आयकर रिटर्न भरण्याची ३१ मार्चची मुदत वाढवून द्यावी; मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती

आर्थिक वर्ष 2018-19 चे सुधारित व उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे.

coronavirus cm uddhav thackeray income tax returns gst returns nirmala sitaraman
आयकर रिटर्न भरण्याची ३१ मार्चची मुदत वाढवून द्यावी; मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : आर्थिक वर्ष 2018-19 चे सुधारित व उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. याशिवाय 234 बी अंतर्गत व्याज वाचविण्यासाठी अग्रिम कर भरण्याची तसेच 30 एप्रिलची टीडीएस भरण्याची मुदतही वाढवून द्यावी अशी विनंती त्यांनी आज केली. फेब्रुवारी 2020 ची जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 22 मार्च आहे, ती देखील वाढवावी असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

या अनुषंगाने मुदतीनंतर करभरणा केल्यास लागणारा दंड, शुल्क आणि व्याज देखील माफ करावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांना केली आहे. 

या संदर्भात अनेक व्यापाऱ्यांनी तसेच बिझनेस ग्रुपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली की आयटी रिटर्न आणि जीएसटी रिटर्न भरण्याची मुदत वाढावी. त्यावर विचार करून मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केली. 

आतापर्यंत बहुतांशी व्यापाऱ्यांनी जीएसटी रिटर्न गेली १० महिने व्यवस्थित भरले आहेत. पण रेकॉर्ड बिघडू नये यासाठी व्यापारी चिंतीत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मुदत वाढवावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...