Cryptocurrency Prices: बिटकॉइनसह इथर, डॉजकॉइनच्या किंमतीत घसरण

Cryptocurrency Prices: मागील काही आठवड्यात क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीचा ओघ ८० टक्क्यांपेक्षा जास्त घसरून २८.८ कोटी डॉलरवर पोचला आहे. कॉइनशेअर्सनुसार बिटकॉइन फ्युचर्स एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये जास्त उलाढाल न दिसल्याचा विपरित परिणाम गुंतवणुकदारांवर झाला आहे.

Cryptocurrency Prices
क्रिप्टोकरन्सीचा ट्रेंड 
थोडं पण कामाचं
  • बिटकॉइनच्या किंमतीत १ टक्के घसरण होत ती ६१,९४६ डॉलरवर
  • इथर मध्येदेखील एक टक्के घसरण झाली
  • Shiba Inu च्या किंमतीत २३ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण होत ते ०.००००४६ डॉलरवर पोचले

Bitcoin Prices Today: नवी दिल्ली : क्रिप्टोकरन्सीमध्ये घसरण दिसून येते आहे. बिटकॉइनच्या किंमतीत शुक्रवारी घसरण होत ती ६२,००० खाली गेली आहे. बिटकॉइन ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. बिटकॉइनच्या किंमतीत १ टक्के घसरण होत ती ६१,९४६ डॉलरवर आली आहे. यावर्षी बिटकॉइनच्या किंमतीत आतापर्यत ११४ टक्के वाढ दिसून आली होती. ऑक्टोबरमध्ये बिटकॉइनमध्ये जवळपास ६७,००० डॉलरची विक्रमी पातळी गाठली होती. (Cryptocurrency Prices: Along with Ether, Dogecoin, Bitcoin records downfall in prices)

Shiba Inu च्या किंमतीत २३ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण

इथेरियमशी लिंक्ड कॉइन आणि जगातील दुसरी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या इथर मध्येदेखील एक टक्के घसरण झाली आहे. इथरची किंमत सध्या ४,५३१ डॉलरवर पोचली आहे. तर डॉजकॉइनमध्ये ३ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण होत त्याची किंमत ०.२६ डॉलरवर आली आहे. तर एक्सआरपी, कार्डेनो, युनिस्वॅप, लाइटकॉइन, पोल्कोडॉट सारख्या दुसऱ्या डिजिटल टोकनमध्ये मागील २४ तासात घसरण झाली आहे. याशिवाय Shiba Inu च्या किंमतीत २३ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण होत ते ०.००००४६ डॉलरवर पोचले आहे. डॉजकॉइनचे बाजारमूल्यदेखील घसरले आहे. अलीकडेच शिबा इनूने बाजारमूल्यात डॉजकॉइनला मागे टाकले होते. Solana, Binance Coin आणि Tether मध्ये मात्र थोडी घसरण झाली.

ऑक्टोबरपासून क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत तेजी दिसून येत होती. त्याचबरोबर नॉन फंजिबल टोकन्समध्ये देखील अलीकडच्या काळात मोठी तेजी दिसून आली. शिवाय अनिश्चित व्याजदर, बॅंकांकडून क्रिप्टोकरन्सीचा स्वीकार या घटकांचाही परिणाम क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीवर होताना दिसून आला. विशेषत: बिटकॉइन आणि इथरच्या किंमतीवर याचा परिणाम झाला.

क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक घटली

मागील काही आठवड्यात क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीचा ओघ ८० टक्क्यांपेक्षा जास्त घसरून २८.८ कोटी डॉलरवर पोचला आहे. कॉइनशेअर्सनुसार बिटकॉइन फ्युचर्स एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये जास्त उलाढाल न दिसल्याचा विपरित परिणाम गुंतवणुकदारांवर झाला आहे. २९ ऑक्टोबरला सरणाऱ्या आठवड्यात, अमेरिकन गुंतवणुकदारांनी बिटकॉइन ईटीएफमध्ये केलेली गुंतवणूक फक्त ५.३ कोटी डॉलर इतकी होती.

बिटकॉइनमध्ये मागील एका वर्षात चार पट पेक्षा जास्त तेजी दिसून आली आहे. मागील महिन्यात बिटकॉइनची किंमत ६७,००० डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोचली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि वित्तीय क्षेत्रातील अनुकूल परिस्थितीमुळे क्रिप्टोकरन्सीला पोषक वातावरण मागील महिन्यात तयार झाले होते. 

याआधी सहा महिन्यांपूर्वी बिटकॉइन ६४,८९५ डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोचला होता. या तेजीचे कारण प्रोशेअर्स बिटकॉइन स्ट्रॅटेजी ईटीएफ हे होते. या फंडाच्या मदतीने गुंतवणुकदार बिटकॉइनच्या भविष्यातील मूल्याचा अंदाज बांधू शकतात. यासाठी बिटकॉइन विकत घेण्याची गरज पडत नाही. यामुळे पहिल्यांदाच गुंतवणुकदार न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर बिटकॉइनशी संबंधित अॅसेटची ट्रेडिंग करू शकत आहेत. काही दिवसांपूर्वी शिबा इनूने जबरदस्त तेजी दाखवली होती. शिबा इनू तेजीसह विक्रमी पातळीवर पोचली आहे. बाजारमूल्याच्या हिशोबाने शिबा इनू ११वी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बनली आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी