cheapest mobile data : जगातील सर्वात स्वस्त मोबाईल डेटा देणाऱ्या देशांची एक यादी cable.co.uk वर प्रसिद्ध झाली आहे. या यादीत २३३ देशांचा उल्लेख आहे. यादीत उल्लेखलेल्या देशांमध्ये किती पैसे खर्च केल्यास एक जीबी मोबाईल डेटा (मोबाईलसाठी इंटरनेट) मिळतो त्याची माहिती नमूद आहेत. कमीत कमी रकमेत एक जीबी डेटा देणारा देश यादीत पहिल्या स्थानी तर सर्वात जास्त दराने डेटा देणारा देश यादीत शेवटच्या स्थानी आहे.
जगातील सर्वात स्वस्त मोबाईल डेटा देणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या पाच देशांमध्ये भारत आहे. यादीनुसार इस्रायल या देशात सर्वात स्वस्त दराने मोबाईल डेटा मिळतो. यादीत दुसऱ्या स्थानी इटली, तिसऱ्या स्थानी सॅन मरिनो, चौथ्या स्थानी फिजी आणि पाचव्या स्थानी भारत आहे.
इस्रायलमध्ये एक जीबी मोबाईल डेटा ३ रुपये २० पैशांत (०.०४ डॉलर) मिळतो तर इटलीत एक जीबी मोबाईल डेटा ९.५९ रुपयांत (०.१२ डॉलर) मिळतो. सॅन मरिनोमध्ये ११.१९ रुपयांत (०.१४ डॉलर) आणि फिजीत ११.९९ रुपयांत (०.१५ डॉलर) एक जीबी मोबाईल डेटा मिळतो. भारतात एक जीबी मोबाईल डेटा सरासरी १३.५९ रुपयांत मिळतो.
यादीत २३३ ते २२९ या पाच क्रमांकांवर सर्वाधिक दराने एक जीबी मोबाईल डेटा देणाऱ्या देशांचा उल्लेख आहे. सेंट हेलेना येथ ३३२३.९२ रुपयांत (४१.०६ डॉलर), फॉकलंड द्विप समुहात ३०७२.११ रुपयांत (३८.४५ डॉलर), साओ टोमे येथे २३५६.२१ रुपयांत (२९.४९ डॉलर), प्रिंसिपेत १४२८.५९ रुपयांत (१७.८८ डॉलर), टोकेलाऊ आणि येमेन या दोन देशांत १३२४.७२ रुपयांत (१६.५८ डॉलर) एक जीबी मोबाईल डेटा मिळतो.
भारतात फाईव्ह जी ( 5G ) नेटवर्क सुरू करण्याची तयारी सुरू आहे. जिओ, एअरटेल, VI या कंपन्या २०२२ च्या अखेरपर्यंत भारतात फाईव्ह जी ( 5G ) नेटवर्क सुरू करण्याचे नियोजन करत आहेत. मोबाईल डेटा वाजवी दरात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असल्यामुळे देशात माहिती मिळविण्याचे, मनोरंजनाचे आणि संवाद साधण्याचे उत्तम माध्यम म्हणून त्याकडे बघितले जात आहे. भविष्यात भारतात मोबाईल डेटा कमी दराने उपलब्ध असेल की त्याच्या दरांत फरक पडेल याविषयी अभ्यासकांमध्ये मतभिन्नता दिसत आहे. पण देशात फाईव्ह जी ( 5G ) नेटवर्क सुरू होणे आवश्यक आहे असे मत अभ्यासक तसेच या क्षेत्राशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी जाहीरपणे व्यक्त करत आहेत.