Police Constable Jobs : पोलीस कॉन्स्टेबलच्या नोकरीसाठी उमेदवारांची झुंबड;18 हजार पदासाठी 18 लाख लोकांचा अर्ज

काम-धंदा
भरत जाधव
Updated Feb 11, 2023 | 13:38 IST

Police Constable Jobs : राज्य राखीव पोलीस दलातील (State Reserve Police Force)रिक्त 18 हजार पदांसाठी 18 लाख उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती हाती आली आहे. राज्य राखीव पोलीस दलासाठी पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) आणि कर्मचार्‍यांच्या 18,331 पदांसाठी 18 लाख उमेदवारांनी अर्ज केला आहे.

Police Constable Jobs: 18 lakh people applied for 18 thousand posts
Police Constable Jobs : 18 हजार पदासाठी 18 लाख लोकांचा अर्ज   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडली होती.
  • मुंबईतील पोलीस विभागात 8,070 कॉन्स्टेबल आणि पोलीस ड्रायव्हर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
  • 73 जागांसाठी ट्रान्सजेंडरची भरती केली जाणार आहे.

Police Constable Recruitment : मुंबई :  देशात नोकऱ्या कमी असल्याने सुशिक्षित बेरोजगारांचे ( unemployment) वाढत आहे. यामुळे नोकरीच्या एका जागेसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. याची प्रचिती ही राज्य राखीव पोलीस दलातील (State Reserve Police Force)रिक्त 18 हजार पदांसाठी 18 लाख उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती हाती आली आहे. राज्य राखीव पोलीस दलासाठी पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) आणि कर्मचार्‍यांच्या 18,331 पदांसाठी 18 लाख उमेदवारांनी अर्ज केला आहे. (Crowd of Candidates for Police Constable Jobs; 18 lakh people applied for 18 thousand posts)

अधिक वाचा  : लग्नासाठी पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे?

यामुळे नोकरी शोधणाऱ्यांची प्रचंड वाढली आहे. दरम्यान ही भरती प्रक्रिया देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती मोहीम आहे. ही भरती प्रक्रिया सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे. सहसा, पोलीस दल दरवर्षी 6,000 नवीन कर्मचार्‍यांची भरती करते, परंतु कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडली होती.  सरकारने ही भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला तेव्हा पदवीधरांकडून जवळपास 6.4 लाख अर्ज आणि पदव्युत्तर पदवीधरांकडून 68,392 अर्ज प्राप्त झाले आहेत. 

अधिक वाचा  : मुलं मुलीला भेटल्यानंतर सर्वात आधी बघतात या गोष्टी

पोलिसाची नोकरी म्हटलं म्हणजे एक रुबाबदार नोकरी असते. पोलिसांची नोकरी मिळवण्यासाठी अनेक तरुणांची धडपड असते. दरम्यान दोन वर्षापासून पोलीस भरती रखडली होती, ती पुन्हा होणार असल्याने उमेदवारांनी प्रचंड प्रतिसाद दिला. एका निवृत्त पोलिसाने सांगितले की, पोलीस कॉन्स्टेबलची नोकरी समाजात आदरणीय आहे. ज्यांना त्यांच्या देशाची सेवा करायची आहे त्यांच्यासाठी एक स्थिर करिअर देत असते. यामुळे कमी जागेसाठी भरती प्रक्रिया होणार असल्यानंतरही मोठ्या संख्येने अर्ज करण्यात आली आहेत. 

अधिक वाचा  :जया किशोरीची Top 5 भजन, ज्यांना मिळालेत कोट्यवधीमध्ये व्ह्यूज

मुंबईतील पोलीस विभागात 8,070 कॉन्स्टेबल आणि पोलीस ड्रायव्हर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाने पोलीस विभागाला तृतीय लिंग श्रेणीसाठी तरतुदींचा समावेश करण्याचे निर्देश दिल्यानंतर 73 जागांसाठी ट्रान्सजेंडरची भरती केली जाणार आहे. या सर्व जागांसाठी अर्ज आले असून 73 पैकी 68 ट्रान्सजेंडरांनी पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज केले आहेत. तर पाच जणांनी  ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबलसाठी अर्ज केले आहेत.

अशी होईल भरती प्रक्रिया 

भरती प्रक्रियेमध्ये 1600 मीटर धावणे, शॉट पुट, पुल-अप आणि लांब उडी यांचा समावेश आहे. शारीरिक चाचणी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी द्यावी लागेल. पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून नायगाव आणि मरोळ पोलीस मैदानात पोलीस चालकांची भरती सुरू झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी