Retail Inflation update | महागाईचा जबरदस्त दणका! पोचली 6.95 टक्क्यांवर, तिसऱ्यांदा आरबीआयच्या टार्गेटबाहेर

CPI Index : देशातील महागाईदर (Inflation) 6.95 टक्क्यांवर पोचला आहे. मार्च महिन्यात पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला आहे. भारतातील किरकोळ चलनवाढ, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI)चांगलाच वाढला आहे. त्यामुळे मार्च महिन्यात महागाईदर 16 महिन्यांच्या उच्चांकी 6.95 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) टार्गेटची वरची मर्यादा महागाईने सलग तिसऱ्यांदा ओलांडली आहे.

Inflation in March reached at record level
मार्चमध्ये महागाईचा कळस 
थोडं पण कामाचं
  • मार्च महिन्यात पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला
  • ग्राहक किंमत निर्देशांक (CPI)चांगलाच वाढला
  • महागाईदर 16 महिन्यांच्या उच्चांकी 6.95 टक्क्यांपर्यंत वाढला आहे

Inflation in March 2022 : नवी दिल्ली : देशातील महागाईदर (Inflation) 6.95 टक्क्यांवर पोचला आहे. मार्च महिन्यात पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला आहे. भारतातील किरकोळ चलनवाढ, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI)चांगलाच वाढला आहे. त्यामुळे मार्च महिन्यात महागाईदर 16 महिन्यांच्या उच्चांकी 6.95 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) टार्गेटची वरची मर्यादा महागाईने सलग तिसऱ्यांदा ओलांडली आहे. अन्नधान्याच्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्यामुळे ही वाढ झाली आहे. (CPI for March reached at record level of 6.95 %, Inflation is above RBI target range)

अधिक वाचा : Gautam Adani Update | अदानींचा झंझावात...अंबानी सोडाच, गुगलच्या संस्थापकांनादेखील टाकले मागे, लवकरच जेफ बेझॉसलाही टाकणार मागे...एका दिवसात कमावले 65 हजार कोटी

आरबीआयच्या टार्गेटपेक्षा जास्त महागाई

रिझर्व्ह बँकेला वरची पातळी आणि खालची पातळी यात 2 टक्क्यांच्या फरकाने किरकोळ महागाई 4 टक्क्यांवर ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. CPI आधारित महागाई फेब्रुवारीमध्ये 6.07 टक्के आणि जानेवारीमध्ये 6.01 टक्के होती. गेल्या वर्षी याच महिन्यात महागाईचा दर ४.३ टक्के होता. अन्नधान्याच्या बाबतीतील महागाई मार्चमध्ये 7.68 टक्के होती तीच मागील महिन्यात 5.85 टक्के होती.

अधिक वाचा : Gold Price Today | सोने आले फॉर्मात...सोन्याच्या भावात जबरदस्त तेजी, चांदीदेखील 1,000 रुपयांनी महागली, पाहा ताजा भाव

अन्नधान्याच्या किंमतीत जबरदस्त वाढ

फेब्रुवारीच्या उत्तरार्धात रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर कच्च्या तेलाच्या आणि जागतिक ऊर्जेच्या किंमतीतील वाढीचा संपूर्ण परिणाम एप्रिलपर्यंत ग्राहकांवर पडण्याची अपेक्षा नाही. कारण पेट्रोल पंपावरील ग्राहकांना पास-थ्रू विलंब झाला होता. रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित पुरवठा साखळीच्या समस्यांमुळे जागतिक धान्य उत्पादन, खाद्यतेलाचा पुरवठा आणि खतांची निर्यात विस्कळीत झाल्यामुळे अन्नधान्याच्या किंमती वाढण्याची अपेक्षा आहे. अन्नधान्याचा प्रभाव महागाईच्या बाबतीत जवळपास निम्मा आहे. 

अधिक वाचा : LIC IPO Update | सर्वात मोठ्या आयपीओतून लवकरच करा जोरदार कमाई.... एलआयसी आयपीओ 25 ते 29 एप्रिल दरम्यान येण्याची शक्यता

कोरोनानंतर महागाईचा फटका

जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या पाम तेलाच्या किंमती या वर्षी जवळपास ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. दारिद्र्यरेषेखालील लाखो लोकांना अन्नधान्याच्या किंमतीत तीव्रतेने वाढ जाणवते आहे. सर्वसामान्यांना आधीच कोरोना महामारीमुळे नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाल आहे. अशात अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमतींचा मोठा बोझा आणि फटका सर्वसामान्यांना बसतो आहे.  शिवाय, अनेक दशकांतील उच्चांकी चलनवाढीचा सध्या सामना करावा लागतो आहे. महागाईमध्ये जबरदस्त वाढ झाली असली असली तरी  इतर मध्यवर्ती बॅंकांप्रमाणेच RBI ने देखील व्याजदर स्थिर ठेवण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र महागाई रिझर्व्ह बॅंकेने ठेवलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त वाढली आहे आणि लवकरच ती कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

आरबीआयचे पतधोरण

आरबीआयने शुक्रवारी पुन्हा आपल्या द्वि-मासिक पतधोरणात 4 टक्क्यांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर आपला प्रमुख रेपो दर कायम ठेवला. परंतु विश्लेषक चिंता व्यक्त करू लागले आहेत की व्याजदर वाढवण्याची योग्य वेळ आधीच निघून गेली असेल. जाणकारांच्या मते, जागतिक पुरवठा साखळी आणि घट्ट देशांतर्गत कृषी कमोडिटी मार्केटमुळे अन्नधान्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम होत भारतातील किरकोळ महागाईदर 17 महिन्यांच्या उच्चांकीवर 6.95% पर्यंत वाढली आहे. तज्ज्ञ ऑगस्ट 2022 पासून रेपो दर वाढीची अपेक्षा करत आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी