Cryptocurrency Prices | बिटकॉइनच्या किंमतीत वाढ, शिबा इनूमध्ये मात्र ९ टक्के घसरण

Cryptocurrency Prices | जगभरातील अनेक बॅंकांनी आपली क्रिप्टोकरन्सी बनवण्याचे सूतोवाच केले आहे. बिटकॉइन फ्युचर्सवर आधारित अमेरिकन इटीएफची सुरूवात आणि सध्या व्याजदरांमध्ये असलेली अनिश्चितता, या सर्व घटकांमुळे गुंतवणुकदार क्रिप्टोकरन्सीकडे वळत आहेत.

Cryptocurrency Prices
क्रिप्टोककरन्सीची दुनिया 
थोडं पण कामाचं
  • बिटकॉइनची किंमत तेजीसह ६५,००० डॉलरच्या वर पोचली
  • ३ टक्के तेजीसह इथरची किंमत ४,७०० डॉलरवर पोचली
  • Shiba Inu च्या किंमतीत ९ टक्के घसरण होत ती ०.००००५३ डॉलरवर आली

Bitcoin Prices | नवी दिल्ली: बिटकॉइनच्या किंमतीत सोमनारी तेजी दिसून आली. बिटकॉइनची किंमत तेजीसह ६५,००० डॉलरच्या वर पोचली आहे. बिटकॉइन ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. बिटकॉइनच्या किंमतीत ५ टक्क्यांची वाढ होत ती ६५,३५३ डॉलरवर पोचली आहे. यावर्षी आतापर्यत या लोकप्रिय क्रिप्टोकरन्सीमध्ये १२१ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. ऑक्टोबर महिन्यात बिटकॉइन जवळपास ६७,००० डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोचला होता. तर आणखी एक मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या इथरमध्ये जवळपास ३ टक्के तेजी दिसून आली आहे. त्यामुळे इथरची किंमत ४,७०० डॉलरवर पोचली आहे. (Cryptocurrency Prices : Bitcoin shows boom today while price of Shiba Inu declined by 9 percent)

इतर क्रिप्टोकरन्सीची किंमत

इथर (Ether) ही क्रिप्टोकरन्सी इथेरियम या ब्लॉकचेनशी निगडीत आहे. आणखी एक क्रिप्टोकरन्सी डॉजकॉइनमध्ये (dogecoin) ३ टक्क्यांची वाढ होत ती ०.२७ डॉलरवर पोचली आहे. कार्डेनोच्या किंमतीत ३ टक्क्यांपेक्षा जास्त तेजी आली आहे. कार्डेनोची (Cardano)किंमत आता २.०५ डॉलरवर पोचली आहे. याशिवाय इतर क्रिप्टोकरन्सी म्हणजे एक्सआरपी (XRP), युनिस्वॅप (Uniswap), लाइटकॉइन (Litecoin),पोल्काडॉट (Polkadot), बानान्स कॉइन (Binance Coin) यांच्यामध्येदेखील मागील चोवीस तासात तेजी नोंदवण्यात आली आहे. दरम्यान Shiba Inu च्या किंमतीत ९ टक्के घसरण होत ती ०.००००५३ डॉलरवर आली आहे. सोलानामध्ये देखील ४ टक्के घसरण झाली आहे. सोलानाची किंमत २४३ डॉलरवर पोचली आहे.

बिटकॉइनमधील तेजीचे कारण

जगभरातील अनेक बॅंकांनी आपली क्रिप्टोकरन्सी बनवण्याचे सूतोवाच केले आहे. त्याचबरोबर व्हर्च्युअल गेमिंग प्लॅटफॉर्म्सवर नॉन फंजिबल टोकन म्हणजे एनएफटीची वाढ होते आहे. बिटकॉइन फ्युचर्सवर आधारित अमेरिकन इटीएफची सुरूवात आणि सध्या व्याजदरांमध्ये असलेली अनिश्चितता, या सर्व घटकांमुळे गुंतवणुकदार क्रिप्टोकरन्सीकडे वळत आहेत. त्यातही गुंतवणुकदारांचा कल बिटकॉइन आणि इथरकडे अधिक आहे. मागील महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबरपासून या क्रिप्टोकरन्सीमध्ये तेजी दिसून येते आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची क्रिप्टोकरन्सी असलेल्या इथरमध्ये विक्रमी तेजी आली आहे. 

मागील महिन्यात बिटकॉइन विक्रमी पातळीवर

ऑक्टोबर महिन्यात बिटकॉइनमध्ये मोठी तेजी आली होती. मागील वर्षभरात बिटकॉइनमध्ये चारपट तेजी दिसून आली आहे. ऑक्टोबरमध्ये बिटकॉइनची किंमत ६७,००० डॉलरच्या पार पोचली होती. अमेरिकेत बिटकॉइन फ्युचर्सवर आधारित ईटीएफ सुरू झाल्यानंतर क्रिप्टोकरन्सीसंदर्भात अनुकूल वातावरण तयार झाले आहे. क्रिप्टोकरन्सी हा एक लोकप्रिय गुंतवणूक प्रकार म्हणून विस्तारतो आहे. जगभरातील गुंतवणुकदारांचा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढतो आहे.

मागील काही आठवड्यात क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीचा ओघ ८० टक्क्यांपेक्षा जास्त घसरून २८.८ कोटी डॉलरवर पोचला आहे. कॉइनशेअर्सनुसार बिटकॉइन फ्युचर्स एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये जास्त उलाढाल न दिसल्याचा विपरित परिणाम गुंतवणुकदारांवर झाला आहे. २९ ऑक्टोबरला सरणाऱ्या आठवड्यात, अमेरिकन गुंतवणुकदारांनी बिटकॉइन ईटीएफमध्ये केलेली गुंतवणूक फक्त ५.३ कोटी डॉलर इतकी होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी