Cryptocurrency | क्रिप्टोकरन्सी व्हेल काय असते? गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे

Cryptocurrency Investment | क्रिप्टोकरन्सीविषयी जाणून न घेता क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तुम्हाला जर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर काही गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेतल्या पाहिजेत. क्रिप्टोकरन्सीशी निगडीत काही महत्त्वाच्या बाबींमधीलच एक बाब म्हणजे क्रिप्टोकरन्सी व्हेल. ही गोष्ट तुमच्या क्रिप्टोकरन्सीच्या मूल्यावर परिणाम करू शकते. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी व्हेल समजून घेणे महत्त्वाचे ठरते.

What is cryptocurrency whale
क्रिप्टोकरन्सी व्हेल काय आहे 
थोडं पण कामाचं
  • क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीत दिवसेंदिवस मोठी वाढ
  • क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी क्रिप्टोकरन्सी व्हेलसारख्या काही बाबी माहित असणे आवश्यक
  • तरुणाई क्रिप्टोकरन्सीकडे अधिक प्रमाणात आकर्षित

Cryptocurrency Whales | नवी दिल्ली : क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency)हा जगभरातील गुंतवणुकदारांसाठी परवलीचा शब्द बनला आहे. दिवसेंदिवस क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक वाढतच चालली आहे. भारतातदेखील क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीत (Cryptocurrency investment) मोठी वाढ होताना दिसते आहे. ज्या वेगाने क्रिप्टोकरन्सीने जगभर विस्तार केला आहे, ते लक्षात गुंतवणुकीसाठीचा एक पर्याय (Investment option)बनून क्रिप्टोकरन्सी वित्तीय व्यवस्थेसमोर उभी राहिली आहे. विशेष करून तरुण पिढी क्रिप्टोकरन्सीकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाली आहे. अर्थात क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठ्या वेगाने चढ उतार होत असतात. त्यामुळे एका क्षणी तुम्ही यात गुंतवणूक करून मोठी कमाई करून शकता, मात्र त्याचवेळी तुम्हाला एकदम मोठे नुकसान होण्याचीदेखील तेव्हढीच शक्यता असते. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणे आवश्यक ठरते. क्रिप्टोकरन्सी व्हेल (Cryptocurrency Whales)किंवा क्रिप्टो व्हेल ही अशीच एक बाब आहे जी माहित असणे आवश्यक ठरते. (Cryptocurrency Investment : What is cryptocurrency whale, know the details before you invest in cryptocurrency)

क्रिप्टोकरन्सीविषयी जाणून न घेता क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तुम्हाला जर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर काही गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेतल्या पाहिजेत. क्रिप्टोकरन्सीशी निगडीत काही महत्त्वाच्या बाबींमधीलच एक बाब म्हणजे क्रिप्टोकरन्सी व्हेल. ही गोष्ट तुमच्या क्रिप्टोकरन्सीच्या मूल्यावर परिणाम करू शकते. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी व्हेल समजून घेणे महत्त्वाचे ठरते. पाहूया क्रिप्टोकरन्सी व्हेल नेमके असते तरी काय?

क्रिप्टोकरन्सी व्हेल काय आहे?

जे गुंतवणुकदार क्रिप्टोकरन्सी मोठ्या प्रमाणात ठेवतात किंवा बाळगतात, त्यांना क्रिप्टोकरन्सीचे व्हेल म्हटले जाते. कारण त्यांच्याकडे मोठ्या संख्येने क्रिप्टो कॉइन असतात. या लोकांकडे मोठ्या संख्येने क्रिप्टो कॉइन असल्यामुळे ते क्रिप्टोकरन्सीच्या बाजारपेठेवर प्रभाव टाकत त्याच्या मूल्यावरदेखील प्रभाव टाकतात. यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या किंमतींमध्ये सतत चढउतार दिसून येतात. मागील काही आठवड्यांपासून बिटकॉइनच्या किंमतीत मोठे चढ उतार होताना दिसत आहेत.

क्रिप्टोकरन्सी व्हेल क्रिप्टोच्या किंमतीवर कसा प्रभाव टाकतात

क्रिप्टो व्हेल सर्वसामान्यपणे मोठा सेल ऑर्डर म्हणजे क्रिप्टो कॉइन विकण्याचे ऑर्डर देतात. बाजारातील दुसऱ्या सेल ऑर्डरवर याचा एकत्रित परिणाम होतो. यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात मोठी उलथा पालथ होते. क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत घसरण होते. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण होते. क्रिप्टोकरन्सीच्या किंमतींमध्ये स्थैर्य तेव्हा येते जेव्हा क्रिप्टो व्हेल बाजारातून आपले मोठे सेल ऑर्डर्स मागे घेतात. मात्र तोपर्यत त्यांनी बाजारात अस्थिरता निर्माण केलेली असते. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या किंमती त्या दिशेने जातात ज्या दिशेने क्रिप्टो व्हेलना त्यांना न्यायचे असते. यातून व्हेल पुन्हा आणखी जास्त कॉइन्स गोळा करतात. या पद्धतीला सेल वॉल असे म्हणतात.

क्रिप्टोकरन्सीच्या बाजाराचे नियमन नसल्याचा परिणाम

क्रिप्टो व्हेल ज्या दुसऱ्या पद्धतीचा वापर करतात ती पहिल्यापेक्षा अगदी उलटी आहे. यामध्ये व्हेल क्रिप्टोकरन्सीच्या किंमती वाढवतात. असे करण्यासाठी व्हेल क्रिप्टो बाजारात असलेल्या क्रिप्टोकॉइनच्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीने खरेदीची ऑर्डर देतात. यामुळे क्रिप्टोकरन्सीची विकत घेणारे आपली बोली वाढवतात, जेणेकरून त्यांनी ती विकत घेता यावीत. अर्थात नियमन केल्या जात असलेल्या आणि नियंत्रणात असलेल्या शेअर बाजारात हे प्रकार बेकायदेशीर आहेत. मात्र क्रिप्टोकरन्सीच्या बाजारावर अद्याप कोणतेही नियमन नसल्यामुळे सर्व प्रकारच्या चलाख्या तिथे चालतात. क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात व्हेल अनेकवेळा आपला प्रभाव टाकत असतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी