Cryptocurrency Price | बिटकॉइन विक्रमी पातळीवर, इथर, डॉजकॉइनमध्येही तेजी

Bitcoin Prices Today | बिटकॉइन मागील विक्रमी पातळीच्याही वर जात ६७,७७८ डॉलरवर पोचली आहे. इथरची किंमत ४,८०० डॉलरच्या नव्या विक्रमी पातळीवर पोचली आहे. दोन्ही क्रिप्टोकरन्सी जूननंतर जवळपास दुप्पट झाली आहे.

Cryptocurrency Prices
क्रिप्टोकरन्सीची दुनिया 
थोडं पण कामाचं
  • क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीमध्ये सध्या मोठी तेजी
  • बिटकॉइनची किंमत ६७,७०० डॉलरच्या विक्रमी पातळीवर
  • इथरची किंमत ४,८०० डॉलरच्या नव्या विक्रमी पातळीवर

Bitcoin Prices Today | नवी दिल्ली : क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीमध्ये मंगळवारी मोठी तेजी दिसून आली. बिटकॉइनच्या किंमतीत वाढ होत ते ६७,७०० डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोचले आहे. बाजारमूल्य आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने बिटकॉइन ही सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. बाजारमूल्याच्या दृष्टीने दुसरी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या इथरमध्येही तेजी दिसून आली. इथरची किंमत ४,८०० डॉलरच्या वर पोचली आहे. दोन्ही क्रिप्टोकरन्सी जूननंतर जवळपास दुप्पट झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार क्रिप्टोकरन्सीचे एकूण बाजारमूल्य ३ ट्रिलियन डॉलरच्यावर पोचले आहे. (Cryptocurrency Prices : Bitcoin price crosses 67,700 dollar mark, while Ether & Dogecoin also show surge)

बिटकॉइनमधील जबरदस्त तेजी

बिटकॉइन हे क्रिप्टोकरन्सीमधील सर्वात मोठे डिटिटल टोकन आहे. बिटकॉइनच्या किंमतीत जवळपास ३ टक्क्यांची जबरदस्त तेजी आली आहे. बिटकॉइन मागील विक्रमी पातळीच्याही वर जात ६७,७७८ डॉलरवर पोचली आहे. २० ऑक्टोबरला बिटकॉइन मागील विक्रमी पातळीच्या म्हणजे ६७,००० डॉलरच्या आसपास पोचली होती. बिटकॉइन आता एक दशकाहून जुने झाले आहे. २०२०च्या अखेरीस बिटकॉइनची जी किंमत होती त्याच्या जवळपास चौपट किंमत आता झाली आहे. बिटकॉइने यावर्षी आतापर्यत १३० टक्क्यांपेक्षा जास्त तेजी नोंदवली आहे.

Shiba Inu मध्ये ५ टक्क्यांची तेजी

इथर या दुसऱ्या मोठ्या क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत २ टक्क्यांची तेजी आली आहे. इथरची किंमत ४,८०० डॉलरच्या नव्या विक्रमी पातळीवर पोचली आहे. इथर ही इथेरियम ब्लॉकचेनशी निगडीत क्रिप्टोकरन्सी आहे. इथर आता आपल्या विक्रमी पातळीच्या आसपास ट्रेड करते आहे. बिटकॉइनच्या तेजीनेच इथरची वाटचाल सुरू आहे. ब्लॉकचेनमध्ये गुंतवणुकदारांनी मोठा रस दाखवल्यामुळे झाली आहे.

तर दुसऱ्या बाजूला डॉजकॉइनच्या किंमतीतदेखील ५ टक्क्यांची उसळी आली आहे. डॉजकॉइनची किंमत ०.२८ डॉलरवर पोचली आहे. तर शिबा इनूमध्ये तब्बल ५ टक्क्यांची तेजी आली आहे. शिबा इनूची किंमत ०.००००५७ डॉलरवर पोचली आहे. कार्डेनो, लाइटकॉइन, एक्सआरपी, पोल्काडॉट, युनिस्वॅप, स्टेलर यासारख्या क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीतदेखील वाढ झाली आहे. 

चढ उतारांचा प्रवास

बिटकॉइनचा प्रवास हा चढ उतारांचा झाला आहे. कारण जूनमध्ये त्याच्या ऊर्जेचा वापर आणि चीनमध्ये क्रिप्टोकरन्सीवर निर्बंध लावण्यावर झालेल्या टीकेमुळे बिटकॉइनची किंमत ३०,००० डॉलरच्या खाली गेली होती. मात्र हळूहळू त्यात सुधारणा होण्यास सुरूवात झाली. बिटकॉइन व्यतिरिक्त इथेरियम आणि सोलाना सारख्या ब्लॉकचेन मध्ये अपग्रेडेशन सुरू आहे. एनएफटीच्या मागणीतदेखील वाढ होते आहे. याशिवाय डॉजकॉइन, शिबा इनू मध्ये गुंतवणुकादारांचा रस वाढतो आहे.

जगभरातील अनेक बॅंकांनी आपली क्रिप्टोकरन्सी बनवण्याचे सूतोवाच केले आहे. त्याचबरोबर व्हर्च्युअल गेमिंग प्लॅटफॉर्म्सवर नॉन फंजिबल टोकन म्हणजे एनएफटीची वाढ होते आहे. बिटकॉइन फ्युचर्सवर आधारित अमेरिकन इटीएफची सुरूवात आणि सध्या व्याजदरांमध्ये असलेली अनिश्चितता, या सर्व घटकांमुळे गुंतवणुकदार क्रिप्टोकरन्सीकडे वळत आहेत. त्यातही गुंतवणुकदारांचा कल बिटकॉइन आणि इथरकडे अधिक आहे. मागील महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबरपासून या क्रिप्टोकरन्सीमध्ये तेजी दिसून येते आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची क्रिप्टोकरन्सी असलेल्या इथरमध्ये विक्रमी तेजी आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी