मंदीत चांदी: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ 

काम-धंदा
Updated Oct 09, 2019 | 15:03 IST

Central govt employees: मोदी सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट दिलं आहे. सरकारनं महागाई भत्ता 5 टक्क्यांनी वाढून 17 टक्के करण्याची घोषणा केली आहे. 

DA for government
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ   |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

  • मोदी सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे.
  • . सरकारनं महागाई भत्ता 5 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे.
  • या निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

DA Increase नवी दिल्लीः मोदी सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे. सरकारनं महागाई भत्ता 5 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. एकीकडे देशात आर्थिक मंदी सुरू आहे. अनेक क्षेत्रातल्या उत्पादनात घट झाल्याचं चित्र आहे. त्यातच सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यानं मंदीत चांदी असं म्हणायला काही हरकत नाही. 

आता सरकारी कर्मचाऱ्यांना 12 टक्क्यांऐवजी 17 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. 1 जुलैपासून ही वाढ लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाळीआधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारनं मोठं गिफ्ट दिलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 50 लाख कर्मचाऱ्यांना आणि 62 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.  यामुळे 16 हजार कोटी रूपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या 1 जुलैपासून हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचं जावडेकरांनी सांगितलं. 

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबरोबरच इतरही निर्णय घेण्यात आले. 

महागाई भत्ता वाढवल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात जास्त रक्कम येईल. प्रकाश जावडेकर म्हणाले की, कर्मचाऱ्यांचे पगार एक हजार रुपयांवरून दोन हजार रुपये करण्यात आले आहेत. यासोबतच मंत्रिमंडळानं पंतप्रधान किसान योजनेसाठी आधारशी लिंक करण्याची तारीख 31 नोव्हेंबर 2019 पर्यंत वाढवली आहे. 1 ऑगस्ट 2019 नंतर जी रक्कम जारी होईल. त्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत आधार कार्ड लिंक केलं जाऊ शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...