Cryptocurrency Price | २४ तासात ६७,००० टक्के वाढ, क्रिप्टोकरन्सीमधील तुफान तेजी मात्र जोखीमदेखील

Cryptocurrency Price | ह्युस्कायएक्स या फारशा माहित नसलेल्या क्रिप्टकोरन्सीच्या किंमतीत मागील २४ तासात जबरदस्त वाढ होत ती ०.००००००००८७३८ डॉलरवरून ०.०००००१४८५ डॉलरवर पोचली आहे. एका दिवसात १० लाख डॉलर मूल्याचे व्यवहार यात झाले आहेत. सध्या एकूण ९९०,०३० अब्ज डॉलरच्या क्रिप्टोकरन्सी वापरात आहेत. क्रिप्टोकरन्सीचा पुरवठा वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी या प्रकारचे व्यवहार घडवून आणले जात आहेत.

Cryptocurrency Prices
क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक 
थोडं पण कामाचं
  • क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) बाजारपेठ सध्या तुफान तेजीत
  • स्विड (SQUID, शिबा इनू (Shiba Inu) आणि कोकोस्वॅप (Kokoswap) यामध्ये जोरदार तेजी
  • ह्युस्कायएक्स (HuskyX) या नव्या क्रिप्टोकरन्सीने मागील फक्त २४ तासात ६७,००० टक्के परतावा दिला

Cryptocurrnecy Price | नवी दिल्ली: क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) बाजारपेठ सध्या तुफान तेजीत आहेत. विशेषत: नव्याने आलेल्या क्रिप्टोकरन्सीमध्ये जबरदस्त वाढ दिसून येते आहे. स्विड (SQUID, शिबा इनू (Shiba Inu) आणि कोकोस्वॅप (Kokoswap) यामध्ये जोरदार वारे आहेत. आता यादीमध्ये आणखी एका नवीन नावाची भर पडली आहे ते म्हणजे ह्युस्कायएक्स (HuskyX). या नव्या क्रिप्टोकरन्सीने मागील फक्त २४ तासात ६७,००० टक्के परतावा दिला आहे. या डिजिटल टोकनचे बाजारमूल्य १.५ अब्ज डॉलरवर पोचले आहे. (Cryptocurrency delivered 67,000% in just 24 hours, raises red flags)

ह्युस्कायएक्सची भरारी

ह्युस्कायएक्स या फारशा माहित नसलेल्या क्रिप्टकोरन्सीच्या किंमतीत मागील २४ तासात जबरदस्त वाढ होत ती ०.००००००००८७३८ डॉलरवरून  ०.०००००१४८५ डॉलरवर पोचली आहे. एका दिवसात १० लाख डॉलर मूल्याचे व्यवहार यात झाले आहेत. सध्या एकूण ९९०,०३० अब्ज डॉलरच्या क्रिप्टोकरन्सी वापरात आहेत. क्रिप्टोकरन्सीचा पुरवठा वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी  या प्रकारचे व्यवहार घडवून आणले जात आहेत. रिबेस या प्रकारामुळे क्रिप्टोकरन्सीचे मूल्य त्याच्या पुरवठ्यातील वाढ किंवा घट यानुसार कमी किंवा जास्त न होत नाही. ह्युस्कायएक्समध्ये तेजी येण्याचे हे एक मुख्य कारण आहे. ह्युस्कायएक्स हे एक डिफ्लेक्शनरी टोकन आहे. म्हणजेच त्याचा पुरवठा नेहमी कमी होत राहणार आणि ती सहजासहजी उपलब्ध होणार नाही. 

क्रिप्टोकरन्सीचा बोलबाला

सध्या भारतातच नव्हे तर जगभरात क्रिप्टोकरन्सीकडे गुंतवणुकदार मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसत आहेत. मागील वर्षभरात क्रिप्टोकरन्सीमधील व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: तरुण पिढी मोठ्या प्रमाणात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करते आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारला या गोष्टीची जाणीव आहे की क्रिप्टोकरन्सी हे एक विकसित होत असलेले तंत्रज्ञान आहे. सरकार त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आवश्यक पावले उचलणार आहे. या बैठकीत यावरदेखील एकमत झाले की सरकारने पुढील वाटचाल लक्षात घेता यासंदर्भात पावले उचलणे योग्य ठरणार आहे.

जगभरातील तज्ज्ञांशी चर्चा

क्रिप्टोकरन्सीचे पुढील भवितव्य आणि त्याच्याशी निगडीत मुद्दे यावर सर्वकंष बैठक झाली. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, अर्थ मंत्रालय, गृहमंत्रालय यांनी यासंदर्भात खोलात अभ्यास केल्यानंतर आणि सल्लामसलत केल्यानंतर ही बैठक पार पडली आहे. या सर्वांनी क्रिप्टोकरन्सीसंदर्भात देशातील आणि जगातील तज्ज्ञांशी देखील याआधी विस्तृत चर्चा याबाबतीत केली आहे. जगभरातील उदाहरणे आणि चांगल्या व्यवस्थांचाही अभ्यास करण्यात आला आहे.

आरबीआयच्या अंतर्गत पॅनेलकडून क्रिप्टोकरन्सीसंदर्भात अहवाल पुढील महिन्यात येणे अपेक्षित आहे, त्या पार्श्वभूमीवर आरबीआयच्या गव्हर्नरचे मत आले आहे. याआधी मार्च २०२० मध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालयायने रिझर्व्ह बॅंकेच्या क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला फेटाळले होते. त्यानंतर ५ फेब्रवारी २०२१ला आरबीआयने क्रिप्टोकरन्सीसंदर्भात एक अंतर्गत पॅनेल तयार केले होते. हे पॅनेल आरबीआयला डिजिटल करन्सीचे मॉडेल सुचवणार आहे. आरबीआयने याआधी घोषणा केली आहे की आरबीआयची अधिकृत डिजिटल करन्सी आणण्याची इच्छा आहे. बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सीच्या वाढत्या प्रसारासंदर्भात आरबीआयला चिंता असल्याने डिजिटल करन्सीचा विचार केला जातो आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी