Jobs for Women : या कंपन्या देतायेत महिला कर्मचाऱ्यांना खास लाभ, पाहा विविध कंपन्यांच्या जबरदस्त सुविधा

Facilities for women employees : नोकरदार महिलांसाठी कार्यालयातील वातावरण, कार्यसंस्कृती (Working Culture) हा एक प्रमुख मुद्दा असतो. कामाच्या ठिकाणी असलेली लवचिकता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नुकतेच पीएम मोदींनी (PM Modi)असेही म्हटले होते की, महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी कामाची शैली लवचिक करणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक कंपन्यांनी हे पाऊल आधीच उचलले आहे. देशातील आघाडीची कंपनी असलेली आयटीसी महिला कर्मचाऱ्यांना (Women Employee) विशेष सुविधा देते आहे.

Facilities for Women employee
महिला कर्मचाऱ्यांसाठी खास सुविधा 
थोडं पण कामाचं
  • बिझनेस ट्रिपच्या खर्चापर्यंत पैसे देणाऱ्या कंपन्या
  • महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी धोरणांमध्ये बदल करण्यात येत आहेत
  • तीन वर्षांत महिलांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत 10% वाढ झाली आहे

Facilities for Women employee : नवी दिल्ली : नोकरदार महिलांसाठी कार्यालयातील वातावरण, कार्यसंस्कृती (Working Culture) हा एक प्रमुख मुद्दा असतो. कामाच्या ठिकाणी असलेली लवचिकता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नुकतेच पीएम मोदींनी (PM Modi)असेही म्हटले होते की, महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी कामाची शैली लवचिक करणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक कंपन्यांनी हे पाऊल आधीच उचलले आहे. देशातील आघाडीची कंपनी असलेली आयटीसी महिला कर्मचाऱ्यांना (Women Employee) विशेष सुविधा देते आहे. जर लेडी मॅनेजर मुलाला आयासोबत बिझनेस ट्रिपवर घेऊन जायचे असेल तर त्याचा खर्चही कंपनी उचलते आहे. कंपनीच्या अधिका-यांनी सांगितले की, आम्ही महिला कर्मचाऱ्यांची गरज समजून घेत आहोत आणि धोरणांमध्ये आवश्यक ते बदल करत आहोत. त्याचप्रमाणे अनेक कंपन्या महिलांना विशेष सुविधा देत आहेत. यामुळे महिलांना कार्यालयात अधिक कन्फर्टेबल वाटते आहे. (Corporates are giving special benefits & facilities to women emplyoees)

अधिक वाचा : Jalgaon : होमवर्क केला नाही म्हणून नऊ वर्षाच्या मुलाला अर्धनग्न करत मारहाण

मॉंडेलेझ इंडियाच्या कारखान्यातील निम्म्या कामगार आहेत महिला 

चॉकलेट आणि कुकी बनवणाऱ्या मॉंडेलेझ इंडियाच्या आंध्र प्रदेशातील कारखान्यातील निम्म्या कामगार महिला आहेत. कंपनीच्या एचआर प्रमुख शिल्पा वेद यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीपासूनच आमचे उद्दिष्ट आहे की महिलांचा सहभाग समान असेल अशी कार्यशक्ती निर्माण करणे.

अधिक वाचा : तामीळनाडूत दहावीतल्या मुलामुळे बारावीतली मुलगी झाली आई, बाळाला शाळेजवळच्या झुडपांत ठेवून मुलगी पसार

सर्व प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये महिलांची भरती

बेंगळुरूमधील GE हेल्थकेअरच्या वैद्यकीय उपकरण कारखान्याच्या एका मजल्यावर सर्व कामगार महिला आहेत. त्याच्या बहुतेक कारखान्यांमध्ये, कामगारांमध्ये महिलांचा वाटा 25 ते 30% आहे. अमरेश सिंग, मुख्य मानव संसाधन अधिकारी, GE दक्षिण आशिया म्हणतात, “सर्व प्रकारच्या नोकऱ्यांसाठी महिलांची भरती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आम्ही आमची धोरणे महिलांसाठी आकर्षक बनवत आहोत.

टायटनकडून महिलांना हस्तांतरण लाभ 

टाटाची ज्वेलरी आणि घड्याळ बनवणारी कंपनी टायटन महिलांना विक्री आणि विपणन क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. त्यासाठी प्रवास आणि हस्तांतरणासंबंधीच्या धोरणांमध्ये बदल करण्यात येत आहेत. टायटन महिलांना हस्तांतरण लाभ देत आहे, ज्यामध्ये त्यांना एक सहकारी (स्थानिक कर्मचारी) दिला जातो जो त्यांना घर शोधण्यात किंवा इतर गरजा पूर्ण करण्यात मदत करतो. त्याचप्रमाणे अनेक कंपन्या प्रसूती रजेव्यतिरिक्त नुकत्याच माता झालेल्या महिलांसाठी रजा आणि कामाच्या ठिकाणी सोयीस्कर व्यवस्था यासारखे उपाय करत आहेत.

अधिक वाचा : सोलापुरात मोठा रेल्वे अपघात

तीन वर्षांत कर्मचार्‍यांचा वाटा 10% वाढला

कंपन्यांच्या या प्रकारच्या धोरणाला आणि प्रयत्नांना फळदेखील येते आहे. CIEL HR सर्व्हिसेसच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की सर्वेक्षण केलेल्या 359 कंपन्यांमध्ये, गेल्या तीन वर्षात महिलांच्या कर्मचाऱ्यांच्या सहभागामध्ये 10% वाढ झाली आहे. दिवसेंदिवस महिलांच्या गरजा लक्षात घेत कार्यसंस्कृती विकसित होत असल्यामुळे महिलांना नोकरी करणे आणि करियर करण्यास मदत होते आहे. आगामी काळात यावर आणखी धोरणे राबवली जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी