Bitcoin Price Latest : नवी दिल्ली : क्रिप्टोकरन्सीच्या दुनियेत सध्या मोठा भूकंप आलेला आहे. गेल्या 24 तासांत क्रिप्टोकरन्सी मार्केट (Cryptocurrency) जबरदस्तरीत्या कोसळते आहे. CoinMarketCap च्या आकडेवारीनुसार क्रिप्टोकरन्सीचे जागतिक बाजार भांडवल गेल्या 24 तासांमध्ये 8.65 टक्क्यांनी कमी झाले असून ते 1 अब्ज डॉलरवर आले आहे. जगातील सर्वात लोकप्रिय आणि मोठी क्रिप्टोकरन्सी असलेले बिटकॉइन (Bitcoin) तर 11.20 टक्क्यांनी गडगडले आहे. सध्या बिटकॉइन 18,132 डॉलरच्या पातळीवर व्यवहार करते आहे. तर इथेरियम (Ethereum) ने देखील मोठी घसरण नोंदवली आणि इथेरियम 1000 डॉलरच्या पातळीखाली आला. इथेरियम ही बिटकॉइननंतरची दुसरी महत्त्वाची क्रिप्टोकरन्सी असून त्यात 12.15 टक्क्यांची मोठी घसरण झाल्यानंतर ती 946 डॉलरवर आली आहे. (Cryptocurrency bleeds & continues to crash, Bitcoin tumbles at $18,000)
अधिक वाचा : Demat Account : शेअर बाजारातील गुंतवणुकदारांसाठी महत्त्वाची बातमी! डिमॅट खात्याबाबत सेबीची मोठी घोषणा
BNB टोकन 9.64 टक्क्यांनी घसरले. तर ADA टोकन 9.13 टक्क्यांनी क्रॅश झाले. मेम कॉईन डोज 9.30 टक्क्यांनी घसरले. एकंदरीत, गेल्या 24 तासांत बहुतांश आघाडीच्या क्रिप्टोकरन्सी टोकन्सच्या मूल्यात जबरदस्त घसरण होत त्यांचे मूल्य कमी झाले आहे.
जागतिक क्रिप्टोकरन्सीचे बाजारमूल्य म्हणजे मार्केट कॅप कोसळून 809 अब्ज डॉलरच्या पातळीवर आले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की क्रिप्टोकरन्सीचे बाजारमूल्य अंदाजे सात महिन्यांपूर्वी 3 ट्रिलियन डॉलरवर होते. क्रिप्टो क्रॅशमुळे, बिटकॉइन 'भय आणि लोभ' निर्देशांक 8 च्या खाली गेला आहे. ही पातळी अत्यंत भीतीची स्थिती दाखवतो.
या क्षेत्रातील जाणकारांच्या मते बिटकॉइनचे भविष्यातील चित्र फारसे काही चांगले नाही. तज्ज्ञ म्हणतात की जगातील महत्त्वाचे मोठे घटक या बाबीचे संकेत देतात की बिटकॉइन मंदीच्या चक्राच्या सर्वात खोल टप्प्यात प्रवेश करते आहे. दीर्घकालीन बिटकॉइन धारकांना देखील जबरदस्त तोटा होतो आहे. बिटकॉइनमधील घसरणीमुळे बिटकॉइनचे मूल्य नवीन नीचांकापर्यंत पोचते आहे. बिटकॉइनची सात दिवसांची चालणारी सरासरी 0.92537 या 2 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोचली आहे.
अधिक वाचा : Father’s Day Gift : या फादर्स डे निमित्त वडिलांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी द्या आर्थिक भेट, पाहा कशी?
जाणकारांना अशी भीती वाटते आहे की सध्याची जी आकडेवारी आहे आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये जी प्रचंड घसरण झाली आहे त्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये आणखीच घबराट होत त्यात अधिक विक्री होऊ शकते. सध्याच्या या पातळीवर मोठ्या प्रमाणात क्रिप्टोकरन्सीमधील विक्रीची सुरूवात होऊ शकते.
क्रिप्टो मार्केटमध्ये निर्माण झालेल्या अस्थिरतेचे आणि क्रिप्टोकरन्सी कोसळण्यामागची गोंधळाची कारणे कोणती असू शकतात याविषयी, जाणकार म्हणतात की गुंतवणुकदार या जोखमीच्या क्रिप्टो मालमत्तेपासून दूर जात आहेत. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात गडबड राहण्याची अपेक्षा आहे. येत्या आठवड्यात जगभरातील मध्यवर्ती बँका महागाई नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलत आहेत. त्याचा परिणाम शेअर बाजार, क्रिप्टोकरन्सीचा बाजार आणि वित्तीय बाजारांवर होणार आहे.