Cryptocurrency Update | बिटकॉइनच्या किंमतीत घसरण, Dogecoin, Shiba Inu मध्ये ५ टक्क्यांची तेजी

Cryptocurrency Prices | बिटकॉइन ०.९ टक्क्यांच्या घसरणीसह ६१,६९३ डॉलरवर व्यवहार करत होती. Cardano या क्रिप्टोकरन्सीची किंमत एक टक्क्यांपेक्षा जास्त वाढून १.९७ डॉलरवर आली आहे. तर dogecoinमध्ये ५ टक्के वाढ झाली आहे.

Cryptocurrency Prices
क्रिप्टोकरन्सीचा ट्रेंड 
थोडं पण कामाचं
  • सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनमध्ये थोडी घसरण
  • इथेरियम या दुसऱ्या मोठ्या क्रिप्टोकरन्सीमध्ये एक टक्के घसरण होत ती ४,३१२ डॉलरवर
  • एक्सआरपी, सोलाना, स्टेलर, युनिस्वॅप या डिजिटल टोकनमध्येदेखील मागील २४ तासात वाढ

Cryptocurrency Update | नवी दिल्ली:  क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीमध्ये सोमवारी संमिश्र कल दिसून आला. जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनमध्ये थोडी घसरण झाली. बिटकॉइन ०.९ टक्क्यांच्या घसरणीसह ६१,६९३ डॉलरवर व्यवहार करत होती. बिटकॉइनमध्ये यावर्षी आतापर्यत ११२ टक्के वाढ दिसून आली आहे. ऑक्टोबर महिन्यात बिटकॉइनचे मूल्य ६७,००० डॉलरवर पोचले होते. इथेरियम या दुसऱ्या मोठ्या क्रिप्टोकरन्सीमध्ये  एक टक्के घसरण होत ती ४,३१२ डॉलरवर पोचली आहे. (Cryptocurrency Prices | Prices of Bitcoin, Ether fail while Dogecoin, Shiba Inu surge)

इतर क्रिप्टोकरन्सींचा ट्रेंड

Cardano या क्रिप्टोकरन्सीची किंमत एक टक्क्यांपेक्षा जास्त वाढून १.९७ डॉलरवर आली आहे. तर dogecoinमध्ये ५ टक्के वाढ झाली आहे. डॉजकॉइनची किंमत ०.२७ डॉलरवर आली आहे. एक्सआरपी, सोलाना, स्टेलर, युनिस्वॅप या डिजिटल टोकनमध्येदेखील मागील २४ तासात वाढ झाली आहे. Shiba Inu या टोकनमध्ये मागील काही सत्रांपासून विक्रमी तेजी नोंदवली जाते आहे. शिबा इनूचे मूल्य ५ टक्क्यांपेक्षा जास्त तेजीसह ०.००००६९ डॉलरवर पोचले आहे. 

इथेरचे नेटवर्क

Etherच्या किंमती आठवड्याअखेरीला विक्रमी पातळीवर पोचल्या होत्या. अलीकडच्या काळात डिजिटल टोकनने बिटकॉइनला मागे टाकले आहे. इथर हे इथेरियम नेटवर्कवर काम करते. या ब्लॅकचेनचा वापर हजारो विकेंद्रित अॅप्सच्या वापरासाठी केला जातो. मागील आठवड्यात या सिस्टमला जास्त वेगवान आणि ऊर्जेच्या संदर्भात प्रभावी बनवण्यासाठी अपग्रेड करण्यात आले होते. त्याचा फायद या नेटवर्कला मिळतो आहे. मागील महिन्यात बिटकॉइन ६७,००० डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोचला होता. मागील वर्षभरात बिटकॉइनमध्ये चार पटीपेक्षा जास्त वाढ दिसली आहे. 

क्रिप्टोकरन्सींचा कल

बिटकॉइनच्या किंमतीत थोडीशी घसरण झाली. अल्टकॉइन्ससाठी हे चांगले चिन्ह आहे. एकूण क्रिप्टोकरन्सीचे मूल्य २.६ ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे. बिटकॉइन ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. बिटकॉइन आणि इतर महत्त्वाच्या क्रिप्टोकरन्सी त्यांच्या नव्या उच्चांकीकडे घोडदौड करत आहेत. इथेरियमदेखील जबरदस्त तेजीत आहे. दीर्घकालावधीत इथेरियमचे मूल्य ५,००० डॉलरच्या वर जाण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. मात्र अल्पकालावधीसाठी गुंतवणुकदारांसाठी जोखमीचे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ प्रचंड चढउतारांनी भरलेली आहे.

याआधी सहा महिन्यांपूर्वी बिटकॉइन ६४,८९५ डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोचला होता. या तेजीचे कारण प्रोशेअर्स बिटकॉइन स्ट्रॅटेजी ईटीएफ हे होते. या फंडाच्या मदतीने गुंतवणुकदार बिटकॉइनच्या भविष्यातील मूल्याचा अंदाज बांधू शकतात. यासाठी बिटकॉइन विकत घेण्याची गरज पडत नाही. यामुळे पहिल्यांदाच गुंतवणुकदार न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर बिटकॉइनशी संबंधित अॅसेटची ट्रेडिंग करू शकत आहेत.

काही दिवसांपूर्वी शिबा इनूने जबरदस्त तेजी दाखवली होती. शिबा इनू तेजीसह विक्रमी पातळीवर पोचली आहे. बाजारमूल्याच्या हिशोबाने शिबा इनू ११वी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बनली आहे. शिबमध्ये रविवारी ५० टक्के तेजी दिसून आली. शिबचे मूल्यदेखील विक्रमी पातळीवर पोचले आहे. शिबा इनूची सुरूवात २०२० मध्ये रायोशी नावाच्या अज्ञात व्यक्तीने केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी