Crypto Markets Crash| क्रिप्टोकरन्सी झाली रक्तबंबाळ...क्रिप्टो बाजार झाला क्रॅश! गुंतवणूक ठेवावी की काढावी? पाहा तज्ज्ञांचे मत

Crypto Fall : क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात जबरदस्त घसरण झाली आहे. सर्व प्रमुख क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) जोरदार घसरण झाली आहे. क्रिप्टोकरन्सीचे एकूण जागतिक बाजार भांडवल 7.30 टक्क्यांनी घसरले आहे आणि आता ते 1.67 ट्रिलियन डॉलरवर आले आहे. CoinMarketCap च्या आकडेवारीनुसार, बिटकॉइन (Bitcoin),इथेरियम ( Ethereum), कार्डेनो ( Cardano )आणि सोलाना (Solana) सारख्या आघाडीच्या क्रिप्टोकरन्सीना देखील क्रॅशचा फटका बसला आहे. बिटकॉइन (Bitcoin Price) 36,285.07 डॉलरवर व्यवहार करते आहे.

cryptocurrency market crash
क्रिप्टोकरन्सीचा बाजार कोसळला 
थोडं पण कामाचं
  • क्रिप्टोकरन्सीच्या जागतिक बाजारपेठेत जबरदस्त घसरण
  • क्रिप्टोकरन्सीच्या 7 टक्क्यांपेक्षा जास्त गटांगळ्या, गुंतवणुकदार धास्तावले
  • बिटकॉइन, इथेरियम, सोलाना, कार्डेनोसकट सर्वच क्रिप्टोकरन्सींच्या किंमतीत जबरदस्त घसरण

Cryptocurrency Update : नवी दिल्ली : क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात जबरदस्त घसरण झाली आहे. सर्व प्रमुख क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) जोरदार घसरण झाली आहे. क्रिप्टोकरन्सीचे एकूण जागतिक बाजार भांडवल 7.30 टक्क्यांनी घसरले आहे आणि आता ते 1.67 ट्रिलियन डॉलरवर आले आहे. CoinMarketCap च्या आकडेवारीनुसार, बिटकॉइन (Bitcoin),इथेरियम ( Ethereum), कार्डेनो ( Cardano )आणि सोलाना (Solana) सारख्या आघाडीच्या क्रिप्टोकरन्सीना देखील क्रॅशचा फटका बसला आहे. बिटकॉइनने  त्याची आधार पातळी तोडली असून आणि गेल्या 24 तासात 8.20 टक्क्यांनी घसरल्यानंतर आता बिटकॉइन (Bitcoin Price) 36,285.07 डॉलरवर व्यवहार करते आहे. (Cryptocurrency market crashes, Global market fall by 7.30%)

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 06 May 2022 : सोने स्थिरावले, काही दिवस 50500-51500 रुपयांच्या पट्ट्यात राहण्याची शक्यता, पाहा ताजा भाव

बिटकॉइनसह सर्वच गंडले

फक्त बिटकॉइनच नाही तर जगातील सर्वच प्रमुख क्रिप्टोकरन्सी जोरात आपटल्या आहेत. इथेरियम (Ethereum) सुमारे 7 टक्क्यांनी घसरला आहे. तर सोलाना (Solana)आणि कार्डानो (Cardano) प्रत्येकी अनुक्रमे 10 आणि 11 टक्क्यांनी घसरले आहेत. Dogecoin आणि Shiba Inu सारख्या Memecoins ला देखील याचा फटका बसला. तर दुसरीकडे इलॉन मस्कचे आवडते क्रिप्टो टोकन, डॉजकॉइन, गेल्या 24 तासांत 5 टक्क्यांहून अधिक घसरले आहे. अलीकडच्या काळात तेजीत असणारे शिबा इनू 6 टक्क्यांहून अधिक क्रॅश झाले आहे. क्रिप्टोकरन्सी गंडल्यामुळे जगभरातील गुंतवणुकदार चिंताग्रस्त झाले आहेत. क्रिप्टोकरन्सीच्या गटांगळ्या कुठवर जाऊन थांबणार याचीच चिंता गुंतवणुकदारांना लागली आहे. त्यामुळे आता गुंतवणुकदारांनी काय करावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बाजारातील तीव्र नकारात्मक भावनांमध्ये त्यांनी त्यांची गुंतवणूक ठेवावी की क्रिप्टोकरन्सी विकून टाकाव्यात यावर तज्ज्ञांनी त्यांचे मत दिले आहे.

अधिक वाचा : Banking Update | या सरकारी बँकेवर मोठे संकट, बंद कराव्या लागणार 600 शाखा, तुमचे खाते आहे का यात, लगेच चेक करा

तज्ज्ञांना काय वाटते

जाणकार म्हणतायेत की क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीतील ही घसरण ही खरेदीची संधी म्हणून घेतली पाहिजे. तज्ज्ञ म्हणतात, "तांत्रिक निर्देशक संकेत देतात की बिटकॉइनच्या किंमती 30,000 ते 32,000 डॉलरच्या आसपास राहतील. लुना फाउंडेशन गार्ड बिटकॉइनच्या किंमतीत झालेल्या घसरणीचा सर्वोत्तम वापर करते आहे आणि टेरा स्टेबलकॉइनचा साठा वाढवण्यासाठी बिटकॉइनमध्ये जवळपास १.५ अब्ज डॉलर जमा केले आहेत. टेस्लाला मागे टाकत लुना फाउंडेशन गार्ड बिटकॉइनचे नंबर वन धारक बनले आहे.

जाणकार पुढे म्हणतात की Bitcoin आणि altcoins ची घसरण सुरू असताना स्टेबलकॉइन्स कसे उभे राहिले.  “स्टेबलकॉइन्सने altcoins पेक्षा तुलनेने चांगली कामगिरी केली आहे. बाजारातील अस्थिरता लक्षात घेता, गुंतवणुकदार त्यांचा पोर्टफोलिओ स्टेबलकॉइन्समध्ये वाढवण्याचा विचार करू शकतात.

अधिक वाचा : MSC Bank Recruitment | बँकेत नोकरी करायची आहे का? पदवीधर तरुणांसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत मोठी नोकरभरती, लगेच अर्ज करा

संयमाने मिळवा फायदा

जिओटस क्रिप्टो एक्सचेंजचे सीईओ विक्रम सुब्बुराज यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले, “सध्या जोखीम-बंद असलेले गुंतवणूकदार जोपर्यंत रिस्क-ऑन मोडकडे वळत नाहीत तोपर्यंत क्रिप्टो मार्केट अस्थिर राहणार आहे. आगामी महिन्यांत, स्टॉक आणि क्रिप्टोमध्ये पुनरुज्जीवन होण्याचे संकेत मिळण्यापूर्वी डॉलर निर्देशांक DXY मधील वाढ उलट करावी लागेल. Bitcoin आणि इतर क्रिप्टो-मालमत्तेमध्ये गुंतवणुकदारांचे भांडवल पुन्हा मालमत्तेमध्ये येण्यास सुरुवात होण्यापूर्वी सध्याच्या पातळीपासून 20 टक्के किंवा त्याहून अधिक घट होऊ शकते.

त्यांनी गुंतवणुकदारांना या घसरणीतून सर्वोत्तम फायदा मिळवण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “गुंतवणुकदारांना रोख रक्कम स्टॅक करणे आणि क्रिप्टोला नवीन भांडवल वाटप करण्यापूर्वी रिव्हर्सलच्या संकेतांची प्रतीक्षा करणे चांगले होईल. विद्यमान पोर्टफोलिओ एकत्रित करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी संयम महत्त्वाचा असेल. आम्ही क्रिप्टोकरन्सीच्या बाजाराला 2022 ची चौथी तिमाही चांगली जाण्याची अपेक्षा करतो. ”

दीर्घकालीन दृष्टीकोन हवा

युनोकॉइन क्रिप्टो एक्स्चेंजचे सह-संस्थापक आणि सीईओ सात्विक विश्वनाथ म्हणाले की, सध्याचे संकेत केवळ अल्पकालीन गुंतवणुकदारांसाठी चिंताजनक आहेत आणि दीर्घकालीन गुंतवणुकदारांना मार्केटच्या चढउतारांबद्दल काळजी करण्याची गरज आहे. ते म्हणाले, “बाजारात काही दिवसांपासून थोडा चढ-उतार होत आहे. मध्यम-किंवा दीर्घ-मुदतीच्या गुंतवणुकदारांसाठी यामुळे काही फरक पडत नसला तरी अल्प-मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांनी या चढउताराच्या काळात त्यांच्या गुंतवणुकीबद्दल सावध असले पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी