुपये खर्च केले आणि तेव्हढीच रक्कम एसआयपीमध्ये गुंतवली तर कशातून जास्त कमाई करता येईल याचा हा अंदाज आहे.

अधिक वाचा  : भारतीय हवाई दलात अग्नीवीर वायूची भरती

 

ब्लू टिक किंवा एसआयपीमध्ये 650 रुपयांची गुंतवणूक 

दोघांची तुलना करताना, आपण 10 वर्षांचा कालावधी लक्षात घेणार आहोत. समजा एखाद्या युजरने ट्विटरच्या ब्ल्यू टिकसाठी महिन्याला 650 रुपये दिले तर 10 वर्षांत त्याला एकूण 78,000 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच ट्विटरच्या ब्लू टिकची 10 वर्षांची किंमत 78,000 रुपये आहे. त्याउलट, जर एखाद्या व्यक्तीने दर महिन्याला म्युच्युअल फंडाच्या एसआयपीमध्ये 650 रुपये जमा केले, तर 10 वर्षांच्या कालावधीत त्याची निव्वळ बचत 78,000 रुपये होईल. अर्थात हे भांडवल असणार आहे आणि त्यावर परतावा देखील मिळणार आहे. यावर त्याला एवढ्या मोठ्या कालावधीत दणकून परतावा मिळेल.

अधिक वाचा  : शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या प्रमुखांचे पुत्र आमने - सामने

650 रुपयांच्या गुंतवणुकीचा फायदा

एसआयपीसाठी आपण साधारण 12 टक्के परतावा गृहीत धरला तर तुम्हाला 10 वर्षांत जवळपास दुप्पट रक्कम मिळेल. म्हणजेच 10 वर्षांत 650 रुपये दरमहा गुंतवल्याने  78,000 रुपये जमा होतील. त्यावर 12% दराने 73,000 रुपये परतावा मिळेल. म्हणजेच, तुम्ही एसआयपीमध्ये जितकी मुद्दल गुंतवली आहे, 10 वर्षांनंतर तुम्हाला जवळपास तेवढाच परतावा मिळेल. म्हणजेच एसआयपीमध्ये दरमहा 650 रुपयांची गुंतवणूक केल्यावर 10 वर्षांनंतर 1.5 लाख रुपये मिळतील. त्याउलट ट्विटर किंवा मस्क 10 वर्षांत युजरकडून 78,000 रुपयांचे शुल्क घेतील, तेही फक्त ब्लू टिक्ससाठी. अर्थात या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मात्र एका छोट्या रकमेतून दीर्घ कालावधीसाठीच्या गुंतवणुकीद्वारे कशी मोठी रक्कम उभारता येते हे यातून आपल्याला दिसून येते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी