Cryptocurrency market | २०३० पर्यंत क्रिप्टोकरन्सीचे बाजारमूल्य १०० पटीने वाढण्याचा अंदाज, गुंतवणुकदार मालामाल होण्याची चिन्हे

Investment in Bitcoin : क्रिप्टोकरन्सीने गुंतवणूकदारांना अवघ्या काही महिन्यांत कित्येक पट म्हणजे मल्टीबॅगर परतावा (Multibagger returns) दिला आहे. कोरोनामुळे जगभरातील शिखर बँकांनी भरपूर पैसे छापले आणि हे पैसे डिजिटल चलनात गुंतवले गेले. तथापि, यावर्षी क्रिप्टोकरन्सीमध्ये घसरणदेखील झाली आहे. मात्र आगामी वर्षांमध्ये क्रिप्टोकरन्सी हा जगातील महत्त्वाचा गुंतवणूक पर्याय (Investment option)बनवण्याचा अंदाज तज्ज्ञ वर्तवत आहेत.

cryptocurrency market
क्रिप्टोककरन्सीची दुनिया 
थोडं पण कामाचं
  • जागतिक क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात विस्तारणार
  • १० वर्षात क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ २५० ट्रिलियन डॉलरवर पोचणार
  • बिटकॉइन गाठणार १ लाख डॉलरचा टप्पा

Cryptocurrency Outlook: नवी दिल्ली : अलीकडच्या काही वर्षांपासून, क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) चर्चा सर्वत्र सुरू आहे. याचे कारण असे की याने गुंतवणूकदारांना अवघ्या काही महिन्यांत कित्येक पट म्हणजे मल्टीबॅगर परतावा (Multibagger returns) दिला आहे. कोरोनामुळे जगभरातील शिखर बँकांनी भरपूर पैसे छापले आणि हे पैसे डिजिटल चलनात गुंतवले गेले. तथापि, यावर्षी क्रिप्टोकरन्सीमध्ये घसरणदेखील झाली आहे. मात्र आगामी वर्षांमध्ये क्रिप्टोकरन्सी हा जगातील महत्त्वाचा गुंतवणूक पर्याय (Investment option)बनवण्याचा अंदाज तज्ज्ञ वर्तवत आहेत. (Cryptocurrency Marktet capital will rise by 100 times, reach to 250 trillion dollar) 

क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ २५० ट्रिलियन डॉलरची होणार

इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात, रिअल व्हिजनचे सीईओ आणि गोल्डमन सॅक्सचे माजी कर्मचारी राऊल पॉल यांनी सांगितले की, २०३० पर्यंत क्रिप्टोकरन्सीचे मार्केट कॅपिटल म्हणजे बाजारभांडवल सध्याच्या तुलनेत १०० पटीने जास्त असेल. क्रिप्टोकरन्सीचे एकूण मार्केट कॅप सध्या २ ट्रिलियन डॉलरपेक्षा थोडे अधिक आहे. ते म्हणतात की २०३० पर्यंत ते २५० ट्रिलियन डॉलरच्या पुढे पोहोचेल. त्यानुसार, क्रिप्टोकरन्सी असा अॅसेट क्लास असेल ज्यामध्ये सर्वाधिक वाढ होईल. सध्या, जागतिक इक्विटी मार्केट, बाँड मार्केट, रिअल इस्टेटचे एकूण मार्केट कॅप सुमारे २५०-३५० ट्रिलियन डॉलर आहे. त्यावरून क्रिप्टोकरन्सीच्या विस्ताराचा अंदाज यावा.

३५० कोटींचा युजर बेस असणे आवश्यक 

त्याच्या संभाव्यतेबद्दल बोलताना, पॉल म्हणाले की जर २०३० पर्यंत जागतिक क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकदारांची संख्या ३.५ अब्ज किंवा ३५० कोटींपर्यत पोहोचली तर मार्केट कॅप कोणत्याही परिस्थितीत २५० ट्रिलियन डॉलरच्या पुढे जाईल. या शक्यतेबद्दल, जिओटस क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजचे सह-संस्थापक आणि सीईओ विक्रम सबुराज म्हणाले की, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा क्रिप्टोकरन्सीला जगातील सरकार आणि संस्था यांच्याकडून मान्यता मिळेल.

मार्केट कॅपमध्ये २५-३० टक्क्यांची सुधारणा

सध्या क्रिप्टोकरन्सीच्या मार्केट कॅपमध्ये २५-३० टक्के सुधारणा झाल्याचेही बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ते सध्या २ ट्रिलियन डॉलरच्या जवळ आहे. आजूबाजूला ज्या प्रकारच्या बातम्या येत आहेत, त्यामुळे येत्या काही दिवसांत क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्याचे प्रमाण खूप वाढण्याची शक्यता आहे. पुढील १० वर्षात हा टॉप अॅसेट क्लास असेल. येथे जो परतावा गुंतवणूकदारांना मिळेल, तसा परतावा सोने किंवा इक्विटीमध्ये मिळणार नाही.

बिटकॉइन ४२ हजार डॉलर्सच्या जवळ 

सध्या बिटकॉइन ४२ हजार डॉलर्सच्या जवळपास आहे. जानेवारी महिन्यात बिटकॉइनचे मार्केट कॅप आतापर्यंत ८० अब्ज डॉलरपेक्षा जास्त घसरले आहे. अशा स्थितीत बिटकॉइन १ लाख डॉलरवर जाण्याच्या शक्यतेवर मळभ दाटले आहे. क्रिप्टो मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बिटकॉइन त्या पातळीवर नक्की पोचेल, अर्थात घसरणीमुळे ती पातळी गाठण्यास थोडा विलंब होईल किंवा अधिक कालावधी लागेल.

सोन्याचे गुंतवणूकदार क्रिप्टोकडे वळत आहेत

कोरोनाच्या काळात बिटकॉइन ६५ हजार डॉलर्सच्या पुढे पोहोचले होते, तो आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक आहे. सध्याच्या पातळीपासून १ लाख डॉलरपर्यंत पोहोचण्यासाठी बिटकॉइनमध्ये १३० टक्क्यांहून अधिक तेजी येणे आवश्यक आहे. गोल्डमन सॅक्सचे विश्लेषक झॅक पांडल यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की क्रिप्टोकरन्सी सोन्याच्या बाजारपेठेवर अशाच प्रकारे वरचढ राहिली तर बिटकॉइन १ लाख डॉलरच्या मूल्याचा टप्पा सहज ओलांडू शकेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी