झोमॅटोकडून पाहिजे होता १०० रुपयांचा रिफंड, इंजिनिअरला ठगवले ७७ हजार रुपयांना 

काम-धंदा
Updated Sep 23, 2019 | 17:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

झोमॅटोहून जेवण मागविणारा व्यक्तीला हवा होता १०० रुपये रिफंड पण या प्रक्रियेत त्याल ७७ हजार रुपयांचा चुना लागला. जाणून घ्या नेमकं काय झाले.

crime news zomato zomato user wanted rs 100 refund he ended up losing rs 77000 news in marathi
झोमॅटोकडून पाहिजे होता १०० रुपयांचा रिफंड, इंजिनिअरला ठगवले ७७ हजार रुपयांना   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • इंजिनिअरचा बेसावधपणा नडला, लागला ७७ हजार रुपयांचा चुना
  • १०० रुपयांच्यासाठी गमावले ७७ हजार रुपयांची
  • बिहारची राजधानी पाटणातील एक विचित्र घटना समोर आली आहे

नवी दिल्ली :  बिहारची राजधानी पाटणातील एक विचित्र घटना समोर आली आहे, एक व्यक्तीला झोमॅटोहून खाद्यपदार्थ मागविणे खूप महागात पडले. पाटणातील एका इंजिनिअरने झोमॅटोतून १०० रुपयांचे खाद्यपदार्थ मागविले. पण ते न घेता त्याला पैसे परत हवे होते. पण केलेल्या प्रक्रियेत त्याला ७७ हजार रुपये गमावावे लागले. 

पाटणाच्या विष्णूने फूड डिलेव्हरी अॅपद्वार खाद्यपदार्थ ऑर्डर केले. पण डिलीव्हरी बॉय पदार्थ घेऊन आला तेव्हा ते जेवण त्याला आवडले नाही. त्याने ते पुन्हा परत केले. त्यानंतर झोमॅटोच्या कस्टमर केअरला फोन करण्याचा सल्ला डिलेव्हरी बॉयने दिला. आणि विष्णून गुगलवर झोमॅटोच्या कस्टमर केअरचा नंबर सर्च केला. विष्णूने गुगल सर्चवर मिळालेल्या पहिल्या क्रमांकावर डायल करून सर्व निर्देशांचे पालन केले. 

विष्णूने तसेच केले, त्यानंतर एका व्यक्तीचा फोन आला. त्यानंतर त्याने झोमॅटोचा कस्टमर केअर एक्झीक्युटीव्ह सांगितले आणि म्हटले १०० रुपये रिफंडसाठी त्याच्या खात्यातून १० रुपये कट करण्यात येतील. त्यानंतर फोन करणाऱ्या एका व्यक्तीने १० रुपये जमा करण्यासाठी एक लिंक पाठवली. संपूर्ण प्रक्रिया न समजून घेता इंजिनिअरने लिंक क्लिक केली आणि १० रुपये जमा केले. 

या देवाण घेवाणीत काही मिनिटांच्या आत विष्णू बँक खात्यातून अनेक ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून ७७ हजार रुपये कट झाले. पैसे अनेक पेटीएम ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून कट झाले. ही घटना १० सप्टेंबरची आहे. विष्णू तेव्हापासून पोलीस, बँका आणि अनेक ठिकाणी दरवाजे खटखटवत आहेत. पण त्याला अजूनही त्याचे पैसे नाही मिळाले. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी