Cryptocurrency Update | सहा क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीमध्ये २४ तासात ७,७२,७३४ टक्क्यांची वाढ, शिबा इनू उच्चांकीवर

Cryptocurrency Update | मागील २४ तासात क्रिप्टोकरन्सीचे एकूण व्यवहार १४२.६१ अब्ज डॉलरवर पोचले. मागील २४ तासात क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारात ४३.८४ टक्क्यांची दणदणीत वाढ झाली आहे. यात मुख्य वाटा शिबा इनूच्या टोकनच्या व्यवहाराचा आहे.

Cryptocurrency Update
क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ 
थोडं पण कामाचं
  • एकूण क्रिप्टोकरन्सीचे बाजारमूल्य २.४८ ट्रिलियन डॉलरवर
  • शिबा इनूच्या (Shiba Inu) किंमतीत विक्रमी वाढ
  • एका अज्ञात गुंतवणुकदाराकडून शिबा इनूच्या २७७ अब्ज टोकन्सची खरेदी

Cryptocurrency Update | नवी दिल्ली: जागतिक क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात (Cryptocurrency market cap) बुधवारी (२७ ऑक्टोबर) जबरदस्त वाढ झाली. क्रिप्टोकरन्सीची जगातील एकूण बाजारपेठ किंवा एकूण क्रिप्टोकरन्सीचे बाजारमूल्य २.४८ ट्रिलियन डॉलरवर पोचले. उद्योन्मुख अल्टकॉइन असलेल्या शिबा इनूच्या (Shiba Inu) किंमतीत विक्रमी वाढ झाल्याने क्रिप्टोकरन्सीची एकूण बाजारपेठ चांगलीच वाढ झाली. एका अज्ञात गुंतवणुकदाराकडून शिबा इनूच्या २७७ अब्ज टोकन्सची खरेदी झाल्याने ही विक्रमी वाढ झाली आहे. शिबा इनूचे टोकन म्हणजे शिब टोकनच्या किंमतीत २७.२२ टक्क्यांची घवघवीत विक्रमी वाढ झाली आहे. शिबा इनूच्या टोकनची किंमत ०.००००५३७५ डॉलर इतकी आहे. अल्टकॉइनच्या किंमतीत ७,७२,७३४ टक्क्यांची वाढ झाली. (Cryptocurrency Update: Shiba Inu at Record High, 6 Cryptocurrencies Rise Up To 7,72,734.25% in 24 Hours)

क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात २४ तासात तेजी

मागील २४ तासात क्रिप्टोकरन्सीचे एकूण व्यवहार १४२.६१ अब्ज डॉलरवर पोचले. मागील २४ तासात क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारात ४३.८४ टक्क्यांची दणदणीत वाढ झाली आहे. यात मुख्य वाटा शिबा इनूच्या टोकनच्या व्यवहाराचा आहे. अज्ञात गुंतवणुकदाराने अब्जावधी टोकन्सची खरेदी केल्याने ही तेजी आली आहे. सर्व कॉइन्सची एकूण संख्या ११३.२० अब्ज डॉलर इतकी होती. क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात याचा हिस्सा ७९.३८ टक्के होता.

इथेरियमसह बिटकॉइनची घोडदौड

बिटकॉइनच्या किंमतीत थोडीशी घसरण झाली. अल्टकॉइन्ससाठी हे चांगले चिन्ह आहे. एकूण क्रिप्टोकरन्सीचे मूल्य २.६ ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे. बिटकॉइन ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. बिटकॉइन आणि इतर महत्त्वाच्या क्रिप्टोकरन्सी त्यांच्या नव्या उच्चांकीकडे घोडदौड करत आहेत. इथेरियमदेखील जबरदस्त तेजीत आहे. दीर्घकालावधीत इथेरियमचे मूल्य ५,००० डॉलरच्या वर जाण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. मात्र अल्पकालावधीसाठी गुंतवणुकदारांसाठी जोखमीचे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ प्रचंड चढउतारांनी भरलेली आहे.

मागील २४ तासात क्रिप्टोकरन्सीच्या बाजारपेठेत फारसे नकारात्मक घडले नाही. १० टॉप क्रिप्टोकरन्सीपैकी बहुतांश क्रिप्टोकरन्सीमध्ये किरकोळ नफावसूली झाली. मात्र या सर्व क्रिप्टोकरन्सी त्यांच्या भक्कम पातळीवर दिसल्या.

बिटकॉइन मोठ्या तेजीसह ६६,९७४ डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोचले होते. याआधी सहा महिन्यांपूर्वी बिटकॉइन ६४,८९५ डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोचला होता. या तेजीचे कारण प्रोशेअर्स बिटकॉइन स्ट्रॅटेजी ईटीएफ हे होते. या फंडाच्या मदतीने गुंतवणुकदार बिटकॉइनच्या भविष्यातील मूल्याचा अंदाज बांधू शकतात. यासाठी बिटकॉइन विकत घेण्याची गरज पडत नाही. यामुळे पहिल्यांदाच गुंतवणुकदार न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर बिटकॉइनशी संबंधित अॅसेटची ट्रेडिंग करू शकत आहेत.

ज्यात वाढ झाली अशा टॉप ६ क्रिप्टोकरन्सी-

  1. Bitup: ७३२.६५ डॉलर (७,७२,७३४ टक्क्यांची वाढ)
  2. FlokiGravity: ०.०००२३४९ डॉलर (२,७५,४१४ टक्क्यांची वाढ)
  3. REALPAY: ०.४३७५ डॉलर (७,९१० टक्क्यांची वाढ)
  4. Elon’s Marvin: ०.२१९३ डॉलर (४३९ टक्क्यांची वाढ)
  5. 100xCoin: ०.००००००००६८४५ डॉलर (३६२ टक्क्यांची वाढ)
  6. WeiUp: ०.०००००००८५६४ (३३४ टक्क्यांची वाढ)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी