बांधकाम क्षेत्रातील अद्यावत ट्रेंड्स

डिफ्युजन ऑफ इनोव्हेशन थिअरी असे सांगते, की प्रत्येक तंत्रज्ञान वापरकर्त्याने तिचा अवलंब करण्याच्या प्रवासात पाच टप्प्यांतून जाते.

construction new trends in maharashtra
बांधकाम क्षेत्रातील अद्यावत ट्रेंड्स  |  फोटो सौजन्य: BCCL

डिफ्युजन ऑफ इनोव्हेशन थिअरी असे सांगते, की प्रत्येक तंत्रज्ञान वापरकर्त्याने तिचा अवलंब करण्याच्या प्रवासात पाच टप्प्यांतून जाते. पहिले 2.5 टक्के इनोव्हेटर्स असतात, पुढचे 13.5 टक्के प्राथमिक टप्प्यात अवलंब करणारे असतात, तर 34 टक्के सुरुवातीचे बहुसंख्यांक आणि 34 टक्के नंतरचे बहुसंख्यांक असतात, तर अखेरचे 16 टक्के रेंगाळणारे असतात. जागतिक पातळीवर बांधकाम क्षेत्र तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या बाबतीत लक्षणीय बदलातून जात असून त्याची परिणिती अधिक स्मार्ट व जास्त प्रभावी निष्कर्षांमध्ये होत आहे. या प्रवासातील महत्त्वाचे स्मार्ट, डेटावर आधारित आणि जबाबदार यंत्रणेच्या दिशेने जाणारे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत, असे दीपक सुवर्णा, प्रमुख प्रकल्प अधिकारी, महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लि.यांनी सांगितले. 

व्हीआर आणि एआर – व्हर्च्युअल रिअलिटी (व्हीआर) गेल्या काही वर्षांत उदयास आली असून त्याच्या मदतीने वापरकर्त्याला पर्यायी प्रत्यक्ष जगातील परिस्थितीत नेले जाते व अर्थातच ते खर्चिक आहे. व्हीआरमुळे बांधकाम क्षेत्राला सर्वसमावेशक उत्पादन मिळले असून त्याचा भागधारकांना डिझाइन प्रक्रियेमध्ये उपयोग होत आहे. किंबहुना कित्येक भागधारकांना असेही वाटते, की लवकरच असा दिवस येईल, जेव्हा सुरक्षित गॉगल्सऐवजी साइट नियोजन आणि प्लॉटिंग बांधकामापूर्वीच सुरू होईल. 


बांधकाम कंपन्यांनी कामगार सुरक्षा प्रशिक्षण उंचावण्यासाठी व्हीआर आणि एआर (ऑग्युमेंटेड) रिअलिटीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे बांधकाम कामगारांना ते काय शिकत आहेत हे केवळ वाचण्याऐवजी त्याचा दृश्य विचार करता येतो. कंपन्या अप्सचा वापर व्हीआर/एआर तंत्रज्ञान त्यांच्या बीआयएम (बिल्डींग इन्फर्मेशन मॉडेलिंग) सॉफ्टवेयरला जोडण्यासाठी करत आहेत. यामुळे बांधकामाचा आभासी फेरफटका मारता येतो आणि डिझाइन्सविषयी पूर्ण माहितीनिशी निर्णय घेता येतात, शिवाय वेळ आणि पैशांची बचत होते. 

बांधकाम सॉफ्टवेयर आणि डेटा यंत्रणा – रिअल- टाइम, डेटावर आधारित एकत्रीकरण सॉफ्टवेयर हे आधीपासूनच विकास प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, बांधकाम क्षेत्रावरील त्याचा परिणाम नजीकच्या भविष्यात लक्षणीय प्रमाणात वाढणार आहे. पर्यायाने सध्या अस्तित्वात असलेल्या प्रक्रिया व यंत्रणा एकाच, पूर्णपणे जोडलेल्या व्यासपीठात एकत्रित करून प्रकल्पाची कार्यक्षमता वाढवता येईल. आता प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान वेगवेगळी कामे आणि विभागांसाठी सॉफ्टवेयर सहजपणे एकत्रित करता येतात व त्यामुळे दिरंगाई, परत काम करायला लागणे तसेच संवादातील दरी कमी करता येते. विश्वासार्ह, रिअल टाइम एकत्रित सॉफ्टवेयर बांधकाम प्रक्रियेचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत डिजिटल कणा होऊ शकते. 

बीआयएम – बीएमआय हे बांधकाम क्षेत्रातील सध्याचे सर्वात लोकप्रिय लोकप्रिय तंत्रज्ञान आहे. आपण एखाद्या बांधकाम प्रकल्पाचे व्यवस्थापन, डिझाइन आणि विकास कशाप्रकारे करतो यातील बदलाचा मुख्य सूत्रधार बीएमआय तंत्रज्ञान असते. बीएमआयदवर आधारित प्रोग्रॅमिंगमध्ये 4डी आणि 5डी बीआयएम या उदाहरणांसह विविध स्तर असतात. बीएमआयमुळे इमारत प्रक्रियेतील अचूकता वाढते तसेच भागधारकांमधे प्रकल्पाच्या महत्त्वाच्या माहितीची देवाणघेवाण सुलभ होते. जसा विकास होत जातो, तसेच बीएमआयमुळे बांधकाम प्रकल्प अधिक उत्पादनक्षम आणि वाजवी होतात तसेच त्यात शाश्वतता आणि सुरक्षा प्राधान्याने समाविष्ट केली जाते. बीएमआयमुळे प्रकल्प व्यवस्थापन खुल्या आणि सहयोगी वातावरणात प्रकल्प विकासाचे तपशीलवार चित्र समोर येते. यामुळे डिझायनर्सना नियोजित आराखड्याचे थ्रीडी प्रारूप तयार करण्यात मदत होते व त्यात खर्च तसेच वेळेची माहिती समाविष्ट करता येते. बदलते घटक उदा. बांधकाम पद्धती आणि साहित्य सॉफ्टवेयरमध्ये दाखल करून वेगवेगळी तंत्रे व साहित्य वापरून काय खर्च येतो त्याची तुलना केली जाऊ शकते. 

पूर्वरचना – पूर्वरचनेचे तंत्र आता बरीच विकसित झाले असून प्रकल्पाची आर्थिक बाजू आणि वेळमर्यादा यांवरील वाढत्या तणावामुळे त्याची लोकप्रियता वाढत  आहे. पूर्वरचनेमुळे नियंत्रित वातावरणात मूलभूत घटक उभारणीस मदत होते. यामुळे प्रत्यक्ष साइटवरील बांधकामास दिरंगाई करणाऱ्या घटकांचा लक्षणीय भाग काढून टाकला जातो. विकासाचा दर्जा उत्पादन/कारखाना उत्पादन वातावरणात सर्वाधिक असतो. पारंपरिक बांधकाम पद्धतीच्या तुलनेत पूर्वरचना केलेल्या बांधकामाचे पूर्ण विकसित रूप त्याच्या तपशीलांशी सुसंगत असते. 

मॉड्युलर बांधकाम – मॉड्युलर इमारत बांधकाम वेगाने लोकप्रिय होत आहे. प्रमाणित प्रक्रियेमुळे बरेचसे घटक दुसऱ्या ठिकाणी जुळवणे शक्य झाले असून त्यामुळे कच्च्या मालाचे वितरण आणि बांधकामाचे वेळापत्रक यांवर जास्त चांगले नियंत्रण मिळे. प्रमाणित मॉड्युलर आराखड्यामुळे खर्चात कपात करण्यास मदत होते आणि उत्पादन, वितरण व इन्स्टॉलेशन वेळमर्यादेचा प्रभावी मागोवा ठेवता येतो. 
प्रीफॅब आणि मॉड्युलर प्रक्रियेचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत. 

-    पर्यावरणस्नेही – उरलेल्या बांधकाम साहित्याच्या रिसायकलिंगद्वारे. पारंपरिक बांधकाम पद्धतीमुळे भरपूर माल वाया जातो. 
-    वाजवी – कच्च्या मालावर घसघशीत सवलतींद्वारे
-    दर्जेदार मापदंड – सर्व काम कारखान्यातील नियंत्रित वातावरणात होत असल्यामुळे आर्द्रता, पर्यावरणीय धोके आणि धूळ यांच्याशी संबंधित समस्यांपासून कमी जोखीम असते. 

ड्रोन्स – कित्येक बांधकामाच्या ठिकाणी आजकाल ड्रोन्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केल जाऊ लागला आहे. निरीक्षकांना साइटचे केवळ काही मिनिटांतच विश्लेषण करता यायचे. पूर्वी या कामासाठी कित्येक आठवण किंवा महिने लागायचे. ड्रोन तंत्रज्ञान निष्कर्षांच्या बाबतीत अधिकाधइक अचूक होत असल्यामुळे मानवी हस्तक्षेपाची गरज कमी होत जाईल व पर्यायाने चुकांचे प्रमाणही कमी होईल. कंपन्या सुरुवातीला नियंत्रक म्हणून ड्रोनचा वापर करण्यास अनुत्सुक होत्या. मात्र, आज ड्रोनचे तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे बांधकाम कंपन्या या तंत्रज्ञानाचा अवलंब करायला लागल्या आहेत. 

रोबोटिक्स – रोबोटिक्स हे बांधकाम क्षेत्राचे भविष्य आहे. मॉड्युलर बांधकामाने कारखान्यातील नियंत्रित वातावरणात या तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात केली. लवकरच विटा लावणारे आणि रेबार्स बांधणारे रोबोट्स सर्वत्र दिसतील. 

जीपीएससाठी आधुनिक वापर – जीपीएस ट्रॅकिंग सुविधा नवीन नसल्या, तरी आता त्याचा जास्त सर्जनशील प्रकारे वापर व्हायला लागला आहे. 
-    पारंपरिक निरीक्षक उपकरणांऐवजी
-    संभाव्य प्रकल्पांच्या ठिकाणी माहिती जलदपणे व जास्त अचूकपणे गोळा केली जाऊ शकते. 
-    प्रकल्प व्यवस्थापकही बांधकामाच्या ठिकाणी फ्लीट व्यवस्थापन करण्यासाठी साइटचे ठिकाण अचूकपणे कळवण्यासाठी उपकरणांद्वारे जीपीएस वापरत आहेत. 
-    या वस्तूंचे अचूक ठिकाण समजत असल्यामुळे नकाशांच्या मदतीने हरवलेला अथवा चोरी झालेला माल शोधणे सोपे होते. 

•    हरित बांधकाम – स्थावर मालमत्ता क्षेत्र वेगाने पर्यावरणपूरक- हरित इमारत संकल्पनेचा अवलंब करत आहे. हरित बांधकामामध्ये पर्यावरणदृष्ट्या जबाबदार बांधकामाचे साहित्य आणि इमारतीच्या संपूर्ण जीवनचक्रात डिझाइन आणि बांधकामापासून कामकाजापर्यंत, देखभाल, नूतनीकरण आणि नष्ट करण्यापर्यंत पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाचा समावेश असतो. हे खर्चाच्या बाबतीतही वाजवी आहे. 
एक ट्रेंड स्पष्ट आहे – प्रत्यक्षातील एकत्रीकरण आणि संवाद. वर नमूद केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून वेगाने शहरीकरणाकडे चाललेल्या जगाच्या गरजा प्रभावीपणे, उच्च दर्जा आणि स्त्रोतांचा प्रभावी वापर करून पूर्ण करणे आपल्याला शक्य झाले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी