'हे' आहेत जगातील सर्वाधिक पैसा कमावणारे क्रिकेटर्स

विराट कोहली आणि रोहित शर्मा हा टॉप १० क्रिकेटपटूंमध्ये. क्रिकेटपटूंची जबरदस्त कमाई. विविध देशातील श्रीमंत क्रिकेटपटू आणि त्यांची संपत्ती.

top 10 highest paid cricketers in world
जगातील सर्वाधिक पैसा कमावणारे क्रिकेटर्स 
थोडं पण कामाचं
  • भारतात आणि भारतीय उपखंडात जबरदस्त क्रेझ
  • दरवर्षी अब्जावधी रुपयांची उलाढाल
  • जगातील सर्वाधिक पैसा कमावणारे टॉप १० क्रिकेटपटू

नवी दिल्ली: क्रिकेट (Cricket) या खेळाची भारतात आणि भारतीय उपखंडात जबरदस्त क्रेझ आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंचे खूप मोठ्या संख्येने चाहते असतात. परिणामी क्रिकेट या खेळाची खूप मोठी बाजारपेठ तयार झाली आहे. यात दरवर्षी अब्जावधी रुपयांची उलाढाल होत असते. क्रिकेटपटूंना क्रिकेट मंडळाकडून मिळणाऱ्या मानधनाव्यतिरिक्त जाहिरातींमधून आणि विविध कंत्राटांमधून कोट्यवधी रुपये मिळत असतात. भारतीय उपखंडातीलच नव्हे तर जगभरातील क्रिकेटपटूंना (cricketer)जबरदस्त कमाई करताना दिसतात. जगातील सर्वाधिक पैसा कमावणाऱ्या टॉप १० क्रिकेटपटूंची नावे आणि त्यांची कमाई पाहूया. (These are the top 10 highest paid cricketers in world)

सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये अर्थातच विराट कोहली नंबर वन आहे. विराटनंतर रोहित शर्मा हाच आणखी एक भारतीय खेळाडू टॉप १० कमाई करणाऱ्यांमध्ये आहे. 

जगातील सर्वाधिक पैसा कमावणारे क्रिकेटर्स

१. विराट कोहली (भारत)
भारतीय क्रिकेटचा सर्वात मोठा स्टार असलेला विराट कोहली हा देशातील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. विराट दरमहा ६,९०,००० डॉलर्सची कमाई करतो आहे. त्याची एकूण संपत्ती १४ कोटी डॉलर्स इतकी आहे.

२. डीन एल्गर (साउथ आफ्रिका)
डीन दरमहिन्याला ४,४०,००० डॉलर्स कमावतो. त्याची एकूण संपत्ती ४ कोटी डॉलर्स आहे.

३. रोहित शर्मा (भारत)
रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेटमधील झळाळते नाव आहे. रोहित दरमहा १,७०,००० डॉलर्स कमावतो. त्याची एकूण संपत्ती २.५ कोटी डॉलर्स इतकी आहे.

४. इऑइन मॉर्गन (इंग्लंड)
तो दरमहा ३,२०,००० डॉलर्स कमावतो. त्याची एकूण संपत्ती १.५ कोटी डॉलर्सची आहे.

५. केरॉन पोलार्ड (वेस्ट इंडीज)
केरॉन वर्षाकाठी ५६,००० डॉलर्स कमावतो. त्याची एकूण संपत्ती १.५ कोटी डॉलर्सची आहे.

६. केन विलियमसन (न्यूझीलंड)
केन दरवर्षी ४,४४,००० डॉलर्स कमावतो. त्याची एकूण संपत्ती १ कोटी डॉलर्सची आहे.

७. क्रेग ब्रेथवेट (वेस्ट इंडिज)
वेस्ट इंडिजचा हा सलामीवीर दर महिन्याला ८०,००० डॉलर्स कमावतो. त्याची एकूण संपत्ती ९० लाख डॉलर्सची आहे.

८. एरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया)
एरॉनची दरमहिन्याची कमाई १,५०,००० डॉलर्सची आहे. त्याची एकूण संपत्ती ५५ लाख डॉलर्सची आहे.

९. टेम्बा बवुमा (दक्षिण आफ्रिका)
हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आतापर्यतच्या सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक समजला जातो. त्याची दरमहिन्याची कमाई ७०,००० डॉलर्स आहे. टेम्बाची एकूण संपत्ती ५० लाख डॉलर्सची आहे.

१०. जो रुट (इंग्लंड)
हा इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार असून फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्या अलीकडच्या काळातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूदेखील समजले जाते. जो रुट दर महिन्याला ४ लाख डॉलर्सची कमाई करतो. त्याची एकूण संपत्ती ३३ लाख डॉलर्सची आहे.

आयपीएलसारख्या स्पर्धा, टी-२० क्रिकेट यामुळे क्रिकेटची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे. क्रिकेटमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात पैसा आला आहे. याचा फायदा खेळाडूंना होतो आहे. क्रिकेटर्सना त्यांच्या देशाच्या क्रिकेट नियामक मंडळाव्यतिरिक्त जाहिराती आणि प्रायोजकांकडून बक्कळ पैसा मिळत असतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी