एका छोटीशा चुकीमुळे Flipkartचे युजर होऊ शकतात फ्रॉडचे शिकार, तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

काम-धंदा
Updated May 13, 2021 | 15:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

एका फ्रॉडमध्ये डेटाबेस लीक होत फ्लिपकार्ट (Flipkart)च्या त्या ग्राहकांच्या अकाउंटमधून अनऑथोराईझ्ड ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन मिळते ज्यांनी आपल्या युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करून बिगबास्केटचा वापर केला होता.

Cyber crime
फ्लिपकार्टमधील सायबर क्राईम 

थोडं पण कामाचं

  • फ्लिपकार्टमधील डेटा चोरी
  • सायबर फ्रॉड
  • ग्राहकांनी राहावे सावध

नवी दिल्ली : जर तुम्ही सर्वच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर एकाच प्रकारच्या लॉग इन माहितीचा वापर करत असाल तर सावध व्हा. सायबर तज्ज्ञांनी फ्लिपकार्टच्या युजरना एका मोठ्या धोक्याचा इशारा दिला आहे. एका फ्रॉडमध्ये डेटाबेस लीक होत फ्लिपकार्ट (Flipkart)च्या त्या ग्राहकांच्या अकाउंटमधून अनऑथोराईझ्ड ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन मिळते ज्यांनी आपल्या युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करून बिगबास्केटचा (BigBasket)वापर केला होता.

राजशेखर राजघरिया या तज्ज्ञांनुसार सायबर क्रिमिनल बिगबास्केटच्या कथित लीक झालेल्या डेटाबेसच्या ग्राहकांच्या ईमेल अॅड्रेस आणि पासवर्डला विकत आहे. हे ग्राहक तेच ग्राहक आहेत ज्यांचे लाग इन डिटेल्स फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन अकाउंटमधील लॉग इन डिटेल्स एकच आहेत. 

लॉग इन डिटेल्स विकतायेत सायबर क्रिमिनल


तज्ज्ञांनुसार काही लोक फ्लिपकार्ट डेटाचे पासवर्ड कॉम्बिनेशनच्या रुपात बिगबास्केट लॉग इन डिटेल्स विकत आहेत. अनेक लोक सर्वच वेबसाईटसाठी एकाच लॉग इन डिटेल्सचा वापर करतात. जवळपास सर्वच ईमेल बिगबास्केटच्या डेटाबेसशी मिळत आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांनी फ्लिपकार्टचा पासवर्ड बदलावा. तज्ज्ञांनी पुढे हेदेखील सांगितले की फ्लिपकार्टला आपले खाते सिक्युअर्ड करायला हवे. अर्थात जेव्हा केव्हा ब्राऊझरमध्ये बदल होतो तेव्हा अॅमेझॉन लॉग इनसाठी ओटीपी पाठवतो.

राजशेखर राजघरिया म्हणतात, लीक झालेले ईमेल आणि पासवर्डचा वापर करून कोणीही कुठूनही व्हीपीएन/टीओओरद्वारे फ्लिपकार्टमध्ये एन्ट्री करू शकतात. कृपया सर्वच अकाउंटसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन बंधनकारक करा.

राजशेखर राजघरिया यांनी टेलीग्रामवर विकल्या जात असलेल्या अकाउंट डिटेल्ससंदर्भातही पोस्ट केली आहे.

डेटाच्या सुरक्षेवर फ्लिपकार्टचे उत्तर


डेटा लीक होत असल्याचा प्रकरणाबद्दल फ्लिपकार्टशी संपर्क करण्यात आला असता फ्लिपकार्टने माहिती दिली की, ग्रुप कस्टमर डेटाची सुरक्षा आणि सेफ्टी कायम राखण्यसााठी पूर्णपणे लक्ष देते आहे. यासाठी कंपनीकडे मजबूत इन्फॉर्मेशन सिक्युरिटी सिस्टम आणि कंट्रोल आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की सायबर क्राईम किंवा फ्रॉंडसंदर्भात ग्राहकांमध्ये जागकरुता आणि सतर्कता निर्माण करण्यासाठी आम्ही विविध मीडिया आणि सोशल मीडियावर अभियान चालवत असतो. ग्राहकांना सुरक्षित ऑनलाईन सुविधा घेता यावी यासाठी सुरक्षित ट्रान्सझॅक्शनसंदर्भात जागरुकता यावी आणि ग्राहकांच्या खात्यांना सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित ठेवता यावे यासाठी ही जागरुकता अभियान चालवली जाते आणि ग्राहकांना माहिती दिली जाते. 

अर्थात अॅमेझॉन आणि बिगबास्केट यांनी विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर अद्याप प्रतिक्रया दिलेली नाही.

सायबर क्राईमचे वाढते प्रमाण

देशात डिजिटल ट्रान्झॅक्शनचे प्रमाण वाढत चालले आहे. ई-कॉमर्ससाठी भारतात मोठी बाजारपेठ आहे. आगामी काही वर्षांमध्ये ई-कॉमर्समध्ये मोठी उलाढाल होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच अनेक ई-कॉमर्स कंपन्या आपल्या व्यवसायात विस्तार करत आहेत. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट आणि इतर अनेक ई-कॉमर्स कंपन्यांच्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मात्र या वाढत्या डिजिटल व्यासपीठांमुळे मागील काही वर्षात सायबर क्राईमचे प्रमाणसुद्धा वाढत चालले आहे. कंपन्या आपल्या ग्राहकांना यासंदर्भात जागरुक करत असतात. शिवाय डेटाच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापरही करत असतात. मात्र सायबर क्राईम किंवा फ्रॉडपासून वाचण्यासाठी ग्राहकांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी