DA Hike: मोदी सरकारची दिवाळी भेट, महागाई भत्त्यात वाढ

Central Govt employees DA hike: मोदी सरकार आता सेवेत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ३१ टक्के महागाई भत्ता देणार

 Central govt employees, pensioners DA hike: Cabinet hikes dearness allowance by 3% from July
मोदी सरकारची दिवाळी भेट, महागाई भत्त्यात वाढ 
थोडं पण कामाचं
  • मोदी सरकारची दिवाळी भेट, महागाई भत्त्यात वाढ
  • मोदी सरकार सेवेत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ३१ टक्के महागाई भत्ता देणार
  • १ जुलै २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीसाठी ३१ टक्के महागाई भत्ता दिला जाईल

Central Govt employees DA hike ।  नवी दिल्ली: कोरोना संकटातून सावरत असलेल्या भारताला नव्या उत्साहाने सक्रीय करण्यासाठी मोदी सरकारने एका मागून एक मोठे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. आत्मनिर्भर भारत कार्यक्रम हाती घेतल्यानंतर आता केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. सध्या सेवेत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता मिळतो. मोदी सरकार आता सेवेत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ३१ टक्के महागाई भत्ता देणार आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ होणार आहे. हा निर्णय १ जुलै २०२१ पासून लागू होणार आहे. Diwali bonanza for Central govt employees, pensioners: Cabinet hikes dearness allowance by 3% from July

महागाई भत्त्यात झालेल्या वाढीमुळे केंद्र सरकारच्या ४७ लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. केंद्र सरकारच्या ४७ लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना १ जुलै २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीसाठी ३१ टक्के महागाई भत्ता दिला जाईल. निर्णयाची अंमलबजावणी ऑक्टोबर महिन्याच्या पगारापासून होईल. पूर्वलक्ष्यी प्रभावाने आधीच्या महिन्यांसाठी जो अतिरिक्त महागाई भत्ता लागू आहे त्याची रक्कम थेट पगारात जमा केली जाईल. यामुळे ऑक्टोबर महिन्याचा पगार मिळेल त्यावेळी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होईल. दिवाळीच्या तोंडावर खर्चासाठी पुरेशी रक्कम उपलब्ध होईल. यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी दणक्यात साजरी होईल. 

महागाई भत्त्यातील वाढीचा केंद्र सरकारच्या सेवेत कार्यरत असलेल्या १७.१४ लाख कर्मचारी आणि १८.६२ लाख निवृत्तीवेतन धारकांना लाभ होणार आहे. केंद्र सरकार महागाई भत्त्याबाबतचे निर्णय ग्राहक मूल्य निर्देशांकाच्या आधारे घेतले जातात. या धोरणानुसार सरकारने ग्राहक मूल्य निर्देशांकाचा आढावा घेऊन महागाई भत्त्यात वाढ केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी