Cryptocurrency Investment | जगभरातील लोक सोन्यातील पैसा काढून Bitcoin मध्ये करतायेत गुंतवणूक, कारण...

Cryptocurrency Investment | अमेरिकेत बिटकॉइन इटीएफ सुरू झाले आहे. त्याचबरोबर जगभरात क्रिप्टोकरन्सीची स्वीकार वेगाने वाढतो आहे. यावर्षी सोन्यातील गुंतवणुकीतून फारसा परतावा मिळालेला नाही. तर बिटकॉइनमधील गुंतवणुकीने मात्र गुंतवणुकदार मालामाल झाले आहेत. बिटकॉइनच्या किंमतीत यावर्षी जबरदस्त वाढ झाली आहे.

Investment in cryptocurrency
क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक 
थोडं पण कामाचं
  • बिटकॉइनकडे (Bitcoin)गुंतवणुकदारांचा जास्त ओढा
  • अमेरिकन गुंतवणूक कंपनीचे जागतिक प्रमुख असलेल्या क्रिस्टोफर वुड (Cristopher Wood)यांनी या फंडमधून अतिरिक्त ५ टक्के रकमेची गुंतवणूक बिटकॉइनमध्ये केली
  • यावर्षी सोन्यातील गुंतवणुकीतून फारसा परतावा मिळालेला नाही

Cryptocurrency Investment | नवी दिल्ली: क्रिप्टोकरन्सीकडे  (Cryptocurrency)गुंतवणुकदार मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत. त्यातही बिटकॉइनकडे (Bitcoin)गुंतवणुकदारांचा जास्त ओढा आहे. छोटे गुंतवणुकदार किंवा वैयक्तिक गुंतवणुकदारच नव्हेत तर आता अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यादेखील (Asset Management companies) यात गुंतवणूक करत आहेत. जगभरातील नामवंत व्यक्तीदेखील या गुंतवणुकीकडे वळताना दिसत आहेत. नुकताच जेफेरिज (Jefferies)या अमेरिकन गुंतवणूक कंपनीचे जागतिक प्रमुख असलेल्या क्रिस्टोफर वुड (Cristopher Wood)यांनी या फंडमधून अतिरिक्त ५ टक्के रकमेची गुंतवणूक बिटकॉइनमध्ये केली आहे. विशेष म्हणजे क्रिस्टोफर वुड यांनी सोन्यातील गुंतवणूक (Investment in Gold) काढून तो पैसा बिटकॉइनमध्ये गुंतवला आहे. म्हणजेच सोन्यातील गुंतवणूक काढून ती बिटकॉइनकडे वळवली आहे. (Cryptocurrency Investment: Global investor Jefferies withraw investment fromGod & invested the amount in Bitcoin)

क्रिस्टोफर वुडची बिटकॉइनमधील गुंतवणूक

क्रिस्टोफर वुड यांनी डिसेंबर २०२० मध्ये एकूण गुंतवणुकीच्या बिटकॉइनमध्ये ५ टक्के गुंतवणूक केली होती. ग्रीड अॅंड फीयर नावाच्या साप्ताहिक नोटमध्ये त्यांनी गुंतवणुकदारांना म्हटले होते की सोन्यातील गुंतवणुकीबद्दलचा त्यांचा विश्वास कमी झालेला नाही मात्र बिटकॉइन हे नवे युगाचे सोने आहे याकडेदेखील दुर्लक्ष करता येणार नाही. मात्र त्याचबरोबर वुड यांनी पुढे म्हटले होते की पेन्शन फंडाचे पैसे इथेरियममध्ये गुंतवणार नाहीत.

सोन्यातून फारसा परतावा नाही, बिटकॉइनने केले मालामाल 

वुड यांनी म्हटले आहे की अमेरिकेत बिटकॉइन इटीएफ सुरू झाले आहे. त्याचबरोबर जगभरात क्रिप्टोकरन्सीची स्वीकार वेगाने वाढतो आहे. यावर्षी सोन्यातील गुंतवणुकीतून फारसा परतावा मिळालेला नाही. तर बिटकॉइनमधील गुंतवणुकीने मात्र गुंतवणुकदार मालामाल झाले आहेत. बिटकॉइनच्या किंमतीत यावर्षी जबरदस्त वाढ झाली आहे.

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणे सोपे

क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीचे वैशिष्ट्ये असे की हे तुमच्या डिजिटल वॉलेटमध्ये स्टोअर केले जाते. सोन्याप्रमाणे क्रिप्टोकरन्सी सुरक्षित ठेवण्यासाठी बॅंकेतील लॉकरची आवश्यकता नसते. याचे ट्रेडिंग २४ तास करता येते. शिवाय तुम्हाला जेव्हाही विकायचे असेल तेव्हा विकता येते. त्यातुलनेत सोन्यातील गुंतवणूक करणे तितके सोपे नाही. तुम्हाला डिजिटल स्वरुपात घ्यायची असेल तरी काही प्रोसेस करावे लागतात, तर प्रत्यक्ष सोने हवे असेल तर सराफा बाजारात जावे लागते आणि सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकरदेखील लागते. शिवाय वेळेची बंधन असते. जर तुमच्या डिजिटल वॉलेटमध्ये बिटकॉइन असेल तर त्याच्या मदतीने ऑनलाइनदेखील खरेदी करता येते. यामुळे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणे तुलनेने खूपच सोपे असते.

क्रिप्टोकरन्सीने केले मालामाल

क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीने मागील काही काळात काही पटींनी परतावा दिला आहे. याच कारणामुळे गुंतवणुकदारांचा कल याकडे वाढतो आहे. भारता सध्या क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकदारांची संख्या १.५ कोटी आहे. या गुंतवणुकदारांनी एकूण १० अब्ज डॉलरची म्हणजे ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. बिटकॉइन, इथेरियमसारख्या क्रिप्टोकरन्सीला आजच्या काळातील सोने समजले जाते आहे, असे काही जाणकारांचे मत आहे.

सोने आणि क्रिप्टोकरन्सी दोघांमध्येही करा गुंतवणूक

जाणकारांच्या मते पोर्टफोलिओ हा वैविध्यपूर्ण असला पाहिजे. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीबरोबर सोन्याचाही समावेश पोर्टफोलिओमध्ये असला पाहिजे. दोघांपैकी फक्त एकाचीच निवड करणे योग्य ठरणार नाही. तज्ज्ञांच्या मते दीर्घकालावधीसाठी केलेली गुंतवणूक चांगला परतावा मिळवून देते. अशावेळी क्रिप्टोकरन्सीमध्येदेखील दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी