ITR date extended: आता ३० सप्टेंबरपर्यंत फाइल केला जाऊ शकतो आयटीआर, कोरोनामुळे वाढविली मुदत 

ITR new deadline 30th september: कोरोना महारमारीमुळे आता सामान्य आयकर दाता आता ३० सप्टेंबरपर्यंत आयटीआर फाइल करू शकणार आहेत. 

ITR date extended
खुशखबर, आयटीआर फायलिंगची मुदत वाढवली  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • आता ३० सप्टेंबरपर्यंत फाइल करता येणार आयटीआर 
  • कोरोना महामारीमुळे देशातील विविध भागात होते लॉकडाऊन त्यामुळे घेण्यात आला निर्णय 
  • सामान्यपणे आयटीआर फाइल करण्याची अंतीम तारीख ३१ जुलै असते 

नवी दिल्ली :  सामान्य करदात्यांना सरकारने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न (आर्थिक वर्ष २०१८-१९ किंवा असेस्मेंट वर्ष २०१९-२०) फाइल करण्याची तारीख आता ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. कोरोना महामारी आणि सर्वसामान्य अडचणी पाहता, हा निर्णय घेण्यात आला आहे. आयकर विभागाने ट्विट करून ही माहिती दिली आहे.  सामान्यपणे आयटीआर रिटर्न फाइल करण्याची अखेरची तारीख ३१ जुलै असते. पण लॉकडाऊनमुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

सीबीडीटीने दिली माहिती 

आयकर विभागाने ट्विट करून म्हटले की कोविड महामारीमुळे आणि करदात्यांना सोईस्कर व्हावे यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने आर्थिक वर्ष २०१८-१९ (असेस्मेंट वर्ष २०१९-२०) साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतीम डेडलाइन ३१ जुलैने वाढवून ३० सप्टेंबर २०२० केली आहे. 

तिसऱ्यांदा वाढवली मुदत 

सीबीडीटीने तिसऱ्यांदा आयकर रिटर्न फाइल करण्याची तारीख वाढविली आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी ३१ मार्च २०२० पर्यंत आयटीआर फाइल करण्याची तारीख असते. पण ही मुदत ३० जून पर्यंत वाढविण्यात आली. मग ही तारीख ३१ जुलै करण्यात आली. आता आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन ३० सप्टेंबर २०२० करण्यात आली आहेत 

ITR भरण्याची वेबसाइट

आयकर भरण्यासाठी तुम्ही आयकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर तुम्ही लॉग इस करुन अवघ्या काही स्टेप्स फॉलो करुन तुमचा आयकर रिटर्न फाइल करु शकता.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर या लॉकडाऊनचा कालावधी टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आला होता. आता हळूहळू सर्वत्र अनलॉक होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अद्यापही परिस्थिती जैसे थे असल्याचं दिसत आहे. या सर्वांमुळे आयकर विभागाने आयटीआर भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी