Petrol Price: कच्च्या तेलाच्या किमतीने गाठला ९ महिन्यांतील उच्चांक, पेट्रोलचा भाव १०० रुपये प्रति लिटर होणार?

Petrol price: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सलग वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता पेट्रोलचा भाव शंभरी गाठणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Petrol Diesel price
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई : कच्च्या तेलाच्या दरांनी (Crude oil price) ९ महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. कच्च्या तेलाचा आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंटचा भाव गुरुवारी २८ सेंटने वाढून ५१.३६ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला. मार्च महिन्यानंतर प्रथमच कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ५० डॉलरत्या वर आहे. यामुळे येत्या काही दिवसांत भारतात पेट्रोलच्या दरात (Petrol price) वाढ होऊन प्रति लिटर १०० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच डिझेलच्या दरातही वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

गुरुवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ९०.३४ रुपये प्रति लिटर इतका होता. तर डिझेलचा दर ८०.५१ रुपये प्रति लिटर इतका होता. पेट्रोलचा दर दिल्लीमध्ये ८३.७१ रुपये प्रति लिटर इतका आहे. दिल्लीत डिझेल ७३.८७ रुपये प्रति लिटर या दराने विक्री होत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच कच्च्या तेलाच्या दरात जवळपास १३ डॉलर प्रति बॅलर म्हणजेच ३० टक्क्यांनी वाढून ५१ डॉलर प्रति बॅरल इका झाला आहे. 

का वाढतायत कच्च्या तेलाच्या किमती?

अमेरिका आणि युरोपमधील काही देशांमध्ये कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. इतर काही देशांनी कोरोना लसीला मंजूरी दिली आहे. तर काही देश फार्मा कंपन्यांच्या विनंतीवर विचार करत आहेत. यामुळे लवकरच कोरोना विषाणू साथीचा रोग नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. कोरोनावर प्रभावी लस आल्याने परिस्थिती नियंत्रणात येईल आणि त्यामुळे जगात कच्च्या तेलाची मागणी वाढेल. या कारणांमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. 

या व्यतिरिक्त, एनर्जी इन्फॉर्नेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या मते, ११ डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात अमेरिकेतील कच्च्या तेलाचा साठा ३१ लाख बॅरलने खाली आला आहे. याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर झाला आहे. 

भारतातही तेलाची मागणी वाढत आहे. कोरोनापूर्वीच्या काळात जेवढी पेट्रोल-डिझेलची मागणी होती तेवढीच मागणी आता होऊ लागली आहे. एप्रिल महिन्यापासून डिझेल आणि जेट इंधनाच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, तरिही ही मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहे. देशातील रिफायनरीज देखील पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय किमतींमुळे सरकारी तेल कंपन्यांना देशांतर्गत इंधनाचे दर वाढवणे भाग पडले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी