Crude Oil | कच्चे तेल आणणार जगाच्या तोंडाला फेस, विक्रमी मागणीमुळे १०० डॉलरच्या वर पोचण्याची शक्यता

Crude Oil Demand | गोल्डमन सॅक्स या ब्रोकरेज कंपनीने कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी (Crude oil price)वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कच्च्या तेलाची मागणी (Crude oil demand) पुढील दोन वर्षात विक्रमी पातळीवर पोचू शकते. कच्चे तेल (Crude oil) हा घटक सर्व जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करतो. त्यामुळेच कच्च्या तेलाच्या किंमतीकडे जगाचे लक्ष लागलेले असते. मागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

Crude oil price
कच्चे तेल कडाडणार 
थोडं पण कामाचं
  • आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल विक्रमी पातळीवर पोचण्याची शक्यता
  • अर्थव्यवस्थेला येत असलेल्या गतींमुळे कच्च्या तेलाची मागणी वाढणार
  • कच्च्या तेल महागल्यावर इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता

Crude Oil price | नवी दिल्ली : पेट्रोल (Petrol price) आणि डिझेलच्या किंमती (Diesel price) आगामी काळात कमी होतील या आशेवर तुम्ही असाल तर तुम्ही चिंता करावी अशी शक्यता आहे. गोल्डमन सॅक्स या ब्रोकरेज कंपनीने कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी (Crude oil price)वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कच्च्या तेलाची मागणी (Crude oil demand) पुढील दोन वर्षात विक्रमी पातळीवर पोचू शकते. कच्चे तेल (Crude oil) हा घटक सर्व जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करतो. त्यामुळेच कच्च्या तेलाच्या किंमतीकडे जगाचे लक्ष लागलेले असते. मागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असणार आहे. (Crude oil prices to shot up in coming days, may cross $100 mark)

१०० डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडू शकते कच्चे तेल

गोल्डमन सॅक्सचा अंदाज आहे की आगामी काळात कच्च्या तेलाच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर सध्याच्या पातळीवरून वेगाने वर जाण्याची चिन्हे आहेत. २०२२ आणि २०२३ मध्ये कच्च्या तेलाच्या मागणीत जबरदस्त वाढ होत ती नव्या विक्रमी पातळीवर पोचण्याचा अंदाज आहे. याचा परिणाम होत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती १०० डॉलर प्रति बॅरलची पातळी ओलांडण्याची चिन्हे आहेत. जगभरातील अर्थव्यवस्थांनी आता गती पकडण्यास सुरूवात केली आहे. अद्याप हवाई वाहतूक क्षेत्र सुरळीत होत तिथे इंधनाची मागणी वाढणे बाकी आहे. मात्र असे असतानाच कच्च्या तेलाची मागणी आताच वरच्या पातळीवर आहे. यातून आगामी काळात कच्च्या तेलाच्या मागणीतील वाढ आणि किंमतींमधील तेजी दिसून येऊ शकते. 

कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढउतार

अलीकडेच मागणीत झालेल्या वाढीमुळे ब्रेंटआणि डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत ८० डॉलर प्रति बॅरलच्या पातळीवर पोचली होती. अर्थात ओमायक्रॉनच्या संसर्गाच्या भीतीमुळे किंमतीमध्ये घसरण होत त्या ७० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आल्या होत्या. सध्या बाजाराचे लक्ष ओमायक्रॉनसंदर्भातील नव्या घडामोडींकडे आहे. जगभरात याचे रुग्ण वाढत आहेत मात्र ओमायक्रॉन डेल्टापेक्षा जास्त गंभीर नसल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत चांगली चिन्हे निर्माण झाली आहेत. जाणकारांनुसार आगामी काळात कच्च्या तेलाच्या मागणीत वाढ होणे निश्चित आहे. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या मागणीएवढा पुरवठा न झाल्यामुळे किंमतीमध्ये जोरदार उसळी येऊ शकते.

सर्वसामान्यांवर काय होणार परिणाम

भारत आवश्यक असणाऱ्या कच्च्या तेलाचा बहुतांश भाग आयात करतो. किरकोळ बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती आणि भारतात त्यावर आकारले जाणार कर यावर अवलंबून असतात. जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली तर सर्वसामान्य नागरिकांसाठी अडचणीचे ठरेल. अर्थात आगामी काळात सरकार करांवर नियंत्रण ठेवत नागरिकांवर पडणारा भार कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात सरकारने याच पद्धतीने पावले उचलत इंधनाचे दर कमी केले होते. अर्थात यात बरेचसे कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असणार आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी